चांदिवलीतील पवार पब्लिक शाळेतील विद्यार्थ्याचा पडून मृत्यू

छायाचित्र: ANI

गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता शाळेच्या मधल्या सुट्टीत आपल्या मित्रांसोबत खेळत असताना चांदिवलीतील पवार पब्लिक शाळेत पहिलीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा पडून मृत्यू झाला. स्वरांग दळवी (६) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचे वडील भांडूपच्या शाळेत संगीत शिक्षक आहेत.

“स्वरांग हा आपल्या शालेय मित्रांसोबत मधल्या सुट्टीत शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत होता. खेळत असताना अचानक तो पडल्याची माहिती त्याच्या सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळा प्रशासनाला दिली. शाळेतील डॉक्टरांच्या मदतीने त्याला आम्ही त्वरित हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले” असे याबाबत माध्यमांशी बोलताना शाळा प्रशासनाने सांगितले.

हिरानंदानी रुग्णालयात नेले असता त्याचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

स्वरांगला कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याचे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे.

“आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.” असे याबाबत माध्यमांना पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!