Tag Archives | cyber crime

phishing

आयआयटीच्या विद्यार्थिनीला ऑनलाईन पिझ्झा मागवणे पडले महागात, सायबर चोरांचा २७ हजाराचा चुना

आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एक विद्यार्थिनीला ऑनलाईन पिझ्झा मागवणे चांगलेच महागात पडले आहे. खराब डिलीव्हर झालेल्या पिझ्झाच्या भरपाई रकमेला मिळवण्याच्या नादात सायबर चोरांच्या जाळ्यात अडकून तिला आपल्याच खात्यातील २७ हजार रुपये गमवावे लागले आहेत. पवई पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी पवई कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या सीचा वाजपेयी हिने ऑनलाईन फूड […]

Continue Reading 0
phishing

ओएलएक्सवर सामान विक्रीसाठी ठेवलेल्या दोन पवईकरांना सायबर चोरांचा ८५ हजाराचा गंडा

ओएलएक्सवर आपल्या घरातील जुने फर्निचर आणि गादी विक्रीसाठी जाहिरात करणाऱ्या दोन पवईकरांना बनावट ग्राहक बनून सायबर चोरांनी ८५ हजाराला गंडवल्याचा प्रकार आज (शनिवारी) पवईत उघडकीस आला आहे. पवई पोलीस माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. आयआयटी मुंबई येथे कार्यरत असणारे सनी सदाना (३५) हे आपल्या परिवारासह पवईतील विजय विहार येथे राहतात. […]

Continue Reading 0
phishing

कॅब कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून दोन बहिणींना सव्वालाखाचा गंडा

कॅब कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करत एका ठगाने पवईतील दोन बहिणींच्या खात्यातील सव्वा लाखावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. पवईतील आयआयटी परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाने १८ ऑक्टोबरला माथेरानला फिरायला जाण्यासाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कॅब बुक केली होती. भाड्याचे पेमेंट करण्यासाठी […]

Continue Reading 0
phishing

ऑनलाईन साडी खरेदी करायला गेली आणि ५० हजार घालवून बसली

सध्या उत्सवाचे दिवस असून, ऑनलाईनवर खरेदीला उधान आले आहे. मात्र अशाच प्रकारे ऑनलाईन खरेदी केलेल्या ७९९ रुपयांच्या साडीसाठी रहेजाविहार येथे राहणाऱ्या एका गृहिणीला चक्क ५० हजार रुपये मोजावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करून पवई पोलिस अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील रहेजा विहार येथे राहणारी गृहिणी […]

Continue Reading 0
mobile cyber crime

सायबर फसवणुकीत ५२ वर्षीय व्यक्तीने गमावले १.५८ लाख

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २०१७ पासून ते ई-वॉलेट वापरत आहे. सायबर फसवणूकीच्या घटनेत एका ५२ वर्षीय प्रकल्प व्यवस्थापकाला १.५८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पवई येथे रिअल इस्टेट कंपनीत नोकरीस आहेत. फसवणूक करणार्‍याने मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे तक्रारदार यांच्या फोनवर ताबा मिळवत त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. २०१७ पासून तक्रारदार […]

Continue Reading 0
atm-skimming

एटीएम कार्ड क्लोनिंगद्वारे १६ पवईकरांचे लाखो रुपये उडवले

एकाचवेळी १६ जणांच्या बँक खात्यातून पैसे गायब. पाच जणांची पोलिस ठाण्यात तक्रार. वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएम सेंटरमधून ३.२० लाख रुपये काढले. एकाच वेळी १६ पवईकरांच्या बँक खात्यांना भेदून लाखो रुपये सायबर गुन्हेगारी टोळीने गायब केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या संदर्भात ५ लोकांनी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाचही जणांच्या खात्यामधून वेगवेगळ्या […]

Continue Reading 0

डॉक्टरला प्रीमियमच्या भरण्यासाठी आलेल्या फोन कॉलने १.३५ लाख पळवले

सायबर गुन्हेगारीने आपले जाळे चांगलेच पसरवले असून, पवईतील ६२ वर्षीय ईएनटी तज्ज्ञ याची नुकतीच शिकार झाली आहे. बनावट टेलिकॉलरने पिडीतने घेतलेल्या विम्याची संपूर्ण माहिती देत प्रीमिअमची रक्कम त्वरित नाही भरली तर पॉलिसी लैप्स होवू शकते असे भासवत बँक खात्यात पैशांचे हस्तांतरण करण्यास सांगून १.३५ लाखाचा गंडा घातला आहे. ६ मार्चला पिडीत डॉक्टरला अनिता कोठारी आणि […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!