Tag Archives | Hiranandani Hospital

injured

हिरानंदानी लेबर कॅम्पमध्ये पाण्याची टाकी पडून ७ कामगार जखमी, दोघांची स्थिती गंभीर

आज सकाळी हिरानंदानी कॉम्प्लेक्स, पवई येथील कामगार शिबिरात (लेबर कॅम्प) एक प्रचंड प्लास्टिकची पाण्याची टाकी पडून, सात बांधकाम मजूर जखमी झाल्याची घटना घडली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी खैरलाल अलाम (३५) याला हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी कामगार जितेंद्र निषाद (२१), रुपचंद निषाद […]

Continue Reading 0
jehan divecha

पवईत एमबीए विद्यार्थ्याचे अपहरण; अर्धातास गाडीत मारहाण करून निर्जनस्थळी सुटका

गाडीच्या अपघाताचा राग मनात धरून एमबीएच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात पवईत घडली. सोशल मिडियावर मुलीची खोटी प्रोफाईल बनवून, त्याद्वारे फूस लावून विद्यार्थ्याला बोलावून अपहरण करण्यात आले होते. चालत्या गाडीत अर्धा तास चोप देवून सुटका केल्यानंतर प्रकरण समोर आले. पवई पोलिसांनी या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक केली आहे. […]

Continue Reading 0

ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, लेखक पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (बुधवारी) सकाळी १०.३० वाजता विक्रोळी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. पद्मश्री मुझफ्फर हुसेन प्रख्यात लेखक, विचारवंत म्हणून सुपरिचित होते. त्यांना […]

Continue Reading 0

पवईत दिवसाढवळ्या बाईकस्वारांनी पळवली महिलेची सोन्याची चैन

आयआयटी, पवई येथील जीएल कंपाऊंडजवळ कामावरून परतत असणाऱ्या एका महिलेची बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सोन्याची चैन खेचून पळवल्याची घटना पवईत घडली. मिना पंडागळे असे या महिलेचे नाव असून, त्या गरीबनगरमध्ये राहतात. मिना या सकाळी आपल्या सहकारी महिलांसोबत घरी परतत असताना हिरानंदानी हॉस्पिटलजवळ असणाऱ्या हॉटेल गोल्ड कॉइन जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी गळ्यातील दोन सोन्याच्या […]

Continue Reading 0
fake-cert

पवई किडनी रॅकेट: खोटी कागदपत्रे बनवणाऱ्या आरोपीला अटक

हिरानंदानी रुग्णालयातून उध्वस्त करण्यात आलेल्या किडनी रॅकेटसाठी खोटी कागदपत्रे बनवून देणाऱ्या व्यक्तीचा सुरु असलेला पवई पोलिसांचा शोध अखेर संपला आहे. पोलिसांसोबत लपाछपीचा डाव खेळत असणाऱ्या सईद अहमद खान (६७) याला पवई पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली आहे. खानने किडनी रॅकेटचा मुख्य सूत्रधार भेजेंद्र भिसेन याला सर्व खोटी कागदपत्रे पुरवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शनिवारी […]

Continue Reading 0
kidney-racket

किडनी रॅकेट: अटक डॉक्टरांना २६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

किडनी रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या हिरानंदानी रुग्णालयाच्या पाचही डॉक्टरांना शुक्रवारी २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यात रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय संचालक व तीन डॉक्टरांचा समावेश आहे. जुलै महिन्यात हिरानंदानी रुग्णालयात बोगस किडनी रॅकेट उघडकीस आले होते. मुख्य सूत्रधार भैजेन्द्र भिसेनसह विविध ९ आरोपींना पवई पोलिसांनी यामध्ये अटक केली होती. […]

Continue Reading 1
छायाचित्र श्रेय: बीझब्लॉग

किडनी रॅकेट: अटक केलेल्या पाचही डॉक्टरांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

आरोग्य संचालनालयाच्या अहवालाच्या आधारे व अवयव प्रत्यारोपण समन्वयकाच्या जवाबाच्या आधारावर डॉक्टरांना अटक हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या पाचही डॉक्टरांना १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोग्य संचालनालयाच्या अहवालाच्या आधारे व अवयव प्रत्यारोपण समन्वयकाच्या जवाबाच्या आधारावर डॉक्टरांना अटक करण्यात आल्याचे समोर येत आहे. अटक केलेल्या पाच डॉक्टरांपैकी एक जण रुग्णालयाचा […]

Continue Reading 0
kidney racket

पवई किडनी रॅकेट: हिरानंदानी हॉस्पिटलच्या सीईओसह पाच डॉक्टरांना अटक

पवईतील हिरानंदानी रुग्णालयात चालणारे किडनी रॅकेट गेल्या महिन्यात उघडकीस आले आहे. ज्यात ९ लोकांना अटक करण्यात आली होती. याचाच तपास करणाऱ्या पवई पोलिसांनी हिरानंदानी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह पाच डॉक्टरांना मंगळवारी रात्री अटक केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुजित चटर्जी, वैद्यकीय संचालक डॉ अनुराग नाईक, डॉ मुकेश शेटे, डॉ मुकेश शहा, व डॉ प्रकाश […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes