Tag Archives | हिरानंदानी हॉस्पिटल

ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, लेखक पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (बुधवारी) सकाळी १०.३० वाजता विक्रोळी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. पद्मश्री मुझफ्फर हुसेन प्रख्यात लेखक, विचारवंत म्हणून सुपरिचित होते. त्यांना […]

Continue Reading 0
fake-cert

पवई किडनी रॅकेट: खोटी कागदपत्रे बनवणाऱ्या आरोपीला अटक

हिरानंदानी रुग्णालयातून उध्वस्त करण्यात आलेल्या किडनी रॅकेटसाठी खोटी कागदपत्रे बनवून देणाऱ्या व्यक्तीचा सुरु असलेला पवई पोलिसांचा शोध अखेर संपला आहे. पोलिसांसोबत लपाछपीचा डाव खेळत असणाऱ्या सईद अहमद खान (६७) याला पवई पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली आहे. खानने किडनी रॅकेटचा मुख्य सूत्रधार भेजेंद्र भिसेन याला सर्व खोटी कागदपत्रे पुरवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शनिवारी […]

Continue Reading 0
RTE---ok-image---traffic-ou

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हिरानंदानीतील रस्ते होणार ‘वन वे’

हिरानंदानी परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी हिरानंदानी विकासकाने पाऊले उचलत, आकार अभिनव कन्सल्टंट माध्यमातून वाहतूक समस्येचा अभ्यास केला आहे. समोर आलेल्या माहितीच्या आधारे वाहतूक विभागाला याचा अहवाल सोपवला आहे. या अहवालानुसार हिरानंदानीतील काही रस्ते एकमार्गी (वन वे) करण्याचे सुचवले आहे. गेल्या काही महिन्यात हिरानंदानीत वाहतुकीच्या समस्येने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. दररोज वाढत जाणाऱ्या या […]

Continue Reading 0
kidney-racket

किडनी रॅकेट: अटक डॉक्टरांना २६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

किडनी रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या हिरानंदानी रुग्णालयाच्या पाचही डॉक्टरांना शुक्रवारी २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यात रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय संचालक व तीन डॉक्टरांचा समावेश आहे. जुलै महिन्यात हिरानंदानी रुग्णालयात बोगस किडनी रॅकेट उघडकीस आले होते. मुख्य सूत्रधार भैजेन्द्र भिसेनसह विविध ९ आरोपींना पवई पोलिसांनी यामध्ये अटक केली होती. […]

Continue Reading 1
छायाचित्र श्रेय: बीझब्लॉग

किडनी रॅकेट: अटक केलेल्या पाचही डॉक्टरांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

आरोग्य संचालनालयाच्या अहवालाच्या आधारे व अवयव प्रत्यारोपण समन्वयकाच्या जवाबाच्या आधारावर डॉक्टरांना अटक हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या पाचही डॉक्टरांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोग्य संचालनालयाच्या अहवालाच्या आधारे व अवयव प्रत्यारोपण समन्वयकाच्या जवाबाच्या आधारावर डॉक्टरांना अटक करण्यात आल्याचे समोर येत आहे. अटक केलेल्या पाच डॉक्टरांपैकी एक जण रुग्णालयाचा […]

Continue Reading 0
kidney racket

पवई किडनी रॅकेट: हिरानंदानी हॉस्पिटलच्या सीईओसह पाच डॉक्टरांना अटक

पवईतील हिरानंदानी रुग्णालयात चालणारे किडनी रॅकेट गेल्या महिन्यात उघडकीस आले आहे. ज्यात ९ लोकांना अटक करण्यात आली होती. याचाच तपास करणाऱ्या पवई पोलिसांनी हिरानंदानी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह पाच डॉक्टरांना मंगळवारी रात्री अटक केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुजित चटर्जी, वैद्यकीय संचालक डॉ अनुराग नाईक, डॉ मुकेश शेटे, डॉ मुकेश शहा, व डॉ प्रकाश […]

Continue Reading 0
RTE---ok-image---traffic-ou

शालेय वाहनांमुळे हिरानंदानी हॉस्पिटलजवळ वाहतूक कोंडी

संपूर्ण पवईला आधीच वाहतूक कोंडीने वेढलेले असतानाच, यात अजून भर पडत चालली आहे ती हिरानंदानी हॉस्पिटल समोर असणाऱ्या शाळेच्या वाहनांच्या बेजबाबदार पार्किंगमुळे. ज्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीच्या समस्येने डोके वर काढले आहे. शाळा व हॉस्पिटल प्रशासनाने कानाडोळा केला असून, वाहतूक विभागाने सुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर चालू […]

Continue Reading 2

पवई किडनी रॅकेट: हिरानंदानी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यास अटक

पवई किडनी रॅकेटचा तपास करणाऱ्या पवई पोलिसांनी या किडनी रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या हिरानंदानी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. निलेश कांबळे (३६) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, अवयव प्रत्यारोपण समन्वयक म्हणून तो काम पाहतो. या कामासाठी त्याला देण्यात आलेले ८ लाख रुपये त्याच्या पनवेल येथील घरातून पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यापूर्वीही अशा प्रकरच्या केसेसमध्ये परवानगी मिळवून […]

Continue Reading 0
छायाचित्र श्रेय: बीझब्लॉग

हिरानंदानी रुग्णालयाची अवयव प्रत्यारोपण मान्यता रद्द

किडनी रॅकेट उघडकीस आल्यानंतर राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण समितीचा निर्णय गुरुवारी पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेली शस्त्रक्रिया थांबवून, समाजसेवक आणि पवई पोलिसांनी किडनी रॅकेट उध्वस्त केल्यानंतर हिरानंदानी हॉस्पिटलला कोणत्याही प्रकारचे अवयव प्रत्यारोपण करण्यास तात्पुरत्या स्वरुपात बंदी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय अवयव प्रत्यारोपण समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी काही समाजसेवकांनी पोलिसांना हिरानंदानी रुग्णालयात किडनी रॅकेटच्या […]

Continue Reading 0
kidney racket

पवईत किडनी रॅकेटचा पर्दाफाश, चार जणांना अटक

लोकांना फसवून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे संमती मिळवून किडनी रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी समाजसेवकांच्या मदतीने गुरुवारी पर्दाफाश केला आहे. भादवि कलम १२० (ब), ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा नोंद करत मुख्य सूत्रधारासह चार लोकांना या गुन्ह्यात अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये रुग्णाच्या मुलाचा सुद्धा समावेश आहे. मुख्य सुत्रधार भैजेंद्र भिसेन (४२), […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes