पवई येथे प्राणी हक्कासाठी नागरिक व विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

रविवारी पहाटे मोठ्या संख्येने पवई, हिरानंदानी गार्डन येथे नागरिक आणि विद्यार्थी एकत्रित येत प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेच्या वाढत्या घटना आणि फीडर्सना होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकण्यासाठी मूक निषेध मोर्चात सहभागी झाले होते. पवई परिसरात घडलेल्या अत्याचाराच्या दोन घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पवईकर, प्राणीप्रेमी यात सहभागी झाले होते. या शांततापूर्ण निषेध मोर्चात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झालेले पाहायला मिळाले.

बॉम्बे अॅनिमल राइट्स (BAR) यांच्यातर्फे प्राणी हक्कासह त्यांच्या फीडर्सना समर्थन देण्यासाठी या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी नागरिकांनी आपला हातात विविध संदेश देणारे पोस्टर्स दर्शवत प्राण्यांच्या क्रूरतेच्या धक्कादायक प्रकरणांबद्दल जागरूकता निर्माण केली. प्राणीप्रेमीसोबतच अनेक पवईकर आवाजहिनांच्या सुरक्षेसाठी एकत्र उभे असल्याचे चित्र यावेळी पवईमध्ये पाहावयास मिळाले.

यासंदर्भात बोलताना या मोर्चात सहभागी प्राणी प्रेमींनी सांगितले कि, “फिडर्सना त्रास देणे हा फौजदारी गुन्हा आहे. प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासोबतच असे कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. अनेक फीडरना लोकांकडून आणि गृहनिर्माण सोसायट्यांकडून त्रास सहन करावा लागतो. सोबतच काहीवेळा फीडर्सवर हल्ले होण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत त्यामुळे त्यांना योग्य सुरक्षा मिळणे देखील गरजेचे आहे.”

हेव्हन्स अ‍ॅबॉड फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, पवई येथे पाठीमागील काही दिवसात हिरानंदानी येथील दोन शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अत्याचाराची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच पवई येथे हा निषेध मोर्चा काढण्यात आला.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!