Tag Archives | Chandivali

mich majha rakshak

मीच माझा रक्षक: पवईतील तरुणाची अनोख्या पद्दतीने कोरोनाबद्दल जनजागृती

@प्रतिक कांबळे – दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव बघता महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात जनजागृतीसाठी पवईतील समाजसेवक विलास कुशेर यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी पवई परिसरातील प्रमुख दोन रस्त्यांवर ‘गो कोरोना’ आणि ‘मीच माझा रक्षक’ असा संदेश लिहीत लोकांमध्ये याबाबत जनजागृती केली आहे. ‘महाराष्ट्र शासनाने लॉकआउटचा निर्णय घेत नागरिकांना घरी बसण्याच्या सूचना केल्या […]

Continue Reading 0
iit powai

आयआयटी पवईत ४० रुग्ण ठेवल्याची माहिती खोटी – जनसंपर्क अधिकारी

आयआयटी मुंबईत काम करणारे हाऊसकिपिंग कामगार सहीत अन्य विभागात काम करणाऱ्या काही लोकांकडून पवईत या कॅम्पसमध्ये ४० रूग्ण आणण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. आमची ड्युटी तिथेच आहे असं ‘डंके की चोट पर’ सांगितले जात आहे. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या संदर्भात आयआयटी मुंबई जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती विचारली असता […]

Continue Reading 0
iit powai

आयआयटी मुंबईचे विलगीकरण केंद्र रद्द

पवईतील दोन ठिकाणी सी कॅटेगरीमधील बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी केंद्र उभी करण्याची लगबग सुरु होती. आयआयटी पवई आणि रहेजा विहार येथील प्रशिक्षण केंद्रात हे विलगीकरण कक्ष बनवण्यात येणार होते. मात्र ही लगबग सुरु असतानाच आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बनवण्यात येणारे विलगीकरण केंद्र शासनातर्फे रद्द करण्यात आल्याचे तहसीलदार मिलिंद बोरीकर यांनी स्पष्ट केले आहे. जगभर […]

Continue Reading 1
Hiranandani

‘जनता कर्फ्यु’ला पवईकरांचा मोठा प्रतिसाद

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना वायरसचा फैलाव जास्त प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार २२ मार्चला ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा करत जनतेला घरातच राहण्याची विनंती केली. या जनता कर्फ्युला पवईमध्ये नागरिकांनी घरात राहत मोठा प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या हाकेला साथ देत पवई, चांदिवलीतील रहिवाशांनी घरातच राहण्याचा मार्ग निवडत याला मोठा प्रतिसाद दिला […]

Continue Reading 0
bike fire ganeshnagar

पवईत धावत्या मोटारसायकलला आग

@रविराज शिंदे पवई जेवीएलआरवरील गणेशनगर गणेशघाट येथे गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारसायकलला अचानक भीषण आग लागल्याची घटना शुक्रवार, २० मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता घडली. सुदैवाने चालक बचावला असून, मोटारसायकल जळून खाक झाली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत झाल्टे नामक तरुण आपली यामाहा मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ डीजे ३११५ वरून गांधीनगरच्या दिशेने […]

Continue Reading 0
Quarantine stamp

पवईत दोन ठिकाणी तयार होत आहेत विलगीकरण केंद्र

जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने (कोव्हीड १९) भारतात प्रवेश केला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १६६च्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मिळून सध्या ४८ पॉजीटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात पोहचलेल्या या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने सुद्धा ठोस पाऊले उचलली असून, ठिकठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी सेंटर उभी करण्याची लगबग सुरु […]

Continue Reading 0
Coronavirus Photo Credit सांकेतिक चित्र

पालिका एस विभागात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला; घाबरून न जाण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना वायरसचा फटका आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला ही बसला असून, दिवसेंदिवस मुंबईतील बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई पूर्व उपनगरातील बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या भांडूप ‘एस विभाग’ हद्दीत असणाऱ्या उच्चभ्रू वस्तीत राहणारी ४४ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे सोमवारी (१६ मार्च) रोजी चाचणीत समोर आले आहे. “महिला ही १३ मार्च दरम्यान लिसवान, पोर्तुगल […]

Continue Reading 0
powai police Detection team with accuse

महिलेचा खून करून, खाडीत फेकून पुरावा नष्ट करणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी केली अटक

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार ऑगस्ट २०१९ रोजी दाखल झाली होती. याचा तपास सुरु असताना ८ महिन्यानंतर ही महिला हरवली नसून, महिलेचा खून झाला असल्याचे समोर येताच, पवई पोलिसांनी तिचा पूर्व पती आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. निसार सिकुर शेख (३२) आणि धुवचंद्र उर्फ लल्लन तिवारी (३४) अशी अटक […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes