Tag Archives | चांदिवली

IMG_4058

दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]

Continue Reading 2
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत विधी शाखेच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पवईतील हिरानंदानी येथे असणाऱ्या महाराष्ट्र नॅशनल लॉ-युनिवर्सिटीमध्ये विधी शाखेत शिकणाऱ्या सायली मेश्राम (२०) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायली लॉच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. पवई पोलिस तिच्या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आपल्या सहकारी विद्यार्थीनीसोबत हॉस्टेलमध्ये राहत होती. बुधवारी तिची मैत्रीण वैय्यक्तिक कामानिमित्त बाहेर गेली होती. […]

Continue Reading 0
kidnap school

पवईत शाळेजवळ विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न?

पवई आयआयटी येथील एका नामांकित शाळेबाहेरून एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी पवईत घडली. याबाबत शाळा प्रशासनाने पवई पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई, आयआयटी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीत शिकणार अनिकेत (बदलेले नाव) हा दुपारी १२.४५ वाजता शाळा सुटल्यानंतर आपल्या […]

Continue Reading 0
¬the-constitution-burnt-down-powaiites-protest-front-of-police-station

संविधान जाळल्याच्या निषेधार्थ पवई पोलीस ठाण्यावर धडकला युवकांचा मोर्चा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे भारतीय जनतेच्या अस्मितेचे प्रतिक असलेले भारतीय संविधान जाळण्यात आले. भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या कुप्रवृत्तीचा देशाच्या कानाकोपऱ्यात निषेध नोंदवला जात असून, पवईमधील सर्व संस्थांनी मिळून पवई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला. यावेळी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांना निवेदन […]

Continue Reading 0
raheja news

रहेजाकराची वृद्धेला मदत; मिळवून दिला आसरा

मुंबईच्या रस्त्यावरून चालताना एसी गाडीत बसून प्रशासन आणि पब्लिकला शिव्या घालणारे भरपूर मुंबईकर मिळतील; पण रस्त्यावर उतरून वैयक्तिक सामाजिक जबाबदारी (पर्सनल सोशल रीस्पोन्सिबीलीटी) पाळणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच. चांदिवली येथील रहेजा विहार येथे राहणारे राजेश राजपूत हे त्यापैकीच एक. आपली ही जबाबदारी निभावताना एका वृद्ध महिलेला त्यांनी रस्त्यावर खितपत पडू न देता आसरा मिळवून दिला […]

Continue Reading 0
BJP sangharshnagar protest

संघर्षनगरच्या रस्त्यावरून भाजपा आक्रमक; विकासकाच्या कार्यालयावर हल्लाबोल

चांदिवली संघर्षनगर भागात विकासक, पालिका, स्थानिक प्रतिनिधी सर्वांनीच दुर्लक्ष केल्यामुळे अजूनही येथील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. याबाबत सतत पाठपुरावा करूनही काहीच परिणाम जाणवत नसल्यामुळे शुक्रवारी स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विकासक सुमेर कॉर्पोरेशनच्या कार्यालयावर हल्लाबोल करत धरणे दिले. बोरीवली राष्ट्रीय उद्यान आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या राहणाऱ्या हजारो परिवारांना दहा वर्षापूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजने […]

Continue Reading 0
building

रहेजा विहार येथे इमारतीवरून उडी मारून वृध्देची आत्महत्या

चांदिवली, रहेजा विहार येथील मेपल लिफ या गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून एका ७२ वर्षीय वृध्देने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. लक्ष्मीबाई राऊत (७२) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धेचे नाव असून, आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत आपल्या परिवारासोबत रहेजा विहार येथील […]

Continue Reading 0
powai traffic jam

पवई, चांदिवली पाच तास थांबली

प्रमोद चव्हाण, रविराज शिंदे, रमेश कांबळे “मुंबापुरी आणि मुंबईकर कितीही संकटे आली तरी कधीच थांबत नाहीत” असे म्हटले जाते. मात्र, मुंबईचा भाग असणारे पवई आणि चांदिवली आज जवळपास ५ तास वाहतूक कोंडीत थांबली. पवई आणि चांदिवली भागात सकाळी ९ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती, त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास पाच तास शाळेच्या […]

Continue Reading 1

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!