Tag Archives | arrested

Mohmmad-Rashid

दोन वर्षापूर्वी जापानी नागरिकाला लुटणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

मुंबईत कामानिमित्त आलेल्या एका जापानी नागरिकाला पवई येथे परतत असताना लुटण्याच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालक राशीद फारूक मुजावर शेख उर्फ पापड याला गुन्हा घडल्याच्या दोन वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या एक चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले असताना त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय जापानी नागरिक […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने २० तरुणांना ठगणाऱ्या टोळीतील एकाला अटक

अमेरिकेत आणि कॅनडात नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करून २० मुंबईकर तरुणांना १० लाखाला ठगणाऱ्या नोकरी रॅकेटमधील एकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. तरुणांनी साकीनाका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आठवीतून शाळा सोडलेल्या बावीस वर्षीय अशोक चौधरी याला सदर गुन्ह्यात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साकीनाका जंक्शन येथे असणाऱ्या ग्लोबस इमिग्रेशन सर्व्हिसेस या त्याच्या […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

बोगस कागदपत्रे बनवणाऱ्या एजंटला मिलिंदनगरमधून अटक

पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवण्यासाठी लागणारी बोगस कागदपत्रे बनवणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी मंगळवारी मिलिंदनगर, पवई येथून अटक केली आहे. फैयाज अहमद अब्दूल राशीद अन्सारी (४१) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवण्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे आणि शिक्के सुद्धा हस्तगत केली आहेत. पाठीमागील १० वर्षांपासून तो अशाप्रकारची बोगस कागदपत्रे बनवत असल्याचेही […]

Continue Reading 0

२.५ लाखाच्या ९० रेल्वे तिकिटांसह बनावट एजंटला पवईतून अटक

एका प्रवाशाने बनावट तिकीट विकली जात असल्याच्या सोशल माध्यमावर केलेल्या तक्रारीच्या आधारावर २८ वर्षीय रिअल इस्टेट एजंटला रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी पवई येथून अटक केली आहे. अंधेरी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाई केली. निलेश पटेल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पवई येथील आपल्या घरातून ट्रेनचे तिकीट बेकायदेशीरपणे विकण्याचे काम तो करत होता. झडतीत […]

Continue Reading 0
Thieves Stolen Gas cylinders from house because they did not get valuable; Two arrested1

चोरीत मौल्यवान वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून गॅस सिलेंडर पळवले; दोघांना अटक

चोर चोरी करायला गेला मात्र घरात काहीच सापडले नसल्यामुळे काय चोरी करावे याचा प्रश्न पडलेल्या चोरट्याने चक्क घरातील २ गॅस सिलेंडर पळवून नेल्याची घटना पवईत घडली आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी माग काढत सादिक उर्फ अव्वा अक्काफी शेख (२३) आणि सलमान उर्फ दस्तगीर अस्लम खान (२८) याला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. पवईतील […]

Continue Reading 0
two arrested in a robbery1

हत्याराचा धाक दाखवून लुटण्याच्या गुन्ह्यात पवईत दोघांना अटक

धंदेवाले आणि नागरिक यांच्याकडून हत्याराचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. असिफ रियाज शेख (२४) आणि साहिल मेहबूब शेख (२६) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांची नावे असून, त्यांच्यावर अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची यापूर्वीही नोंद आहे. अटक दोन्ही आरोपी हे तुंगा गाव पवई येथील रहिवाशी आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Continue Reading 0
online cheating PPS

ऑनलाईन मैत्री करून फसवणूक करणाऱ्या ठगाला दिल्लीतून अटक

ऑनलाईन मैत्री करत चांदिवली येथील एका खाजगी बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या महिलेला विदेशातून आलेल्या महागड्या वस्तूवरील टॅक्स भरण्यासाठी पैशांची मागणी करून, फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी दिल्लीतून अटक केली आहे. सत्येंदर प्रताप सोवरन सिंह उर्फ मॅनसन रॉड्रिक्स (३३) असे अटक आरोपीचे नाव असून, एक महिला सहकारी नेहा माथूर आणि नायजेरिन […]

Continue Reading 0

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग, तरुणाला अटक

चांदिवली, संघर्षनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तरुणाने तिचा भर रस्त्यात विनयभंग केल्याचा प्रकार साकीनाका परिसरात गुरुवारी घडला. नावेद इकबाल शेख (२०) असे तरुणाचे नाव असून, साकीनाका पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हजर केले असता ११ जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तक्रारदार महिला चांदिवलीतील संघर्षनगर येथे आपल्या माहेरील घरी राहते. तिचा पती […]

Continue Reading 0

संपत्तीसाठी मृत आईला केले जिवंत; तिघांना अटक

वडिलोपार्जित संपत्तीत वारसा हक्काने मुलांनाच अधिकार मिळतो. मात्र ही संपत्ती आपल्याला एकट्याला मिळावी म्हणून कधी कधी असे डाव आखले जातात की मृत व्यक्तींना सुद्धा कागदोपत्री जिवंत केले जाते. असाच एक डाव आखून आपली आई जिवंत असल्याचे भासवून, २८५ करोडच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या, मेणबत्ती उत्पादन करणाऱ्या कंपनीचे संचालक असणाऱ्या व्यावसायिक सुनील गुप्ता, त्याची पत्नी […]

Continue Reading 0

सोशल मिडियावर तरुणीची ‘फेक प्रोफाईल’ बनवणाऱ्या तरुणाला कलकत्तामधून अटक

पवईतील हिरानंदानी येथील टीसीएस कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीची फेक (खोटी) प्रोफाईल बनवून, ओळख चोरीचा गुन्हा करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय शॉ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा कलकत्ता येथील २४ परगणा भागच आहे.सोशल माध्यमे सध्याच्या युगात तरुणांची मुलभूत गरज होऊन बसली आहेत. यामाध्यमात अकाऊंट नाही असा […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes