Tag Archives | शिवसेना

rangoli andolan

रोड नुतनीकरणात होणाऱ्या दिरंगाई विरोधात शिवसेनेचे रांगोळी आंदोलन

पालिका रस्ते विभागाकडून आयआयटी, पवई येथील प्रशांत अपार्टमेंट रोडवर गेल्या दोन महिण्यापासून सिमेंटकॉक्रीट रोड निर्मितीचे काम सुरु आहे. रोड निर्मितीच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे लोकांना त्रास होत असल्याकारणाने शिवसेनेने आज रोडवर उतरत खोदकाम केलेल्या रस्त्यावर रांगोळी काढून आंदोलन केले. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी व्हिडीओ लिंकवर क्लिक करा.

Continue Reading 0
shivsena durgadevi sharma garden

आयआयटी, पवई येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानातील झाडांच्या कत्तली विरोधात शिवसेनेचे श्रद्धांजली आंदोलन

पवई, आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात शिवसेनेच्या आमदार फंडातून सुरु असलेल्या कामाच्यावेळी लावलेली रोपटी स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली पालिका ‘एस’ उद्यान विभागाने उपटून टाकून त्यांची हत्या केल्याचा आरोप करत शिवसेनच्यावतीने आज पवईमध्ये श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दुर्गादेवी शर्मा उद्यानात जमा होत उद्यानात काढून फेकलेल्या आणि सुकलेल्या रोपट्यावर सफेद कपडा टाकून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. […]

Continue Reading 0

वीजबिल भरणा केंद्र बंद केल्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन, सह्यांची मोहीम

आयआयटी येथील रिलायन्स एनर्जींचे एकमेव वीजबिल भरणा केंद्र कंपनीने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन लोक त्रस्त झाले होते. या त्रासाबद्दल लक्षात येताच शिवसेनेतर्फे वीजबिल भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम घेत हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात यावे म्हणून गुरुवारी केंद्राच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या […]

Continue Reading 0
hanuman rooad maruti mandir 27052017

हनुमान रोडचे मारुती मंदिर वाचवण्यासाठी शिवसेना सरसावली

हनुमान रोड आयआयटी मार्केट पवई येथे असणाऱ्या मारुती मंदिराला सुद्धा पालिकेने पाडण्याची नोटीस दिली आहे. हे मंदिर कोणालाही अडथळा बनणारे नाही, केवळ कोण्या एका विकासकाच्या फायद्यासाठी आम्ही याला पाडू देणार नाही, असा पवित्रा घेत शिवसेना आता याच्या बचावासाठी पुढे आली आहे. स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी गुरुवारी संध्याकाळी मंदिराला भेट देवून मंदिर वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न […]

Continue Reading 1
121,122 winners

पवईत कमळ फुलले; भाजपच्या वैशाली पाटील विजयी

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निर्णय नुकतेच जाहीर झाले असून, पवईतील प्रभाग क्रमांक १२२ मध्ये गेली २५ वर्ष सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या गडावर भाजपाची उमेदवार वैशाली पाटील यांनी ४८७० मते मिळवत ७०० मताधिक्याने विजयी होत कमळ फुलवले. दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी (४१४०), तिसऱ्या स्थानावर शिवसेना (३५८९) तर चौथ्या स्थानावर कॉंग्रेस (१३०७) पक्षाला समाधान मानावे लागले आहे. प्रभाग क्रमांक […]

Continue Reading 0

मोदींच्या सभेनंतरही मुंबईत शिवसेनाच जिंकणार – उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत प्रचार सभेसाठी यावे. त्यांची सभा झाली तरी मुंबईत शिवसेनाच कशी जिंकते हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे, असे थेट आव्हान मोदींना देत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर निशाना साधला आहे. सोमवारी चांदिवली येथे आयोजित प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू असून, विविध पक्षाच्या श्रेष्ठींच्या सभा रंगू लागल्या आहेत. […]

Continue Reading 0
shivsena

पवईत शिवसेनेचा विकास कामांचा सपाटा

स्थानिक नगरसेवकांनी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं असतानाच उद्यानांची डागडुजी, घर घर शौचालय अंतर्गत मलनिसारण वाहिनी टाकण्याचे काम, गर्दुले – नशेखोरांनी मांडलेला उच्छाद मोडून काढण्यासाठी सुरक्षा उपाययोजना, शाळेच्या बसची वाट पाहत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत अशा अनेक प्रश्नांना मार्गी लावत शिवसेनेच्यावतीने पवईत कामाचा सपाटा लावला आहे. मुंबईच्या शिरपेचाचा तुरा असणाऱ्या पवईला गेल्या काही वर्षात अनेक समस्यांनी ग्रासलेले […]

Continue Reading 0
2let

पालिका उद्यानातील शौचालय गेले चोरीला

हिरानंदानी येथील आंब्रोसिया इमारतीच्या बाजूला असणाऱ्या पालिका उद्यानात बांधण्यात आलेले शौचालय मलनिसारण वाहिनीला जोडले गेले नसल्याने ते वापरात नसून, त्याचे गोडाऊन झाले आहे. त्यामुळे या उद्यानातील शौचालय चोरीस गेले कि काय? अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. याबाबत पुढाकार घेत शिवसेना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करत लवकरात लवकर शौचालय मलनिसारण वाहिनीला जोडून जनतेसाठी खुले […]

Continue Reading 1
shivsena

पवईत रिपाईला खिंडार, पंडागळे यांचा शिवसेनेत प्रवेश

महानगरपालिका निवडणूक आता काही महिन्यांवर असतानाच, पक्ष व्यवस्थेला कंटाळून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि कणा मानले जाणारे सुरेश पंडागळे यांनी आपल्या समर्थकांसह, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, विभाग प्रमुख दत्ता दळवी, शाखाप्रमुख निलेश साळुंखेसह अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे एकीकडे शिवसेनेची ताकत पवईत वाढत असतानाच रिपाईला मात्र हे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes