Tag Archives | HIRANANDANI GARDENS

galleria bike

पवईत मोटारसायकल चोरांचा सूळसुळाट; गलेरिया, फुलेनगरमधून दुचाकींची चोरी

@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण पवईमध्ये गेल्या महिनाभरात मोटारसायकल चोरांचा वावर वाढला असून, महिनाभरात दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काल रात्री महात्मा फुलेनगर येथून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पवई परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फुलेनगर येथे राहणारे विकास खांडे […]

Continue Reading 0

हॉकिंग झोनला आयआयटीकरांचाही विरोध

पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीतून हॉकिंग झोन हटवल्याचे दाखवत असतानाच आयआयटी भागात मात्र बनणाऱ्या हॉकिंग झोन्समध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे येथील नागरिक सुद्धा निराश झाले असून, त्यांनी याला आपला कडक विरोध दर्शवला आहे. सोशल माध्यमातून याची जनजागृती करत लोकांनी पालिकेच्या समोर आपला विरोध ठेवला आहे. […]

Continue Reading 0
00

फेरीवाला क्षेत्राच्या विरोधात नागरिकांचा मोर्चा

@प्रमोद चव्हाण पालिका ‘एस’ वार्ड अंतर्गत येणाऱ्या पवईतील हिरानंदानी परिसरातील सर्व रस्त्यांना हॉकिंग झोन घोषित करण्यात आले आहे. फेरीवाले येण्याने होणाऱ्या त्रासाला रोखण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता हिरानंदानी गार्डन रहिवाशी फेडरेशनतर्फे हिरानंदानी येथे शांततापूर्वक विरोध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध समाजसेवी संस्थांसह, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. अधिकृत […]

Continue Reading 0

हिरानंदानीत बांधकाम थांबलेली जागा बनली आजार पसरवणाऱ्या मच्छरांचा उत्पत्तीचा अड्डा

हिरानंदानी गृप दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. स्थानिक नगरसेवक वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या तक्रारीनंतर पालिका एस विभाग अधिकाऱ्यांनी आज भेट देवून केली परिस्थितीची पहाणी. हिरानंदानी विकासकाकडून पवई, हिरानंदानी येथील ओडिसी आणि तिवोली इमारतींजवळ सुरु असणाऱ्या एका नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून थांबवण्यात आले असून, येथे जमा झालेल्या घाण पाण्यामुळे आजार […]

Continue Reading 0

हिरानंदानीत महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी अश्लिल वर्तन

पवईतील चंद्रभान शर्मा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार तरुणी घरी परतत असताना हिरानंदानीतील इटरनिया इमारती समोर एका माथेफिरूने त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करून, अश्लील भाषेत बोलल्याची घटना आज सकाळी ११.४५ वाजता घडली. याबाबत पवई पोलिसांनी भादंवि कलम ३५४ (डी), ५०९ नुसार गुन्हा नोंद करून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी इसमाचा शोध सुरु केला आहे. पवई विहार येथील बीबीएच्या दुसऱ्या वर्षात […]

Continue Reading 0
asd

​हिरानंदानीत घरफोडी, साडेतीन लाखाचा ऐवज साफ

हिरानंदानीतील टोरीनो इमारतीच्या एकतिसाव्या माळ्यावर राहणाऱ्या फिलिप वर्गीस यांच्या घरात प्रवेश करून, अज्ञात चोरट्याने ३.५६ लाखाच्या ऐवजावर हात साफ केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत फिलीप यांनी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. (more…)

Continue Reading 0
हिरानंदानी येथील बिबट्याचे संग्रहित छायाचित्र

हिरानंदानीत पुन्हा बिबट्या

हिरानंदानीतील सुप्रीम बिसिनेस पार्क जवळील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या स्टोर रूममध्ये येथील कामगाराला गुरुवारी सकाळी बिबट्या आढळून आल्याने परिसरात पुन्हा घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेली तीन वर्ष इथून काही अंतरावरील जंगलात वास्तव्य असणारा बिबट्या खाली उतरून आल्याने पवईकरांची चिंता वाढली आहे. गेल्या तीन वर्षापासून ठराविक कालावधीने हिरानंदानी येथे असणाऱ्या टेकडीवरील जंगल भागात लोकांना बिबट्याचे दर्शन […]

Continue Reading 0

तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या, अडी-अडचणी, चांगल्या वाईट गोष्टी तुमच्याच भाषेत मांडणारे आपले माध्यम म्हणजेच ‘आवर्तन पवई’.

मला इंग्रजी उत्तम येते परंतू मी विचार मराठीत करतो. मला इंग्रजी येत नाही परंतू मला भरपूर काही बोलायचे आहे. मला माझ्या शब्दात माझ्या भाषेत बोलायला देणार माध्यमच नाहीये. अश्या सर्वांसाठी त्यांचे सर्वांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे ‘आवर्तन पवई’. तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या, अडी-अडचणी, चांगल्या वाईट गोष्टी तुमच्याच भाषेत मांडणारे आपले माध्यम म्हणजेच ‘आवर्तन […]

Continue Reading 3

Powered by WordPress. Designed by WooThemes