Tag Archives | चांदिवली

tree colaps1

पवईच्या झाडांना नक्की झाले आहे तरी काय? काही सुकून पडत आहेत, तर काही वरून गळत आहेत

एकेकाळी हिरवळीचे राज्य असलेल्या पवईला, आता सिमेंटचे जंगल म्हणून ओळख मिळालेली आहे. उंच उंच इमारती आणि विकासाच्या बूममध्ये, या परिसरातील निसर्ग संपत्तीचा दिवसेंदिवस नाश होत चालला असतानाचा, आता पवईतील झाडांना सुद्धा काहीतरी झाले आहे. विभागातील अनेक झाडे, गेल्या काही महिन्यात उन्मळून पडली आहेत, तर काही झाडांचे वरील भाग गळून पडले आहेत. या गळती होणाऱ्या आणि […]

Continue Reading 0

साकिनाका भागात चोर समजून चोप दिल्याने एकाचा मृत्यू, ३ जणांना अटक

साकिनाका पोलिसांनी मंगळवारी उशिरा तीन व्यक्तींना, एका व्यक्तीला चोर समजून बेदम चोप देवून, त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे रेहमान अली खान (२६), हबीब शेख (२०) आणि राजकुमार यादव (२४) अशी आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अटक आरोपी हे पुठ्याच्या गोडावूनमध्ये काम करत असून ते त्याच गोडाऊनमध्ये […]

Continue Reading 0
1

रोटरी क्लब मुंबई लेकर्स, पवईने खुलवले मुलांच्या चेहऱ्यावर हास्य

७०० मुलांना संपूर्ण शालेय साहित्य, ३०० मुलांना रेनकोट, २४०० मुलांना सामुदाईक भोजन नेहमी लोकांना आनंद वाटणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्स, पवईने आपले हे कार्य असेच सतत चालू ठेवले आहे. या वेळीही व्यंकटेश्वर निकेतन स्कूलमधील ७०० गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी असे संपूर्ण साहित्य, पवईच्या पंचकुटीर आणि आसपास राहणाऱ्या ३०० मुलांना रेनकोट आणि जवळपास २४०० […]

Continue Reading 0
2

पवई, चांदिवली, साकिनाका भागात मोटर सायकल चोरांचा सुळसुळाट, एक्टिवा गाडीला प्राधान्य

पवई, चांदिवली आणि साकिनाका हद्दीत गेल्या काही महिन्यात गाड्या चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. केवळ हिरानंदानी भागातून गेल्या ६-७ महिन्यात, १८ ते २० गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. एक्टिवा गाडीला चोरांकडून प्राधान्य देण्यात आले आहे. मागणी तसा पुरवठा या सूत्रानुसार गतिमान मोटर सायकल सुद्धा सध्या त्यांच्या निशाण्यावर आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न […]

Continue Reading 0
letter copy

पंचसृष्टी कॉम्प्लेक्स सोनसाखळी चोरांचा अड्डा, दिवसाढवळ्या होत आहेत चोऱ्या, गस्त वाढवण्यासाठी फेडरेशनचे पोलिसांना पत्र

पवईच्या पंचसृष्टी परिसरातील पंचमहल इमारतीच्या गेटजवळ, गुरुवारी सकाळी ६.४० वा. दोन अज्ञात इसमांनी मोटरसायकल वरून येऊन, एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत महिलेचे नाव राधा शर्मा असून, ती तेथील अनेक घरात जेवण बनवण्याचे काम करते. या परिसरातील अशा प्रकारची ही पहिली घटना नसून, इथे वारंवार सोनसाखळी, मोबाईल, पर्स चोरीच्या घटना […]

Continue Reading 0
1

मुसळधार पावसात पवईत उन्मळून पडली झाडे, अनेक ठिकाणी साठले पाणी, दुपारनंतर परिस्थिती सामान्य

काल मुंबापुरीत झालेल्या मुसळधार पावसात सर्व सेवा ठप्प झाल्या असतानाच पवईत ही अनेक ठिकाणी पाणी साठले होते. झाडे उन्मळून पडली होती. तर अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्यांनी दम तोडलेल्याची चित्रे पाहायला मिळत होती. नहारमध्ये पाणी साचल्याने बाहेर पडलेल्या अनेक स्थानिकांचे हाल झाले तर हिरानंदानीत हेरीटेज गार्डनसमोर क्लिफ एव्हेन्युव रोडवर उन्मळून पडलेल्या झाडाला काल ६ तास हलवण्यात […]

Continue Reading 0
sm shetty traffic

बेजाबदारपणे उभ्या शालेय बस आणि पालकांच्या गाड्यांमुळे पवईमध्ये वाढतोय वाहतूक कोंडीचा प्रश्न

शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि पवईच्या रस्त्यांवर ‘राजा उदार आन जनता बेजार’ अशी अवस्था सकाळी सकाळी पवईकरांनी अनुभवली. कामाला जाणाऱ्यांची गडबड आणि त्यात शाळेत मुलांना घेवून येणारे बस चालक आणि पालक अशा दोघांनीही शाळेच्या आवारात भर रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमुळे पवईचे सगळे रस्ते सकाळी-सकाळी ‘हाउस फुल्ल’ झाले होते. आधीच पावसाळ्यात गाड्यांच्या कमी झालेल्या वेगांवर […]

Continue Reading 3
toushif and babu

हि दोस्ती तुटायची नाही, मृत्यूशी झुंजताना सुद्धा दिली एकमेकांची साथ

‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे’ हे शब्द कानावर पडताच समोर चित्र उभे राहते ते शोले मधील जय (अमिताभ बच्चन) आणि विरू (धर्मेंद्र) यांच्या मैत्रीचे. अशीच एक मैत्री पवईत वाढली आणि शनिवारी पवईच्या अग्नी तांडवात मृत्यू सोबत पण टिकून राहिली. ही कहाणी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून लेक होममध्ये लागलेल्या […]

Continue Reading 0
jamavada

लेकहोम अग्नीतांडव: बचावकार्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी जमा होतोय निधी, १० लाख जमा, अजूनही आर्थिक मदतीची गरज

लेकहोम फेज तीनमधील लेक ल्यूसर्न इमारतीला लागलेल्या आगीत अडकून पडलेल्या रहिवाशांचे जीव वाचवण्यासाठी, रहिवाशी नसून सुद्धा केवळ मानवताधर्म निभावण्यासाठी निस्वार्थ बचावकार्य करणारे, पाच लोक आपल्या जीवाला मुकलेले आहेत. तर काही जखमी झालेले आहेत. यातील काही हे आपल्या परिवाराचे एकमेव कमवते होते. आपल्या प्राणांचीही पर्वा न करता, निस्वार्थ मदत करणाऱ्या या लोकांसाठी, लेक ल्यूसर्न सोसायटीने मदतीचा […]

Continue Reading 0
छायाचित्र: ऑलीविया डिसुझा

पवई लेक होममधील भीषण आगीत ७ लोकांचा मृत्यू, २२ पेक्षा जास्त जखमी

पवई लेक होम, फेज तीन मधील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, एका महिलेसह ७ जणांचा मृत्यू झाला असून २२ पेक्षा जास्त लोक जखमी असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगितले जात आहे. मृतांपैकी तीन जणांचा मृत्यू हा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरून झाला आहे. एका जखमीला ऐरोली येथील नॅशनल बर्न्‍स सेंटर येथे उपचारार्थ हलविण्यात आले […]

Continue Reading 0
छायाचित्र सहाय्य: mytravefootprints.blogspot.in

यंग इन्वायरमेंटचा झाडे लावा झाडे जगवाचा नारा, हजारो चिमुकल्या हातांना वृक्षारोपणाचे धडे

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या पवईच्या यंग इन्वायरमेंट ग्रुपच्यावतीने, लहानग्यांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे धडे देण्यासाठी “या झाडे लावूया” या उपक्रमाचे आयोजन हिरानंदानीच्या हेरीटेज गार्डनमध्ये ५ जूनला संध्याकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने बालक-पालक अशी जोडी या उपक्रमात सहभाग नोंदवणार आहे. माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास […]

Continue Reading 0
suicide

साकिनाका पोलिस वसाहतीत, बारावीच्या परिक्षेत नापास झाल्याने मुलीची आत्महत्या

काल आलेल्या बारावीच्या परिक्षेच्या ऑनलाईन निकालानंतर आपण नापास झालो आहोत हे समजताच साकिनाका पोलिस वसाहतीत राहणारी संध्या पवार (बदललेले नाव) हिने निराशेतून आपल्या राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिचे वडील पोलिस खात्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. आत्महत्येच्या वेळेस संध्याच्या बहिणीने तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता; परंतु तिचा हात झटकून देत उडी मारली. या […]

Continue Reading 0
cartoon

कोणीही उठतो आणि हात टाकतो, पोलिसांनी करायचे तरी काय?

भायखळा: मोबाईल हरविल्याच्या कारणावरून दोन केनियन नागरिक आणि कॅन्टीन कर्मचाऱ्यांमध्ये झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एका रेल्वे पोलिसाला (जीआरपी) केनियन नागरिकाकडून काठीने मारहाण. घाटकोपर: मोटारसायकलवरुन जाणाऱ्या तिघांना जाब विचारल्याच्या क्षुल्लक वादातून तीन पोलिसांना बेदम मारहाण. वाशी: भरधाव वेगात कार चालवत असणाऱ्यांना थांबवले म्हणून मारहाण. वाकोला: आरोपींना कारागृहात घेऊन जात असताना पोलिसांना मारहाण. पवई: नशेत असणाऱ्या विदेशी नागरिकास हटकले म्हणून पोलिसांशी धक्काबुक्की, भरदिवसा भर रस्त्यात घातला धुमाकूळ, पोलिसांना वापरले अपशब्द. […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!