Tag Archives | संशय

घटनास्थळ

पवई येथील चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक

तुंगागाव येथील चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी रवी सोलंकी (२१) व इरफान (२१) अशा दोघांना आज (शनिवारी)अटक केली असून, अंधेरी कोर्टात दोघांना सादर करण्यात आले असता त्यांना अधिक तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. आजी-आजोबा आणि आत्यासोबत पवईतील साकिविहार रोडवरील तुंगागाव मुरली चाळीत […]

Continue Reading 3
घटनास्थळ

तुंगा परिसरातून हरवलेल्या लहान मुलीचा सापडला मृतदेह

तुं गा परिसरातून गायब झालेल्या श्रीया अजय मेश्राम, हिचा मृतदेह आज (बुधवारी) दुपारी १ वाजता तुंगा परिसरातील कृष्णा बिजनेस पार्क भागातील झाडीत, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या टाकीत आढळून आला आहे. रविवार रात्री ११ पासून तुंगागाव, साकीविहार रोड परिसरातून श्रीया गायब होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्यात आला असून, पोलिसांनी अपहरण, बलात्कार, हत्या व पोस्का […]

Continue Reading 0
Screenshot

रोहित वैमुला आत्महत्येच्या निषेधार्थ पवईकरांचा रास्ता रोको

ठिकठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते व जनतेचा मूक मोर्चा, रास्ता रोको आणि कॅन्डेल मार्च हैद्राबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वैमुला याच्या आत्महत्येचे पडसाद देशभर उमटत असताना, शनिवारी सकाळी आयआयटी पवई येथील नागरिकांनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून व काही काळ रास्ता रोको करून आपला निषेध नोंदवला. युथ पॉवर सह धम्मदीप सोशल कल्चरल असोसिएशन, साय्यमो व्हुमन संस्था, स्वराज्य युथ […]

Continue Reading 0
VK

खोट्या नावाने नोकरी मिळवून, ४ लाखाची चोरी करणाऱ्या मोलकरणीला पवईमध्ये अटक

सावधान इंडिया मालिकेतून प्रेरित होऊन अनेक महाविद्यालीन मुलींना चित्रपट क्षेत्रात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे तपासात उघड काम मिळवून देणाऱ्या संस्थेत खोटी कागदपत्रे सादर करून, पवईमधील रहेजा विहार येथे एका व्यावसायिकाच्या घरात २४ तास मोलकरणीचे काम मिळवून, त्यांचा विश्वास संपादन करून ३.५ लाखाचे दागिने आणि ५० हजाराच्या रकमेवर हात साफ करणाऱ्या वैजयंती मोरेश्वर कामत […]

Continue Reading 0
prashn

आयआयटीच्या मुलाचा घात कि अपघात?

दिड महिन्यांपासून गायब असणारा व कर्जतच्या जंगलात भ्रमंतीसाठी गेलेला आयआयटी मुंबईचा (पवई) विद्यार्थी श्रीनिवास चंद्रशेखरचा मृतदेह कर्जत तालुक्यातील सांडशी जंगलात डोंगरकपारीत आढळून आला. २५ ऑक्टोबर रोजी कर्जतच्या जंगलात भ्रमंतीसाठी गेलेला श्रीनिवास अचानक गायब झाला होता. याची माहिती हॉस्टेल सहकार्यांनी त्याच्या पालकांना दिल्यानंतर, आईवडिलांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दिली होती. शेवटी शोधपथकाला शुक्रवारी संध्याकाळी ७ […]

Continue Reading 1
dahshat, student activity

संशयित व्यक्तींच्या वावरामुळे हिरानंदानीत खळबळ

हिरानंदानीतील हेरिटेज सर्कल भागात तीन तरुण संशयास्पदरित्या हालचाल करत असून, ते मानवी बॉम्ब असल्याची शक्यता आहे. अशी बातमी मंगळवारी संध्याकाळी संपूर्ण हिरानंदानी परिसरात पसरली आणि एकच खळबळ माजली. पवई पोलीस आणि हिरानंदानी कमांडोने त्वरित तिथे दाखल होत त्या तरुणांसह त्यांच्या आणखी एक साथीदार जो गाडीत बसून सगळ्या हालचालींचे चित्रीकरण करत होता त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे […]

Continue Reading 0
bomb scare

हिरानंदानीत बॉंम्ब’बोंब, बॉंम्बशोधक पथकाच्या हाती कपडे, बूट आणि वैयक्तिक सामान

हिरानंदानीतील एका व्यावसायिक इमारतीत, रात्रीच्या वेळी एक अनोळखी इसम ‘मी या कंपनीत काम करतो माझे वर काम आहे जाऊन येतो’, म्हणून सुरक्षारक्षकाजवळ बॅग सोडून गेला तो बराचवेळ परत आलाच नाही. उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर सुद्धा जेव्हा कोणीच बॅग घेऊन जाण्यास आले नाही, तेव्हा कदाचित हा घातपाताचा प्रयत्न तर नाही ना असा अंदाज बांधून प्रथम पोलीस आणि […]

Continue Reading 0
road romio

पनिशमेंट ऑन दि स्पॉट: हिरानंदानीत रोडरोमिओला पिडीत युवतीचा सहकाऱ्यासोबत बेदम चोप

बुधवारी संध्याकाळी हिरानंदानीत चहा पित उभ्या असलेल्या युवतीचे मोबाईलमध्ये फोटो काढणाऱ्या एका रोडरोमिओला, युवतीने तिच्या मित्रासोबत बेदम चोप दिला. रोडरोमिओला चोप रुपी मिळालेल्या शिक्षेनंतर, त्याने युवतीची माफी मागितली आणि काढलेले फोटो डिलीट केले. त्यानंतर त्याला समज देवून पोलिसांच्या स्वाधीन न करता सोडून देण्यात आले. रोडरोमिओने यावेळी त्याचे नाव कमलेश परमार असून तो फिरायला आला होता असे […]

Continue Reading 0
air baloon

पवईकरांच्या भीतीचा फुगा फुटला, पॅराशूट नसून निघाले फुगे

विमानतळ परिसरात दिसलेले पॅराशूट हे कदाचित घातपाताच्या उद्देशाने तिथे आले होते, परंतु ते त्यात सफल होऊ शकले नाहीत आणि ते थेट पवईच्या दिशेने आले आहेत. अशी बातमी पवई परिसरात फिरत असतानाच, सोमवारी दिवसभर विविध तपास यंत्रणांनी पवई भागात राबवलेल्या तपास मोहिमेने पवईकरांची चांगलीच पाचावर धारण बसली. परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु मंगळवारी […]

Continue Reading 0
hatya

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीवर चाकूने हल्ला

आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून, पवईच्या फुलेनगर परिसरात पतीने दारूच्या नशेत, आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. जखमी विवाहितेचे नाव सविता खरात (२७) असून, तिला सायन रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर तिथे उपचार सुरु आहेत. ह्या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून, आरोपी पती संदिप […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes