पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यात दोन वेळा लागू झाला जमावबंदीचा आदेश

आरेमधील मेट्रो कारशेड उभे करण्यासाठी सुरु असणाऱ्या वृक्षतोडीवेळी पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडे कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी आणि रविवारी लागू असणाऱ्या या जमावबंदीच्या आदेशाचा परिणाम आरे कॉलोनीला लागून असणाऱ्या पवई परिसरात सुद्धा जाणवत होता. मात्र अशाप्रकारे पवई परिसरात जमावबंदी लागू करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, पवई पोलिसांच्या हद्दीत पाठीमागील चार महिन्यात दोनवेळा लागू झाला होता जमावबंदीचा आदेश.

आरेमधील मेट्रो कारशेड उभे करण्यासाठी सुरु असणाऱ्या वृक्षतोडीवेळी पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडे कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी आणि रविवारी लागू असणाऱ्या या जमावबंदीच्या आदेशाचा परिणाम आरे कॉलोनीला लागून असणाऱ्या पवई परिसरात सुद्धा जाणवत होता. मात्र अशाप्रकारे पवई परिसरात जमावबंदी लागू करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, पवई पोलिसांच्या हद्दीत पाठीमागील चार महिन्यात दोनवेळा लागू झाला होता जमावबंदीचा आदेश.आरेमधील मेट्रो कारशेड उभे करण्यासाठी सुरु असणाऱ्या वृक्षतोडीवेळी पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडे कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी आणि रविवारी लागू असणाऱ्या या जमावबंदीच्या आदेशाचा परिणाम आरे कॉलोनीला लागून असणाऱ्या पवई परिसरात सुद्धा जाणवत होता. मात्र अशाप्रकारे पवई परिसरात जमावबंदी लागू करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, पवई पोलिसांच्या हद्दीत पाठीमागील चार महिन्यात दोनवेळा लागू झाला होता जमावबंदीचा आदेश.

९ ते १२ जुलै

कर्नाटकातील राजकीय नाटयाचा खेळ सुरु झाल्यानंतर तेथील काही आमदारांनी पवईतील हॉटेलमध्ये आश्रय घेतल्यामुळे पवईला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले होते यावेळी निर्माण होत असलेल्या परिस्थितीना पाहता पवईमधील काही भागांमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते.

काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी के शिवकुमार सरकार वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. आपल्या बंडखोर आमदारांच्या परतीसाठी पूर्ण प्रयत्न करण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले होते.

पवईच्या रेनायसन्स हॉटेलमध्ये काँग्रेस-जेडीएसचे बंडखोर आमदार थांबल्याने डी शिवकुमार यांनी सुद्धा याच हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. मात्र शिवकुमार यांचे बुकिंग हॉटेलकडून नंतर रद्द करण्यात आले.

आपल्या आमदारांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या शिवकुमार यांना बंडखोर आमदारांनी भेट घेण्यास विरोध दर्शवल्यानंतर हॉटेल परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतर ही कायदा सुव्यवस्थेशी निगडीत परिस्थिती निर्माण झाल्यानंतर रेनायसन्स हॉटेल परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले होते. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे कलम लागू करण्यात आले होते. शांतता भंग होऊ नये म्हणून ९ ते १२ जुलैच्या दरम्यान जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. याकाळात अनेक राज्य आणि केंद्रीय नेत्यांचा बंडखोर आमदारांची भेट घेवून चर्चेचा प्रयत्न जमावबंदीमुळे सफल झाला नाही.

५ ते ६ ऑक्टोबर

आरे येथील मेट्रो कारशेडसाठी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी (४ ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळत याचिकाकर्त्यांना हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तिथे दाद मागा, असा निर्णय दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्रीपासून आरेतील अनेक झाडे इलेक्ट्रिक करवतीने कापण्यास सुरुवात झाली. यासंदर्भात सोशलमाध्यमातून माहिती मिळताच शुक्रवारी रात्रीच अनेक पर्यावरण प्रेमी, मुंबईकरानी वृक्षतोड सुरु असणाऱ्या भागात जावून याला विरोध दर्शवला.

पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्था, संघटना आणि तरुणांनी ठिय्या आंदोलन तीव्र केल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतले. आंदोलकांवर सरकारी कामात अडथळा, पोलिसांना मारहाण, बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी कलम ३५३, ३३२, १४३, १४९ अंतर्गत गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. मात्र यानंतरही आंदोलकांचे या भागात येणारे लोंढेच्या लोंढे पाहता आणि कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती पाहता या परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू केले. चारपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आरे कॉलोनी भागात जाणाऱ्या सर्व मार्गांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यातील एक मार्ग हा पवई परिसरातून जात असल्याने याचा परिणाम पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा जाणवत होता. यावेळी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडी (व्हीबीए) नेते प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांना रविवारी पवई पोलिसांनी आरे कॉलोनीत जात असताना ताब्यात घेतले होते, नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

कलम १४४ काय आहे?

कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता १९७३’मधील कलम आहे. जिथे मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्या भागात हे कलम लागू केले जाते. हे कलम लागू असणाऱ्या परिसरामध्ये चार किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असते.

आदेश कोण देते?

जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात.

या काळात विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या किंवा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्या ठिकाणी नागरिकांना येता येत नाही. हिंसाचार थांबविण्यासाठी याचा उपयोग होतो. उत्तेजित झालेला जमाव हा शांततेसाठी मोठाच धोका असतो, तो टाळता येतो. सामान्य नागरिकांची जमावबंदीमुळे गैरसोय व कुचंबणा होते, म्हणून अशी उपाययोजना कमीतकमी वेळेसाठी लागू केली जाते. कोणत्याही भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जमावबंदीचा आदेश लागू करता येत नाही. पण जर नागरिकांच्या जीविताला धोका व आरोग्याला धोका असेल व दंगलीची संभावना आहे असे वाटले तर ही जमावबंदी ६ महिन्यांपर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!