Tag Archives | विक्रोळी

jehan divecha

पवईत एमबीए विद्यार्थ्याचे अपहरण; अर्धातास गाडीत मारहाण करून निर्जनस्थळी सुटका

गाडीच्या अपघाताचा राग मनात धरून एमबीएच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात पवईत घडली. सोशल मिडियावर मुलीची खोटी प्रोफाईल बनवून, त्याद्वारे फूस लावून विद्यार्थ्याला बोलावून अपहरण करण्यात आले होते. चालत्या गाडीत अर्धा तास चोप देवून सुटका केल्यानंतर प्रकरण समोर आले. पवई पोलिसांनी या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक केली आहे. […]

Continue Reading 0

मोदी सरकारच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जन आंदोलन

मोदी सरकारच्या काळात जिवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज संध्याकाळी ५ वाजता विक्रोळी स्टेशन येथे जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजीपाल्यासह गॅसचे व पेट्रोलच्या वाढीव दरामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समर्थक आज रस्त्यावर उतरले होते. गेल्या आठवड्यात एलिफिस्टन रोड येथे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या घटनेतील […]

Continue Reading 0
ambedkar-putala

पवई उद्यानात भीम अनुयायांनी बसविला बाबासाहेबांचा पूर्णाकृती भव्य पुतळा

पवईतील एल अँड टी समोरील उद्यानाला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचे नाव दिले असताना व या उद्यानात पुतळा बसविण्यास २००८ साली विधिमंडळाने मंजुरी दिली असताना सुद्धा पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०१६ रोजी साजरी करण्यात आलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे औचित्य साधत पवईतील भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब […]

Continue Reading 0
रविराज शिंदे आणि त्यांचे मित्र अजय सावंत, दत्ता दाभोळकर, राजेश हजारे

दक्ष तरुणांच्या मदतीने सराईत पाकिटमार व मोबाईल चोर गजाआड

सुषमा चव्हाण गर्दिच्या काळात पवईमधील बस स्थानकांवर बसमध्ये चढणाऱ्या लोकांचे पाकिट आणि मोबाईल चोरी करून, पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका सराईत चोरास, पवईतील युवा पत्रकार रविराज शिंदे आणि त्यांचे मित्र अजय सावंत, दत्ता दाभोळकर, राजेश हजारे यांनी पकडून पवई पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरेश चव्हाण उर्फ सुर्या असे पकडण्यात आलेल्या चोराचे नाव असून; सूर्या हा पोलिसांच्या अभिलेखावरील […]

Continue Reading 0
blast parksite

पार्कसाईटमध्ये घरात सिलेंडर स्फोट, ८ जण जखमी

पार्कसाईट विक्रोळी येथील आंबेडकरनगर सोसायटीत शनिवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन ८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी स्फोट झालेल्या घरातील दोघे गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घर रस्त्याला लागून असल्याने घरातील काही लोक आणि पादचारीही यांचा जखमींमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी […]

Continue Reading 0
sandesh vidyalay

विद्यार्थ्यांची आरोग्य जनजागृती

आयआयटी |  रविराज शिंदे ऊन पावसाच्या चाललेल्या पाठ शिवणीच्या खेळामुळे मुंबईत डेंगू, मलेरिया, स्वाईन-फ्लू सारख्या विविध आजारांनी तोंड वर काढले आहे. या आजारांना पालिकेकडून आधीच धोकादायक आजार म्हणून घोषित करण्यात आले असून, या आजारांना रोखण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु त्यानंतरही अनेक लोकांपर्यंत माहिती पोहचत नसल्याने, अनेक लोक आजही या आजारांचे बळी पडत […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes