हिरानंदानीत कामगाराची आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

हिरानंदानीमध्ये बांधकाम कामगार म्हणून काम करणाऱ्या एका कामगाराने येथील लेबर कँपमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. आत्महत्येमागचे नक्की कारण समजू शकले नसून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

सोहम परशुराम निषाद (२०) असे आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव असून, तो बिहारचा रहिवाशी आहे. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून त्याचे राजावाडी येथे शवविच्छेदन केले असता त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोहम मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात आला होता. येथे बांधकाम कामगार म्हणून त्याला नोकरी मिळाल्यानंतर तो आनंदी होता.

सोमवारी दुपारी जेवणाच्या वेळेस घरी असताना कामगारांना राहण्यासाठी बनवलेल्या लेबर कँपमधील आपल्या खोलीत लुंगीने छताला गळफास घेवून त्याने आत्महत्या केली.

“आत्महत्येच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुइसाइड नोट मिळून आली नाही. आम्ही त्याच्या बरोबर काम करणाऱ्या इतर कामगारांकडे याबाबत चौकशी केली, मात्र त्याच्या आत्महत्येमागचे नक्की कारण समजू शकले नाही” असे याबाबत बोलताना तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

“राजावाडी येथे शवविच्छेदनात त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, पवई पोलीस त्याच्या आत्महत्येमागचे नक्की कारण काय याचा तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes