पर्यावरणपूरक दिवाळीला प्रोत्साहन देण्यासाठी जीएसएसच्या विद्यार्थ्यांची रॅली

पवई येथील गोपाल शर्मा शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी १५ ऑक्टोबरला पवई परिसरात रॅली काढली. या सणासुदीच्या हंगामात लोकांना अधिक पर्यावरणपूरक उत्सव निवडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सिएमसीए क्लबच्या विद्यार्थ्यांनी ही खास रॅली आयोजित केली होती.

८वी इयत्तेचे हे विद्यार्थी सिएमसीए (CMCA – चिल्ड्रन्स मुव्हमेंट फॉर सिविक अवेरनेस) क्लबशी संबंधित आहेत. ही संस्था शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध जागरूकता मोहीम राबवत असते. ज्यामुळे मुलांना अधिक जागरूक आणि जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा मिळते.

“Say no to crackers”, “Give out Children A Green Future”, Don’t use Plastic”, आणि जब दियों से हो उजियारा, तो क्यो लेना पटाखों का सहारा यासारखे बॅनर खरोखरच संदेश देत होते, ज्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

२१ ऑक्टोबर रोजी हिरानंदानी फाउंडेशन स्कूलचे विद्यार्थी देखील स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी आणि आपण सर्वजण आपला उत्सव अधिक पर्यावरणपूरक कसा बनवू शकतो यावर त्यांच्या कल्पना सामायिक करण्यासाठी रॅली काढणार आहेत.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!