Tag Archives | पवई पोलिस

phishing

सिमकार्ड पडले ‘लाख’ रुपयाचे

नवीन सिमकार्डसाठी ऑनलाइन बुकिंग करणे एका पवईकराला चांगलेच महागात पडले आहे. सिमकार्डसाठी पाच रुपये ऑनलाइन भरण्यास सांगून सायबर ठगाने त्याच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९० रुपये पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. रामबाग पवई येथे राहणारे सौरभ घोष (४७) यांनी नवीन मोबाईल फोन खरेदी केला […]

Continue Reading 0
phishing

कॅब कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून दोन बहिणींना सव्वालाखाचा गंडा

कॅब कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करत एका ठगाने पवईतील दोन बहिणींच्या खात्यातील सव्वा लाखावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. पवईतील आयआयटी परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाने १८ ऑक्टोबरला माथेरानला फिरायला जाण्यासाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कॅब बुक केली होती. भाड्याचे पेमेंट करण्यासाठी […]

Continue Reading 0
accident gandhinagar cement mixer

गांधीनगर उड्डाणपुलावर सिमेंट मिक्सर पलटला

जेव्हीएलआरवर अपघात सत्र सुरूच; अपघात, वाहतूक कोंडीमुळे चाकरमानी संतप्त आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर उड्डाणपुलावर सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून पूर्व धृतगती मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक रोखण्यात आली होती. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत क्लिनर […]

Continue Reading 0
lake home

लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी

चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]

Continue Reading 0
Section 144

पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यात दोन वेळा लागू झाला जमावबंदीचा आदेश

आरेमधील मेट्रो कारशेड उभे करण्यासाठी सुरु असणाऱ्या वृक्षतोडीवेळी पर्यावरण प्रेमी आणि मुंबईकरांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडे कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी आणि […]

Continue Reading 0
phishing

ऑनलाईन साडी खरेदी करायला गेली आणि ५० हजार घालवून बसली

सध्या उत्सवाचे दिवस असून, ऑनलाईनवर खरेदीला उधान आले आहे. मात्र अशाच प्रकारे ऑनलाईन खरेदी केलेल्या ७९९ रुपयांच्या साडीसाठी रहेजाविहार येथे राहणाऱ्या एका गृहिणीला चक्क ५० हजार रुपये मोजावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करून पवई पोलिस अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील रहेजा विहार येथे राहणारी गृहिणी […]

Continue Reading 0
accident JVLR main

जेव्हीएलआरवर अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

गुरुवारी (१० ऑक्टोबर) जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर पंचकुटीर येथे झालेल्या अपघातात मोटारसायकलवरून जात असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना पवई परिसरात घडली. सदाशिव येरम (२३) आणि शैलेश मिडबावकर (२३) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांचा अजून एक मित्र अनिकेत महेश जांभळे (२१) हा गंभीर जखमी झाला असून, […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!