Tag Archives | Avartan Powai

pl led

पवई तलावाचा विकास सीईआरच्या माध्यमातून

पवई तलावाचा कायापालट ‘सांघिक पर्यावरणीय जबाबदारी’च्या (कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंटल रिस्पॉन्सिबिलीटी- सीईआर) माध्यमातून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्तांच्या उपस्थित झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने पवई तलावाचा विकास, मुलुंड ते पवई भागात मियावाकी पद्धतीने वनीकरण,झोपडपट्टी सुधारणा, करोनाविषयी जनजागृतीसाठी चित्रफित, विद्यार्थ्यांना संगणक आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक शिक्षक आदी विविध प्रकल्पांचा यात समावेश आहे. हे प्रकल्प […]

Continue Reading 0
cover photo

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये मराठी पाऊले पडली पुढे

२७ फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ पासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या दोन्हीचे औचित्य साधत पवई इंग्लिश हायस्कूल ने गुरुवार, २७ फेब्रुवारीला […]

Continue Reading 0
arrest

डोक्यात हातोडी घालून पत्नीचा खून; आरोपी पतीला अटक

पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला पवई पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या आहेत. अजित नारायण लाड (६७) असे या आरोपी पतीचे नाव आहे. त्यांच्यावर त्याची पत्नी शिला अजित लाड (६५) हिची हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता १९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवईत महिलेचा राहत्या घरात खून; पती बेपत्ता

पवईतील शिवशक्तीनगर येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय महिला शीला अजित लाड यांचा अज्ञात व्यक्तीने तिच्या राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांना तिच्या नवऱ्याने लिहलेली सुइसाईड नोट मिळून आली असून, तो बेपत्ता आहे. या संदर्भात पवई पोलीस भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. गारमेंट कामगार […]

Continue Reading 0
underground metro 6 camp

मेट्रो-६ भूमिगत करण्याच्या समर्थनात पवईत सह्यांची मोहीम

आज, रविवार (२ फेब्रुवारी) संध्याकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत चांदिवली डी-मार्टजवळ भूमिगत मेट्रो-६ समर्थनात सह्यांची मोहिम राबवली जाणार आहे. पवईतील विविध भागात भूमिगत मेट्रो -६ च्या समर्थनात सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. आज रविवार (२ फेब्रुवारी) चांदिवली डी-मार्टजवळ आणि रहेजा विहार येथे ही मोहिम राबवली जाणार आहे. संध्याकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत भूमिगत मेट्रोच्या मागणीच्या […]

Continue Reading 0
metro - 6 work at powai main

मेट्रो – ६ भूमिगत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती करावी: पवईकरांची मागणी

मुख्यमंत्र्यांनी आरे कार शेड प्रकरणात सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारला असल्याने आम्हाला आशा आहे की ते आमच्या भूमिगत मेट्रोच्या मागणीकडे सुद्धा लक्ष देतील. – पवईकर @प्रमोद चव्हाण मेट्रो – ६ (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) कॉरिडॉरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी पवईकरांनी केली आहे. सोमवारी रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे भूमिगत मेट्रोच्या मागणी आणि भेटी संदर्भातले पत्र सादर केले. […]

Continue Reading 0
meeting about traffic near LHH hospital

शाळा आणि हिरानंदानी प्रशासनाच्या सामंज्यस्यातून हॉस्पिटल जवळील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला; एस एम शेट्टी शाळेजवळचा निर्णय कधी?

सकाळ, दुपार, संध्याकाळ असे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे पवईकरांच्या डोक्याचा ताप आणि हिरानंदानी पवईच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न बनलेल्या हिरानंदानी हॉस्पिटल येथील चंद्रभान शर्मा चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पोद्दार शाळा प्रशासन आणि हिरानंदानी प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून संपुष्टात आलेला आहे. आता एसएम शेट्टी शाळेजवळ होणारया वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी मिटणार असा प्रश्न पवईकर उपस्थितीत करत आहेत. जोगेश्वरी […]

Continue Reading 0
mumbaikarshuman chain on Powai lake for demanding underground metro

भूमिगत मेट्रोच्या मागणीसाठी मुंबईकरांची पवई तलावावर मानवी साखळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारद्वारे सुरू केलेल्या अनेक पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेत निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या अनेक प्रकल्पांना लाल झेंडा दाखवलेला असतानाच मुंबईकरांनी उपनगरामधील भूमिगत मेट्रो कॉरिडोरच्या आपल्या मागणीवर जोर दिला आहे. याच मागणीसाठी शनिवारी (०८ डिसेंबर) मुंबईकरांकडून पवई तलाव भागात मानवी साखळी तयार करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ४.३० ते ६.३० […]

Continue Reading 0
vruksh tod

मेट्रो – ६ घेणार ३४० झाडांचा जीव?

पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर मेट्रो – ६ प्रकल्पात कुऱ्हाड स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मार्गावर चालणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पात ३४० झाडांना आपला जीव गमवावा लागणार असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून समोर येत आहे. पवई, पवई तलाव, रामबाग, साकीविहार, सिप्झ आणि महाकाली भागात असणाऱ्या ३४० झाडांवर या प्रकल्पासाठी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!