साकीनाका, खैरानी रोड येथील दुकानाला आग लागल्याची घटना १९ जानेवारीला मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या आगीत तीन जण गंभीररित्या जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खैरानी रोड, न्यू इंडिया मार्केट येथील रेहमानी हॉटेल जवळील एका दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत […]
