Tag Archives | मुंबई क्राईम

परदेशी मद्यांमध्ये भेसळ करून विकणाऱ्याला साकीनाकामधून अटक

मुंबईतील उच्चभ्रू भागांतील बार, पब आणि मद्य दुकानात स्वस्तातील दारू भेसळ करून महागड्या परदेशी मद्यांच्या नावाने विकणाऱ्या एजेंटला राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी, १५ मार्चला साकीनाका येथून अटक केली आहे. साकीनाका येथे असणारा महागड्या मद्याच्या बाटल्यांमध्ये स्वस्तातील दारू भरणारा त्याचा अड्डाही उद्‌ध्वस्त करण्यात आला आहे. विदेशी दारूच्या ३० बाटल्या, ७४६ रिकाम्या बाटल्या, १७८ बुच, २१७ […]

Continue Reading 0
online cheating PPS

ऑनलाईन मैत्री करून फसवणूक करणाऱ्या ठगाला दिल्लीतून अटक

ऑनलाईन मैत्री करत चांदिवली येथील एका खाजगी बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या महिलेला विदेशातून आलेल्या महागड्या वस्तूवरील टॅक्स भरण्यासाठी पैशांची मागणी करून, फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी दिल्लीतून अटक केली आहे. सत्येंदर प्रताप सोवरन सिंह उर्फ मॅनसन रॉड्रिक्स (३३) असे अटक आरोपीचे नाव असून, एक महिला सहकारी नेहा माथूर आणि नायजेरिन […]

Continue Reading 0

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या मास्टरमाईंडला बँगलोरमधून अटक

मेडिकल कॉलेजेसना ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा घालणाऱ्या रॅकेटच्या म्होरक्यासह साथीदाराला पवई पोलिसांनी बँगलोर येथून अटक केली आहे. श्याम हरिप्रसाद यादव उर्फ आर के सिंह (३६) राहणार ओशिवरा आणि त्याचा साथीदार आनंद चांगदेव आघाव (३२) राहणार पंचकुटीर,पवई अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अभिषेक सिंग याचा पोलीस शोध घेत असून, ऑगस्ट महिन्यात […]

Continue Reading 0
kidnap school

पवईत शाळेजवळ विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न?

पवई आयआयटी येथील एका नामांकित शाळेबाहेरून एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी पवईत घडली. याबाबत शाळा प्रशासनाने पवई पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई, आयआयटी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीत शिकणार अनिकेत (बदलेले नाव) हा दुपारी १२.४५ वाजता शाळा सुटल्यानंतर आपल्या […]

Continue Reading 0
गुन्ह्यात वापरलेली एक्टिवा मोटारसायकल

जबरी चोरीच्या गुन्ह्यात दोघांना २४ तासात अटक

रस्त्यात गाडी अडवून चालकाकडून जबरी चोरी करून पसार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हेप्रकटीकरण पथकाने २४ तासाच्या आत अटक केली आहे. प्रदीप चव्हाण (१९) आणि संजय वर्मा (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एक्टिवा मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी आयआयटी मेनगेट येथे पवईतील महात्मा फुलेनगर येथे राहणारे धर्मेंदर अरुण यादव यांची गाडी अडवून मोबाईल आणि […]

Continue Reading 0

पवईत व्यापाऱ्याचे अपहरण; हत्यारांच्या धाकात लुटमार करून आरोपी पसार

पवईतील मिलिंदनगर येथील एक सोनार व त्याच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, पैसे आणि मोबाईल काढून घेत त्यांना बांधून मारहाण करून ठाणे येथे सोडून अपहरणकर्ते पसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत पोलिसांनी अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. पवईतील चैतन्यनगर आयआयटी येथे राहणारे जितेश परमार यांचे मिलिंदनगर येथे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!