Tag Archives | पवई पोलीस

online cheating

हिरानंदानीतील पेन्शनधारक फिशिंगचे बळी; गमावले दोन लाख

अनोळखी व्यक्तीला ओटीपी शेअर केल्यामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन येथील एका ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक यांना पाच व्यवहारांच्या माध्यमातून १.९५ लाखाचा गंडा पडला आहे. तुम्ही दूरसंचार नियामक प्राधिकरण (टेलिकॉम रेग्युलेटरी औथोरीटी ऑफ इंडिया) म्हणजेच ट्रायच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. पुढील काळात तुम्हाला पेन्शन बंद होवू शकते. असे कारण देत सायबर भामट्याने हिरानंदानी येथील एका ज्येष्ठ नागरिक […]

Continue Reading 0

ऑनलाईन दारु मागवणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला ८२ हजारांची टोपी

‘अनलॉक १’ मध्ये काही दुकाने आणि व्यवसाय चालू झाली असली तरीही काही दुकानांना उघडण्यास अद्याप  बंदी करण्यात आली आहे. या काळात एका बँक कर्मचाऱ्याला ऑनलाईन दारु मागवणे चांगलेच महागात पडले आहे. आपल्या क्रेडीट कार्डचे डिटेल्स दिल्यामुळे खात्यातून चोरट्यांनी ८२ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबवत त्याला टोपी घातली आहे. महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच दारु ऑनलाईन विक्रीला […]

Continue Reading 1
tunga pratibandhit

तुंगागाव, मुरंजनवाडी कंटेन्मेंट झोन; संचारास निर्बंध

साकीविहार रोडवरील तुंगागाव आणि मुरंजनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित मिळत असल्याने वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिकेने हा परिसर कंटेन्मेंट झोन/ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमवार ८ जून २०२० पासून ते २१ जून २०२० पर्यंत  हा आदेश लागू करण्यात आला आहे. या काळात व्यवहार आणि संचारास निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना विषाणूमुळे […]

Continue Reading 0
nsg cmnd house theft

पवईत चोरट्यांनी फोडले दारूचे दुकान, ८.५ लाखाची दारू आणि रोकड लंपास

सोमवारी राज्य सरकारच्या परवानगीनंतर पवईतील एक दारूचे दुकान उघडले असता दुकानात ८.५ लाखाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. मालकाने दुकान उघडले असता दुकानातील ७.५ लाख किंमतीच्या दारूच्या बाटल्या आणि १.१० लाखाची रोकड चोरट्यांनी पळवल्याचे लक्षात आले. पवई पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर […]

Continue Reading 0
birthday with police

पवईतील तरुणीने कोरोना वॉरिअर्ससोबत साजरा केला आपला वाढदिवस

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलेला असताना कोरोना वॉरिअर्स असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पोलीस असा सगळ्यांबद्दल जनमानसात एक मोठा आदर निर्माण झाला आहे. याचेच एक उदाहरण काल, ४ मे रोजी पवईत पहायला मिळाले. एका तरुणीने आपल्या वाढदिवसाचा आनंद चक्क पवई पोलिसांसोबत साजरा केला. पवईत राहणाऱ्या मलकावा बोमिडी  या तरुणीचा ४ मे […]

Continue Reading 1
qtq80-SRJGpW

रुग्णवाहिका चालकांकडून पोलिसांचीही लूट

कोरोनाच्या काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस असे सगळेच आपल्या जीवावर उदार होत नागरिकांच्या रक्षणासाठी लढत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काही लोकांनी आपले धंदे जोमात आणले आहेत. सार्वजनिक रुग्णवाहिका सगळीकडेच पोहचू शकत नसल्याने काही खाजगी रुग्णवाहिका चालक/मालक मनमानी करत लूट करत असल्याचे समोर येत आहे. नागरिकांना वाचवण्यासाठी काम करणाऱ्या देवदूतांना सुद्धा यांनी सोडले नसून, […]

Continue Reading 0
police shipai

पवई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूच्या पकडीपासून कोणीही वाचू शकलेले नसून, आता पवई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाणे हद्दीत आपले कर्तव्य बजावत असताना दोघांना लागण झाल्याचे समोर येत आहे. दोघानांही त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासोबतच पोलीस ठाण्याच्या ४ कर्मचाऱ्यांना खाजगी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जगभर […]

Continue Reading 2
lockdown police action2

विनाकारण फिरणे पवईकरांना पडले महागात; मोठ्या प्रमाणात दुचाकी जप्त

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या अनेकांना पोलिसांनी आपल्या दांड्याने प्रसाद दिला आहे. मात्र त्यानंतरही अनेक तरुण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने याबाबत पवई पोलिसांनी ठोस पाऊले उचलत विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांवर १८८ नुसार गुन्हे नोंद करून वाहने जप्त करण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!