Tag Archives | साकीनाका पोलिस

26 year-old was arrested for duping a woman and posing as an IPS officer - id card

आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत तरुणींची फसवणूक, भामट्याला साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत लग्न जुळवणाऱ्या साईटवर तरुणींशी ओळख वाढवून त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी मुसक्या आवळल्या आहेत. अभिजीत परमेश्वर गाढवे (२६) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घाटकोपर येथून अभिजीतला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. साकीनाका पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यातील फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुण यांची काही दिवसांपूर्वी एका मॅट्रीमोनी साईटवर […]

Continue Reading 0

राजस्थानच्या जंगलातून सायबर चोरांना अटक; साकीनाका पोलिसांची कारवाई

चांदिवली परिसरातील दोघांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याला साकीनाका पोलिसांनी राजस्थानातील जंगलातून अटक केली आहे. चांदिवली येथील एका महिलेची वाईन शॉपच्या नावे ऑनलाईन पेमेंटच्या साहाय्याने तर २२ वर्षीय तरुणाची जून महिन्यात लष्करी अधिकारी असल्याचे सांगून, मोटारसायकल विकण्याच्या बहाण्याने फसवणूक केली होती. दोन्ही घटनांमध्ये साकीनाका पोलिसांनी मागवलेल्या कॉल डिटेल्सच्या तपासात एक सामान्य दुवा त्यांना मिळून आला […]

Continue Reading 0

बँक व्यवस्थापक आणि साथीदाराला पाच कोटीची एफडी चोरल्याप्रकरणी अटक

इंडियन ओव्हरसीज बँक साकीनाका शाखेचे माजी व्यवस्थापक त्रिभुवनसिंग रघुनाथ यादव (वय ५०) आणि त्याचा साथीदार मुबारक वाहिद पटेल (वय ५४) यांना साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. माथाडी कल्याण मंडळाच्या सहा मुदत ठेवींमधून पाच कोटी रुपयांच्या अपहार केल्याच्या आरोपाखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुबारक पटेल हा आयुर्वेद डॉक्टर आहे. कापड बाजार आणि […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने २० तरुणांना ठगणाऱ्या टोळीतील एकाला अटक

अमेरिकेत आणि कॅनडात नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करून २० मुंबईकर तरुणांना १० लाखाला ठगणाऱ्या नोकरी रॅकेटमधील एकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. तरुणांनी साकीनाका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आठवीतून शाळा सोडलेल्या बावीस वर्षीय अशोक चौधरी याला सदर गुन्ह्यात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साकीनाका जंक्शन येथे असणाऱ्या ग्लोबस इमिग्रेशन सर्व्हिसेस या त्याच्या […]

Continue Reading 0
cartoon

साकीनाका येथे वाहतूक पोलिसाच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; तिघांना अटक

ट्रिपल सीट जाताना अडवल्याचा राग मनात धरून एका वाहतूक पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याची घटना शनिवारी रात्री साकीनाका येथे घडली. याबाबत साकीनाका पोलिसांनी वयाच्या विशीत असणाऱ्या अब्दुल शेख, सद्दाम शेख आणि इसाक नामक तीन तरुणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांवर होणारे हल्ले नवीन नसून, साकीनाका, पवई भागात गाडी चालकांची पोलिसांवर दादागिरी वाढली आहे. अनेकदा पोलिसांवर […]

Continue Reading 0
sakinaka police

साकीनाका पोलिसांनी मिळवून दिला बेघर आजीला निवारा

साकीनाका पोलिसांनी एका ६५ वर्षीय एकाकी बेघर वृद्ध महिलेला निवारा मिळवून देत पोलिसांमधील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडविले. छत्र हरवल्याने पोलिसांकडे मदतीसाठी धावलेल्या आजीला साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश भालेराव यांनी मदत करतानाच, २२ हजारांची मदत उभी करून २४ तासांच्या आत आजींच्या निवाऱ्याची व्यवस्था केली. १६ मे रोजी लता शिवराजसिंह परदेशी या वृद्ध महिला […]

Continue Reading 1
IMG_8192

साकीनाका पोलीसांची गुन्हेगारी रोखण्यासाठी भित्तीचित्राद्वारे जनजागृती

चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गुन्ह्याचे प्रकार बघूनच अनेक गुन्हेगार गुन्हे करत असतात. साकीनाका पोलिसांनी यावरच एक युक्ती लढवत चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या “व्हिलन”ची भित्तीचित्रे बनवून त्यांच्या आधारे संदेश देताना अधिक मनोरंजक करण्यासाठी त्यांचे प्रसिद्ध संवाद वापरून परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृतीची शक्कल लढवली आहे. साकीनाका पोलिस स्टेशनच्या भिंतीवर चित्रपटातील नामांकित व्हीलनस गुन्हेगारी वाईट आहे, कायदा सुव्यवस्था आणि […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!