Tag Archives | पवई तलाव

metro - 6 work at powai main

मेट्रो – ६ भूमिगत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती करावी: पवईकरांची मागणी

मुख्यमंत्र्यांनी आरे कार शेड प्रकरणात सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारला असल्याने आम्हाला आशा आहे की ते आमच्या भूमिगत मेट्रोच्या मागणीकडे सुद्धा लक्ष देतील. – पवईकर @प्रमोद चव्हाण मेट्रो – ६ (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) कॉरिडॉरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी पवईकरांनी केली आहे. सोमवारी रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे भूमिगत मेट्रोच्या मागणी आणि भेटी संदर्भातले पत्र सादर केले. […]

Continue Reading 0
mumbaikarshuman chain on Powai lake for demanding underground metro

भूमिगत मेट्रोच्या मागणीसाठी मुंबईकरांची पवई तलावावर मानवी साखळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारद्वारे सुरू केलेल्या अनेक पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेत निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या अनेक प्रकल्पांना लाल झेंडा दाखवलेला असतानाच मुंबईकरांनी उपनगरामधील भूमिगत मेट्रो कॉरिडोरच्या आपल्या मागणीवर जोर दिला आहे. याच मागणीसाठी शनिवारी (०८ डिसेंबर) मुंबईकरांकडून पवई तलाव भागात मानवी साखळी तयार करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ४.३० ते ६.३० […]

Continue Reading 0
public meeting with mla

नागरी समस्या समजून घेण्यासाठी आमदारांचा रहिवाशांसोबत संवाद

विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार दिलीप भाऊसाहेब लांडे यांनी शनिवारी सकाळी मुंबई पोलिस, पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत हिरानंदानी पवई येथील फॉरेस्ट क्लब येथे आपल्या मतदार संघातील रहिवाशांसोबत संवाद साधला. परिसरातील समस्या समजून घेण्यासह हिरानंदानी येथील दैनंदिन जीवनावर रहिवाशांच्या दृष्टीकोनातून होणार्‍या सर्वसाधारण नागरी तक्रारी समजून घेण्यासाठी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दिलीप लांडे सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका […]

Continue Reading 0
vruksh tod

मेट्रो – ६ घेणार ३४० झाडांचा जीव?

पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर मेट्रो – ६ प्रकल्पात कुऱ्हाड स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मार्गावर चालणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पात ३४० झाडांना आपला जीव गमवावा लागणार असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून समोर येत आहे. पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर या प्रकल्पासाठी […]

Continue Reading 0
powai lake cleanup

आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांची पालिकेसोबत पवई तलाव स्वच्छता मोहीम

मुंबईतील पवई तलावाची पाण्याची गुणवत्ता गेल्या काही वर्षांत प्रदूषणामुळे ऱ्हास झाली आहे. सांडपाण्या व्यतिरिक्त, घनकचरा विशेषत: प्लॅस्टिक, सांडपाणी पावसाच्या तलावामध्ये सोडले जाते. पवई तलाव भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या भागात टाकलेल्या कचऱ्यामुळे, तलाव पात्रात टाकलेल्या निर्माल्यामुळे या भागात कचऱ्याचे साम्राज्य वाढत जात असतानाच पवई तलावाला वाचवण्यासाठी अभुदय – आयआयटी पवई आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पवई तलाव […]

Continue Reading 0
lake home

लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी

चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]

Continue Reading 0
The citizen delegation during the meeting with BMC officials

पवई तलावातील जलपर्णी काढण्यापासून पालिकेची चालढकल

पवई तलावाला हळूहळू नष्ट करणाऱ्या जलपर्णीना काढण्याबाबत विचारले असता पालिकेच्या अधिका्यांनी नुकतेच केले असल्याचे निर्दोषपणे सांगितले. एका अधिकाऱ्याने प्रतिनिधीना सांगितले की, आयआयटी बॉम्बेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर काही वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले “कोई हायसिंथ नजर ही नहीं आयी है.” त्याच्यावर प्रतिनिधींनी उत्तर दिले “अगर आप इस मामले में अपना हाथ गंदा करना चाहेंगे और गाड़ी से उतरेंगे […]

Continue Reading 0
file photo powai lake

मासेमारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर दोन इसमांनी हल्ला करून पवई तलावात ढकलले

पवई तलावात इसमांना बेकायदेशीर मासेमारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकावर दोन इसमांनी हल्ला करून त्याला पवई तलावामध्ये ढकलून दिल्याची घटना घडली आहे. शेरबहादूर खान असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. सुरक्षा रक्षकाने यासंदर्भात पवई पोलिस ठाणे गाठत दोघांविरूद्ध तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असून, गुन्ह्यात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली […]

Continue Reading 0
accident

गणेश विसर्जन घाटाजवळ होमगार्ड अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

पवई येथे शनिवारी रात्री घडलेल्या हिट अँड रन अपघातात एका २५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण हा होमगार्ड अधिकारी होता. शनिवारी रात्री कर्तव्यावरुन परतत असताना हा अपघात घडला. पवई पोलिसांनी याबाबत अज्ञात वाहनचालकाविरुध्द निष्काळजीपणे आणि हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन काशिनाथ धुमक यांना शनिवारी मरोळ […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!