आयआयटी पवईच्या क्लासरूममध्ये भटक्या गाईचा फेरफटका

आयआयटी बॉम्बेच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बैलांच्या जोडीने धावपळ करताना एका इंटर्नला जखमी केल्याची घटना अजून ताजी असतानाच, येथील एका क्लासरूममध्ये भटकी गाई घुसल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. भटकी जनावरे येथील विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत असतानाच त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात प्रशासन गुंतले असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

एका क्लासरूममध्ये लेक्चर सुरु असताना एक गाय त्या क्लासचा फेरफटका घेताना नुकत्याच वायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दोन दिवसापूर्वी ही घटना घडल्याचे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. “या महिन्यात एका विद्यार्थ्यावर धक्कादायक हल्ल्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. आयआयटी प्रशासनाने या विषयावर मौन बाळगले आहे,” असेही विद्यार्थ्याकडून सांगण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले “कॅम्पस भागात त्यांचा वावर असल्याने हॉस्टेल, क्लासरूममध्ये त्यांच्या येण्याच्या घटना सतत घडत असतात. मात्र प्रशासन कोणतीच ठोस पाऊले उचलत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे.”

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!