Tag Archives | अटक

आयआयटी येथील हर्बल कंपनीच्या कार्यालयात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक

आयआयटी, पवई येथील एका हर्बल कंपनीच्या कार्यालयात घुसून, मँनेजरला बांधून ठेवून त्याच्याकडून ९.५० लाखाची जबरी चोरी करून फरार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. रेहमत मोहमद अली (२१) आणि शिवकुमार प्रताप सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६.३५ लाखाची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. रेहमत अली […]

Continue Reading 0
youth power

पवई तलावावरील प्रेमी युगलांच्या अश्लील चित्रफीती व्हायरल, गुन्हेगारांना अटक करण्याची युथ पॉवरची मागणी

@रविराज शिंदे पवई तलाव भागात प्रेमरसात मग्न असणाऱ्या प्रेमी युगलांचे फोटो आणि चित्रफिती काढून सोशल मिडियामार्फत व्हायरल करणारी टोळीच या भागात सक्रीय झाली आहे. मुंबईतील युथ पॉवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हातात या चित्रफिती पडताच, त्यांनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल फोपळे यांची भेट घेवून याबाबत लेखी निवेदन देत चित्रफिती व्हायरल करणाऱ्यावर त्वरित कारवाई […]

Continue Reading 6
sai bangurda murder

साई बांगुर्डा खून प्रकरणात आरोपीला अटक

पवईतील साई बांगुर्डा येथे मित्राचा खून करून पसार झालेल्या मित्राला अखेर पवई पोलिसांनी आज अटक केली. जीवन रवी मोरे (४०) असे अटक आरोपीचे नाव असून, उद्या त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. पवईमधील गौतमनगर येथे राहणारा दिनेश लक्ष्मण जोशी (३०) आपला मित्र जीवन मोरे सोबत गुरुवारी साई बांगुर्डा येथील स्काऊट गाईडच्या बंद असणाऱ्या इमारतीमध्ये पार्टी […]

Continue Reading 0

पवई पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला लाच घेताना अटक

पवई पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक (सपोनि) मधुकर पांडुरंग यादव यांना आज दुपारी ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. आरोपीला मदत करण्यासाठी त्यांनी पन्नास हजाराची लाच मागितली होती. तक्रारदार हे पवईतील आयआयटी परिसरात राहतात. राहण्याच्या ठिकाणाच्या जागेवरून त्यांचे व त्यांच्या नातेवाईकामध्ये वादविवाद होता. ज्यावरून नातेवाईकाने पवई पोलीस ठाण्यात तक्रारदार […]

Continue Reading 0

पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस नायकाला लाच घेताना अटक

रिक्षा चालकाला चरित्र पडताळणीचा दाखला देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्विकारताना पवई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस नाईक संजय बोडके (३५) याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पवईतील तुंगागाव येथील एका तरुणाने रिक्षाचा परवाना मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी त्यास चरित्र पडताळणीचा अहवाल सादर करण्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. यासाठी […]

Continue Reading 0
तक्रारदार शकिल 'एफआयआर' दाखवताना

खंडणी खोराच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

फिल्टरपाडा येथील दुकानदारांने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याला जबर मारहाण करून त्याच्या दुकानाचे नुकसान करणाऱ्या खंडणी खोराच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शोयब अमीर खान (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शकील शेख यांचे फिल्टरपाडा येथे सना इंटरप्रायजेस नामक दुकान आहे. आरोपी […]

Continue Reading 0
aropi

हिरानंदानीत कॉलेज तरुणींशी अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणाला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवईमधील हिरानंदानी भागात कॉलेज विद्यार्थिनी समोर अश्लील वर्तन आणि अश्लील शेरेबाजी करणाऱ्या मोटारसायकल बहाद्दराला काल संध्याकाळी पवई पोलिसांनी अटक केली आहे. कल्पेश गोपीनाथ देवधरे (२७) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून, मुंबईभर विनयभंगाचे त्याच्यावर दोन डझनच्यावर गुन्हे नोंद आहेत. रोजंदारीवर मिळेल ते काम करणारा कल्पेश हा कधी आपल्या आई सोबत […]

Continue Reading 2

पवईतील ज्वेलरचे अपहरण करणाऱ्या ७ जणांना क्राईम ब्रांचने ठोकल्या बेड्या

पवईतील ज्वेलर जितेश परमार व दुकानातील कामगार प्रकाश सिंग यांचे मिलिंदनगर येथून अपहरण करून त्यांना मारहाण करून १.८० लाखाची लुट करून ठाण्यात सोडून पसार झालेल्या ७ अपहरणकर्त्यांना अखेर काल क्राईम ब्रांच युनिट ११ ने अटक केली आहे. अन्वर सय्यद (२६), युनुस सय्यद उर्फ शेरू (२१), रेहान शेख (३६), निझाम मकरानी (२०), समीर शेख (२८), तबरेज […]

Continue Reading 0

गाड्यांमधील महागड्या वस्तू चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिस अंमलदारानी ताणून पकडले

वाहतूक कोंडीचा फायदा घेत आणि सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांच्या चालकाचे लक्ष विचलित करून गाडीत असणाऱ्या महागड्या वस्तू चोरी करणाऱ्या एका चोरट्याला अंधेरी पोलीस ठाण्याच्या दोन धाडसी पोलीस अंमलदारानी बुधवारी पाठलाग करून रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या आहेत. नाझीम अशफाक कुरेशी (२२) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes