बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध

दर बेवारस पुरुष मन्नुभाई खदान येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आला आहे. त्याला राजावाडी रुग्णालयात नेले असता, दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आले असून, पोलीस याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ०५ जून रोजी मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली होती कि, एक इसम बेशुद्धावस्थेत पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या डीपी रोड ९ जवळील मन्नुभाई खदान भागात पडला आहे.

“मोबाईल वनच्या सहाय्याने त्याला बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात घेवून गेले असता तेथील उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून त्याला दाखलपूर्व मृत घोषित केले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. त्याच्या पोटात गाळ आणि पाण्याचे प्रमाण आढळून आले असून, पोटात नशेच्या पदार्थ सदृश्य गोष्टीचे अंश सुद्धा आढळून आले आहेत. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आल्याचे पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

इसमाचे वर्णन

बांधा – बारीक, उंची – अंदाजे ५ फुट २ इंच, केस – काळे (वाढलेले), दाढी-मिशी वाढलेली, अंगात चॉकलेटी रंगाचा काळे पांढरे चेक्स असलेला शर्ट, काळ्या रंगाचा बर्मुडा.

सदर इसमाच्या नातेवाईकांचा मुंबई शहरासह महाराष्ट्र आणि देशभर शोध सुरु आहे. या व्यक्तीबाबत किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास पवई पोलीस ठाण्याशी २५७०२६९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पवई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!