Tag Archives | मरोळ

activa theft

सराईत मोटारसायकल चोराला अटक, ४ एक्टिवा हस्तगत

पवई परिसरातून फक्त एक्टिवा मोटारसायकली चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोराला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पवई पोलिसांनी ४ एक्टिवा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. नसीर सद्दान खान (५४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीही २०१५ साली त्याला पवई पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३२ एक्टिवा आणि ४ कार हस्तगत करत मुंबईतील सर्वांत मोठ्या वाहन […]

Continue Reading 0
leopard marol

मरोळमध्ये रहिवाशी इमारतीत शिरला बिबट्या, तीन तासानंतर जेरबंद करण्यात यश

पवई पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या मरोळ भागात सोमवारी सकाळी भटकलेला एक बिबटया रहिवाशी इमारतीत शिरला. सकाळच्या वेळी रहिवाशी आपल्या नियमित धावपळीत व्यस्त असतानाच हा बिबट्या इमारतीच्या परिसरात शिरला. बिबट्या शिरल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. कोणालाही त्रास न देता तळमजल्यावर जिन्याखाली लपलेल्या या बिबट्याला सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी वनखात्याने जेरबंद केले. मरोळमधील विजयनगर परिसरातील […]

Continue Reading 0
cycle theft

पवईत सायकल चोराला अटक, महागड्या सायकली हस्तगत

पवईसह साकीनाका, मरोळ, एमआयडीसी भागात सायकल चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चोराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काल अटक केली आहे. मोहमद आरिफ अन्सारी (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून जवळपास १७ महागड्या सायकली सुद्धा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. पवईसह साकीनाका, मरोळ, एमआयडीसी भागात गेल्या काही महिन्यात सायकल चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला होता. […]

Continue Reading 0
dead body

बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध

सदर बेवारस पुरुष मन्नुभाई खदान येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आला आहे. त्याला राजावाडी रुग्णालयात नेले असता, दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आले असून, पोलीस याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ०५ जून रोजी मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली होती कि, एक इसम बेशुद्धावस्थेत पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या डीपी रोड ९ जवळील मन्नुभाई […]

Continue Reading 0
bewaras

बेवारस इसमाच्या नातेवाईकांचा शोध

सदर इसम नामक निपेंद्र महोन्तो (अंदाजे वय ४०) अशोक टॉवर मरोळ येथे आजारी अवस्थेत मिळून आला होता. याचा उपचारा दरम्यान मृत्यू  झाला असून, पोलीस याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २६ मार्च रोजी मुख्य नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली होती कि, एक आजारी इसम मरोळमधील पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या अशोक टॉवर, मारवाह […]

Continue Reading 0
IMG_0007

पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत

३ एक्टिवा मोटरसायकल १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पवई, साकीविहार, मरोळ भागात मोटार सायकल चोरी करून त्याचे पार्ट काढून मार्केटमध्ये विकणाऱ्या एका सराईत चोराला पवई पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. कमलेश प्रजापती (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुंगागाव येथील रोडसाईड गॅरेजमध्ये तो […]

Continue Reading 3

पोलिस भरतीमध्ये उमेदवाराने उंची वाढवण्यासाठी केसांत लपवली कॅरमची सोंगटी

पोल‌िस भरतीमध्ये डमी उमेदवार उभे केलेल्या तरुणांना पवई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, अजून एका उमेदवाराने चक्क च्युइंगमच्या सहाय्याने काळी सोंगटी चिकटवून उंची वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात मरोळ येथे पोलिस मैदानावर भरती दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करत उमेदवाराला अटक केली आहे. मुंबईत होणाऱ्या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!