शिवसेना शाखा १२२ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना शाखा १२२च्यावतीने शनिवार १९ डिसेंबर आणि रविवार २० डिसेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला पवईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री गणेश मंदिर, श्रीगणेशनगर,पंचकुटीर व पवई इंग्लिश हायस्कूल, रमाबाई नगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस आयोजित या शिबिरात २६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करण्यासाठी केलेल्या आवाहनाचे औचित्य साधून विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पवईमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत पवई विभागातील २६४ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद देऊन नवा उच्चांक गाठला.

“चार महिन्यांमध्ये ४७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, यातून कित्येकांना नवीन आयुष्य मिळत आहे. पवईकर शिवसेनेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या प्रत्येक हाकेला धावून येणाऱ्या पवई विभागातील सर्व नागरिकांचे मी खूप खूप आभार मानतो.” असे याबाबत बोलताना शाखा १२२चे शाखाप्रमुख सचिन मदने यांनी सांगितले.

पवईतील रहिवाशी अनिल परब यांचे ६२वे रक्तदान

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून पवईतील रहिवाशी अनिल परब यांनी सलग ६२ वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल शिवसेनेतर्फे त्यांचा यावेळी सत्कार सुद्धा करण्यात आला.

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!