Tag Archives | पवई पोलीस

fraud

विदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक

सौदी अरेबियात मोठ्या पगाराची नोकरी लावून देतो असे सांगून, अनेक तरुणांना गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या टोळक्यातील एकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. वलीउल्ला बेतुल्ला कुरेशी असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील ही दुसरी अटक आहे. जानेवारी महिन्यात यातील पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली […]

Continue Reading 0

पवईत तोतया पोलिसाला अटक

“तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा आहे आणि आम्ही तुला अटक करायला आलो आहोत” असे सांगून, खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तोतया पोलिसांच्या दुकलीतील एकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. विजय तटकरे असे अटक आरोपीचे नाव असून, अशाच प्रकारच्या एका प्रकरणात १२ वर्षापूर्वी साकीनाका पोलिसांनीही त्याला अटक केली होती. एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारे पंचेचाळीस वर्षीय […]

Continue Reading 0
aaropi

लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर मैत्री करून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेडया

मोठा उद्योगपती असल्याचे सांगून २७ वर्षीय एमबीए तरुणीशी लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर मैत्री करून, लग्नाचे वचन देवून, अश्लील फोटोद्वारे बदनामी करण्याची धमकी देत तिच्याशी संबंध बनवणाऱ्या कोलकता येथील एका चहावाल्याला पवई पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. गौरव शाव (३०) असे या तरुणाचे नाव असून, बुधवारी त्याला अंधेरी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पवईतील एका नामांकित कंपनीत मोठ्या […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

व्यावसायिकाला २० लाखाचा गंडा घालणाऱ्या अभियंत्याला दिल्लीतून अटक

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने कांदिवली येथील एका व्यावसायिकाला २० लाखाचा गंडा घालणाऱ्या यांत्रिकी अभियंत्याला दिल्लीतून पवई पोलिसांनी गुरुवारी अटक केली. परवेश कुमार (२३) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याचे इतर दोन साथीदार आकाश आणि पंकज यांचा पोलीस शोध घेत आहेत. मुंबईतील नामांकित फर्निचर निर्माते गुरु सिंग (बदललेले अडनाव) यांना फर्निचर बनवण्यासाठी चीनमधून लाकूड आयात करण्यासाठी […]

Continue Reading 0

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चांगला, टापटिपीत पेहराव करून, मोठ्या घरातील इसम असल्याचे भासवत मोठ्या इमारतींमध्ये प्रवेश करून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. रवींद्र सुरावत (२१) असे अटक आरोपीचे नाव आहे. उमा मल्होत्रा मरोळ येथील अशोक टॉवरच्या पाचव्या मजल्यावरील घरात आपल्या परिवारासोबत राहतात. २ जानेवारीला काही कामानिमित्त त्या घराबाहेर गेल्या होत्या. परत आल्यावर […]

Continue Reading 1
nashkhori

नशाखोरी रोखण्यासाठी पवईकर एकवटले

पवई भागात वाढत्या नशाखोरीला आळा घालता यावा आणि या समस्येला परिसरातून पूर्ण नष्ट करता यावे म्हणून पवईकर एकत्रित आले आहेत. बुधवारी, ४ जानेवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता या समस्येवर चर्चा करण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांनी एकत्रित येवून, पवई पोलिसांसोबत चैतन्यनगर येथे याबाबत एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. तर पोलिसांनी यावर […]

Continue Reading 1
hatya

सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

साकिनाक, पवई पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद नावावर असणाऱ्या नासिर अली मोहंमद शेख (३१) याची काही अज्ञात व्यक्तींनी गौतमनगर पाईप लाईन येथे डोक्यात बॉटल फोडून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना बुधवारी पवईत घडली आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवी कलम 302 नुसार गुन्हा नोंद करून त्याच्या हत्येच्या मागील लोकांचा शोध सुरु केला आहे. पवईतील […]

Continue Reading 0
jaiswal

पवई किडनी रॅकेट: आरोपी रुग्ण ब्रिजकिशोर यांचे सुरतमध्ये निधन

खोट्या कागदपत्रांच्या आधारे किडनी मिळवणाऱ्या सुरत येथील व्यावसायिक व पवई किडनी रॅकेटमधील आरोपी ब्रिजकिशोर जैस्वाल यांचा सुरत येथे बुधवारी मृत्यू झाला आहे. जैस्वाल यांचे वकील यांनी याबाबत पवई पोलिसांना माहिती कळवली असून, पुढच्या सुनावणीच्या वेळी याबाबत कोर्टाला पवई पोलिसांकडून कळवले जाणार आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे एका महिलेस सुरत येथील व्यावसायिकाची पत्नी दाखवून किडनी दिली जात […]

Continue Reading 0
suicide

आयआयटी कॅम्पसमध्ये प्रोफेसरच्या मुलीची आत्महत्या

आयआयटी कॅम्पसमधील केंद्रीय विद्यालयात बारावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने कॅम्पसमध्येच असणाऱ्या शिवालिक इमारतीच्या १४व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वडील हे आयआयटीमध्ये प्रोफेसर असल्याचे बोलले जात आहे. सरोजा नांबियार (बदललेले अडनाव) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. पवई पोलिसांनी याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes