Tag Archives | आयआयटी पवई कॅम्पस

iit powai

आयआयटी पवईत ४० रुग्ण ठेवल्याची माहिती खोटी – जनसंपर्क अधिकारी

आयआयटी मुंबईत काम करणारे हाऊसकिपिंग कामगार सहीत अन्य विभागात काम करणाऱ्या काही लोकांकडून पवईत या कॅम्पसमध्ये ४० रूग्ण आणण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. आमची ड्युटी तिथेच आहे असं ‘डंके की चोट पर’ सांगितले जात आहे. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या संदर्भात आयआयटी मुंबई जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती विचारली असता […]

Continue Reading 0
iit powai

आयआयटी मुंबईचे विलगीकरण केंद्र रद्द

पवईतील दोन ठिकाणी सी कॅटेगरीमधील बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी केंद्र उभी करण्याची लगबग सुरु होती. आयआयटी पवई आणि रहेजा विहार येथील प्रशिक्षण केंद्रात हे विलगीकरण कक्ष बनवण्यात येणार होते. मात्र ही लगबग सुरु असतानाच आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बनवण्यात येणारे विलगीकरण केंद्र शासनातर्फे रद्द करण्यात आल्याचे तहसीलदार मिलिंद बोरीकर यांनी स्पष्ट केले आहे. जगभर […]

Continue Reading 1
Quarantine stamp

पवईत दोन ठिकाणी तयार होत आहेत विलगीकरण केंद्र

जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने (कोव्हीड १९) भारतात प्रवेश केला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १६६च्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मिळून सध्या ४८ पॉजीटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात पोहचलेल्या या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने सुद्धा ठोस पाऊले उचलली असून, ठिकठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी सेंटर उभी करण्याची लगबग सुरु […]

Continue Reading 0
cattles in IIT, main building

आयआयटी कॅम्पसमध्ये उभा राहणार भटक्या गायी-बैलांसाठी निवारा

आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याला झुंज करणाऱ्या बैलाने धडक देवून जखमी केल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेची आयआयटी प्रशासनाने गंभीर दखल घेत कॅम्पस परिसरात फिरणाऱ्या गाई-बैलांसाठी शेल्टर उभारण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी आयआयटी व्यवस्थापन मंडळाने कॅम्पस परिसरात योग्य अशी जागा पाहण्यास देखील सुरुवात केली आहे. पवईतील आयआयटी मुंबईमध्ये इंटर्नशिप करत असणाऱ्या अक्षय […]

Continue Reading 0
bull attack iit powai

आयआयटी पवईतील विद्यार्थी बैलाच्या धडकेत जखमी

दोन बैलांच्या झुंजीत विद्यार्थ्याला उडवल्याची घटना पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये घडली. या घटनेमध्ये तरुण जखमी झाला आहे. पवईतील आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याला झुंज करणाऱ्या बैलानी धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. जखमी विद्यार्थ्याचे नाव अक्षय लथा असर असे आहे. त्याच्यावर विक्रोळी येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात […]

Continue Reading 0
fire iit

आयआयटीत खाजगी कँटिंगमध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही

रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण पवईतील आयआयटी कॅम्पसमध्ये एका खाजगी कँटिंगमध्ये आग लागल्याची घटना आज संध्याकाळी ९.१० च्या सुमारास घडली. विद्यार्थी, आयआयटी सुरक्षारक्षक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले गेले असून, कँटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. आज (सोमवारी) संध्याकाळी ९.१० वाजताच्या सुमारास आयआयटी कॅपसमध्ये येथील हॉस्टेल क्रमांक ४ जवळ असणाऱ्या […]

Continue Reading 0
iit powai

शाकाहारी जेवणाची ताटे मांसाहारासाठी वापरू नये, आयआयटीत नवा फतवा; विद्यार्थी संतापले

पवई येथील आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवा फतवा काढण्यात आला आहे. येथील विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमध्ये मांसाहार करताना वेगळे ताट घ्यावे. शाकाहारी विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी वापरली जाणारी ताटे मांसाहारासाठी वापरता येणार नाहीत असा फतवाच कॅन्टीन प्रशासनातर्फे काढण्यात आला आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठविला असून, यामुळे भांबेरी उडालेल्या प्रशासनाने याबाबत टोलवाटोलवीची उत्तरे देणे सुरू केले आहे. आयआयटी पवई […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!