Tag Archives | featured

fire hiranandani powai

हिरानंदानीत फेब्रीकेशन युनिटला आग

हिरानंदानीमधील जयभीमनगर परिसरात असणाऱ्या फेब्रीकेशन युनिटला रविवारी रात्री १०.२० वाजता आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या ३ बंबांच्या मदतीने १५ मिनिटाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले गेले असून, आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानीची नोंद नाही. सध्या मुंबईत आगीचे सत्रच सुरु आहे. या आगींमध्ये अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पवईमध्ये सुद्धा वारंवार आगीच्या घटना घडत […]

Continue Reading 0
culprits_pic1

इमारतीत घुसून माजी आयआयटी प्रोफेसरच्या कारची तोडफोड

११ जानेवारी २०१८ रोजी रात्री ९.१५ वाजता दोन अज्ञात लोकांनी एसएम शेट्टी शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या आयआयटी बॉम्बे स्टाफ कॉटर्समध्ये रिक्षातून प्रवेश करून, वरिष्ठ नागरिक प्रोफेसर डॉ एस जी मेहंदळे (आयआयटी बॉम्बेचे सेवानिवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी) यांच्या एस्टिलो कारची विंडशील्ड काच फोडल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली असून, पवई पोलीस त्या दोन अज्ञात […]

Continue Reading 0

पवईकरांनी दिल्ली जिंकली; राजपथावर संचालनात महाराष्ट्राचे नेतृत्व

@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण २६ जानेवारी, देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर संचलनात महाराष्ट्राचे नेतृत्व करताना पवईकर सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी संकल्पित केलेल्या चित्ररथाला सर्वोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे महाराष्ट्रासोबतच पवईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे नेत्रदीपक दर्शन या चित्ररथातून समस्त भारतवासीयांना […]

Continue Reading 2
IMG_8192

साकीनाका पोलीसांची गुन्हेगारी रोखण्यासाठी भित्तीचित्राद्वारे जनजागृती

चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गुन्ह्याचे प्रकार बघूनच अनेक गुन्हेगार गुन्हे करत असतात. साकीनाका पोलिसांनी यावरच एक युक्ती लढवत चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या “व्हिलन”ची भित्तीचित्रे बनवून त्यांच्या आधारे संदेश देताना अधिक मनोरंजक करण्यासाठी त्यांचे प्रसिद्ध संवाद वापरून परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृतीची शक्कल लढवली आहे. साकीनाका पोलिस स्टेशनच्या भिंतीवर चित्रपटातील नामांकित व्हीलनस गुन्हेगारी वाईट आहे, कायदा सुव्यवस्था आणि […]

Continue Reading 0

हॉकिंग झोनला आयआयटीकरांचाही विरोध

पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीतून हॉकिंग झोन हटवल्याचे दाखवत असतानाच आयआयटी भागात मात्र बनणाऱ्या हॉकिंग झोन्समध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे येथील नागरिक सुद्धा निराश झाले असून, त्यांनी याला आपला कडक विरोध दर्शवला आहे. सोशल माध्यमातून याची जनजागृती करत लोकांनी पालिकेच्या समोर आपला विरोध ठेवला आहे. […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes