पवईत ऋणी फाऊंडेशन आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; रक्तदात्यांचा आकडा २०० पार !

@अविनाश हजारे

पवईत ऋणी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी केला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे पालिका रुग्णालयाच्या ट्रॉमा हेल्थ केअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल २०० तरुणांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तीने यावेळी रक्तदान केले.

महाराष्ट्रावर आणि देशावर कोरोनाचे संकट आले असताना रुग्णालयांमध्ये रुग्णांना रक्ताची भासत असलेली कमतरता भरून काढण्यासाठी आरोग्य विभागाकडून सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटना आदींना रक्तदान शिबिरे भरवण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने पवईतील महात्मा फुलेनगर येथील ऋणी फाऊंडेशनने सामाजिक दायित्व ओळखून हा उपक्रम हाती घेतला होता, त्याला तरुण रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ऋणी फाऊंडेशनचे हे पहिलेच वर्ष असून, पहिल्याच प्रयत्नात नागरिकांचा लक्षणीय असा हा प्रतिसाद आमचा हुरूप वाढवणारा आहे. यापुढेही असेच विविध लोकपयोगी उपक्रम घेऊन आम्ही येणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, सचिव नितीन भालेराव व खजिनदार विराज भालेराव यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र मुळे, उपसचिव राजेश बनसोडे, उपखजिनदार मयूर बनसोडे, विकास निंबाळकर, रोहित सावंत, चेतन बनसोडे, अरुण वाडेकर, राहुल घागरे, अविनाश जाधव, राहुल जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे निवेदन पत्रकार रविराज शिंदे व अतुल पंडागळे यांनी केले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: