एसएम शेट्टी शाळेची विद्यार्थिनी चमकली ‘इन्फिनिटी २०२२ – द अल्टीमेट मॅथ चॅम्पियनशिप’मध्ये

‘इन्फिनिटी २०२२’मध्ये दुबई, दोहा, सिंगापूर, श्रीलंका, तैवान, भूतान आणि भारतातील ९३० विद्यार्थी, ३०४ संघ, १२३ शाळांनी भाग घेतला होता.

आदित्य बिर्ला वर्ल्ड अॅकॅडमीतर्फे आणि बीआयटीएस पिलानी यांच्या सहकार्याने आयोजित ‘इन्फिनिटी २०२२ – द अल्टीमेट मॅथ चॅम्पियनशिप’मध्ये पवईच्या एस एम शेट्टी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयबीडीपीची विद्यार्थिनी सौम्या पांडे हिने ‘क्लॅश ऑफ मॅथेमॅटीसिअन’ स्पर्धेत द्वितीय उपविजेते पद पटकावले आहे.

भारतातील अग्रगण्य इंटरनॅशनल स्कूल आदित्य बिर्ला वर्ल्ड अॅकॅडमी (ABWA) आणि बीआयटीएस पिलानी (BITS Pilani) यांच्या सहकार्याने तरुणांमध्ये गणिताविषयी प्रेम वाढवण्यासह, विद्यार्थ्यांचे गणितीय कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने ‘इन्फिनिटी – द अल्टीमेट मॅथ चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यात येते. ‘इन्फिनिटी २०२२ – द अल्टीमेट मॅथ चॅम्पियनशिप’चा झोनल राउंड ८ जानेवारी तर फायनल राउंड २१ आणि २२ जानेवारी रोजी पार पडला. चॅम्पियनशिपमध्ये १२३ शाळांमधील ९३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वरिष्ठ गटातील (९वी आणि १०वी) १९५ संघ आणि प्रगत (एडव्हांस) गटातील (११वी आणि १२वी) १०९ संघांचा समावेश होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थी आणि संघांच्या सहभागामध्ये उल्लेखनीय वाढ झाली होती. दुबई, दोहा, सिंगापूर, श्रीलंका, तैवान, भूतान आणि भारतातील तरुण प्रतिभांनी यावर्षी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

८ जानेवारी रोजी टॉप ५० संघांची निवड करण्यासाठी इन्फिनिटीची प्राथमिक फेरी पार पडली. यात वैयक्तिक आणि सांघिक विजेत्यांनी २१ आणि २२ जानेवारी रोजी झालेल्या अंतिम स्पर्धांमध्ये भाग घेतला. चॅम्पियनशिपसाठी सन्माननीय अतिथी डॉ जेम्स टँटन (मॅथेमॅटिकल असोसिएशन ऑफ अमेरिका येथील गणितज्ञ) आणि डॉ सौविक भट्टाचार्य (कुलगुरू, बीआयटीएस पिलानी) उपस्थित होते.

यावेळी प्रगत गटात अंतिम वैयक्तिक फेरीमध्ये ‘क्लॅश ऑफ मॅथेमॅटीसिअन’ स्पर्धेत पवईतील एस एम शेट्टी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयबीडीपीची विद्यार्थिनी सौम्या पांडे हिने आपले कसब दाखवत द्वितीय उपविजेते स्थान मिळवले.

सौम्याने मिळवलेल्या या यशासाठी महाविद्यालयासोबतच विविध स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सौम्याने मिळवलेल्या या यशाबद्दल आम्हाला तिचा अभिमान असल्याचे महाविद्यालयातर्फे सांगण्यात आले.

साथीच्या रोगाच्या काळात, एक उत्तम गणितीय कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करत विद्यार्थ्‍यांचा उत्‍साह टिकवून ठेवण्‍यासाठी बारकाईने योजलेल्‍या सर्व फेऱ्याच्या माध्यमातून अनेक नवीन कल्पना आणि सहयोगी मुलांमध्ये सांघिक कार्याचा विकास करण्यात आला.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!