एमबीए फाऊंडेशनतर्फे “स्ट्राइड २०१८, वॉक विथ डिग्निटी”चे आयोजन

५ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या पवईतील एमबीए (म्यूचअली बेनिफिशिअल ऑफ अॅक्टिव्हिटीज) फाऊंडेशन संस्थेतर्फे “स्ट्राइड २०१८, वॉक विथ डिग्निटी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एमबीए सोबत २०११ पासून काम करणारी सेल्फ इस्टीम फाऊंडेशन या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर असतील, तर जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त मनप्रीत अरोरा, मिताली नाग, स्मिता गोंदकर, मयांक शर्मा, प्रियांका खुराणा – गोयल, नवनीत धिल्लोन आदी सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

रामबाग पवई स्थित ही संस्था पाठीमागील १६ वर्षांपासून दिव्यांगांसाठी काम करत आहे. नुकतेच ऐरोली येथे त्यांनी नवीन सेंटर सुरु केले असून, तिथे मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबवले जातात. ‘दिव्यांग व्यक्तींसाठी समुपदेशन, प्रशिक्षण, त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपक्रमांच्या आयोजनासह थेरपी केली जाते. एवढेच नव्हे तर पालकांचेही समुपदेशन संस्थेमार्फत केले जाते.’ असे याबाबत बोलताना संस्थेच्या प्रमुख मीनाक्षी बालसुब्रमण्यम यांनी सांगितले.

जवळपास १५० व्यक्ती सध्या येथील सुविधांचा नियमितपणे लाभ घेत आहेत. तर ९० जणांना संस्थेतर्फे नोकरीसाठी सक्षम बनविण्यात आले असून, येथील बरेचसे कर्मचारी सुद्धा दिव्यांगच आहेत.

हा कार्यक्रम ५ डिसेंबर २०१८ रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार असून, यावेळी “व्हील-चेअर रॅम्प वॉल्क” प्रमुख आकर्षण असेल. ज्याच्या अंतिम फेरीसाठी सेलेब्रिटी डिझायनर अर्चना कोचर यांनी डिझाइन केलेले कपडे परिधान केले जातील.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes