Tag Archives | Hiranandani

letter copy

पंचसृष्टी कॉम्प्लेक्स सोनसाखळी चोरांचा अड्डा, दिवसाढवळ्या होत आहेत चोऱ्या, गस्त वाढवण्यासाठी फेडरेशनचे पोलिसांना पत्र

पवईच्या पंचसृष्टी परिसरातील पंचमहल इमारतीच्या गेटजवळ, गुरुवारी सकाळी ६.४० वा. दोन अज्ञात इसमांनी मोटरसायकल वरून येऊन, एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत महिलेचे नाव राधा शर्मा असून, ती तेथील अनेक घरात जेवण बनवण्याचे काम करते. या परिसरातील अशा प्रकारची ही पहिली घटना नसून, इथे वारंवार सोनसाखळी, मोबाईल, पर्स चोरीच्या घटना […]

Continue Reading 0
1

मुसळधार पावसात पवईत उन्मळून पडली झाडे, अनेक ठिकाणी साठले पाणी, दुपारनंतर परिस्थिती सामान्य

काल मुंबापुरीत झालेल्या मुसळधार पावसात सर्व सेवा ठप्प झाल्या असतानाच पवईत ही अनेक ठिकाणी पाणी साठले होते. झाडे उन्मळून पडली होती. तर अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्यांनी दम तोडलेल्याची चित्रे पाहायला मिळत होती. नहारमध्ये पाणी साचल्याने बाहेर पडलेल्या अनेक स्थानिकांचे हाल झाले तर हिरानंदानीत हेरीटेज गार्डनसमोर क्लिफ एव्हेन्युव रोडवर उन्मळून पडलेल्या झाडाला काल ६ तास हलवण्यात […]

Continue Reading 0
road romio

पनिशमेंट ऑन दि स्पॉट: हिरानंदानीत रोडरोमिओला पिडीत युवतीचा सहकाऱ्यासोबत बेदम चोप

बुधवारी संध्याकाळी हिरानंदानीत चहा पित उभ्या असलेल्या युवतीचे मोबाईलमध्ये फोटो काढणाऱ्या एका रोडरोमिओला, युवतीने तिच्या मित्रासोबत बेदम चोप दिला. रोडरोमिओला चोप रुपी मिळालेल्या शिक्षेनंतर, त्याने युवतीची माफी मागितली आणि काढलेले फोटो डिलीट केले. त्यानंतर त्याला समज देवून पोलिसांच्या स्वाधीन न करता सोडून देण्यात आले. रोडरोमिओने यावेळी त्याचे नाव कमलेश परमार असून तो फिरायला आला होता असे […]

Continue Reading 0
fire

पवईमध्ये पुन्हा भडकली आग, कोणतीही मोठी हानी नाही

पवईच्या लेक होम बिल्डिंगला लागलेल्या आगीला एक आठवडा पूर्ण होतोय कि नाही, तोपर्यंत पवईमधील एस एम शेट्टी शाळेजवळील म्हाडाच्या इमारतीमध्ये एका घरात मंगळवारी सकाळी देवासमोर ठेवलेला आरतीच्या दिव्याची ज्योत कपड्याला लागल्याने आग लागली. रहिवाश्यांची सावधानता आणि घटनेची माहिती मिळताच त्वरित पोहचलेल्या अग्निशमन दलामुळे काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली […]

Continue Reading 0
sm shetty traffic

बेजाबदारपणे उभ्या शालेय बस आणि पालकांच्या गाड्यांमुळे पवईमध्ये वाढतोय वाहतूक कोंडीचा प्रश्न

शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि पवईच्या रस्त्यांवर ‘राजा उदार आन जनता बेजार’ अशी अवस्था सकाळी सकाळी पवईकरांनी अनुभवली. कामाला जाणाऱ्यांची गडबड आणि त्यात शाळेत मुलांना घेवून येणारे बस चालक आणि पालक अशा दोघांनीही शाळेच्या आवारात भर रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमुळे पवईचे सगळे रस्ते सकाळी-सकाळी ‘हाउस फुल्ल’ झाले होते. आधीच पावसाळ्यात गाड्यांच्या कमी झालेल्या वेगांवर […]

Continue Reading 3
datta

जेट एयरवेजचे शिल्पकार सरोज दत्ता यांचे पवईच्या राहत्या घरी निधन

जेट एयरवेजचे शिल्पकार आणि कार्यकारी संचालक सरोज दत्ता (७९) यांचे पवईच्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांनी जेट एयरवेजला जगातील दुसऱ्या स्थानावरची खाजगी एअरलाईन बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. १० तारखेला दिवसभर फोन उचलत नसल्याने आणि घराचा दरवाजाही उघडत नसल्याने नातेवाईकांनी पोलिसांना सूचना दिली होती. डुप्लीकेट चावीने दरवाजा उघडल्या नंतर ते बाथरूम मध्ये […]

Continue Reading 0
छायाचित्र: ऑलीविया डिसुझा

लेक होम आग प्रकरण: लेक लुक्रीन सोसायटी विरोधात गुन्हा दाखल

पवई येथील लेक होम्स, लेक लुक्रीन या २१ मजली इमारतीच्या १४व्या मजल्यावर शनिवारी ६ जूनला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर २८ जण जखमी झाले होते. या आगीची चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती, त्यांनी गुरुवारी आपला अहवाल अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना सादर केला. पाण्याची फवारणी करणारे स्प्रिंकलर्स इमारतीत १४व्या […]

Continue Reading 0
j dey

जे. डे हत्या प्रकरणात दहा आरोपींवर मोक्का अंतर्गत आरोप निश्चित

वरिष्ठ पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे. डे, यांची पवईमध्ये जून २०११ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येत शामिल असलेल्या दहा आरोपींविरुद्ध विशेष मोक्का न्यायालयाने आरोप निश्चित केले असून त्यात महिला पत्रकाराचाही समावेश आहे. विशेष कोर्टाचे न्या. ए. एल. पानसरे यांच्यापुढे हा खटला सुरू आहे. या सर्वां विरुद्ध मोक्का, आयपीसी व अन्य कायद्याखाली आरोप ठेवण्यात […]

Continue Reading 0
छायाचित्र सहाय्य: mytravefootprints.blogspot.in

यंग इन्वायरमेंटचा झाडे लावा झाडे जगवाचा नारा, हजारो चिमुकल्या हातांना वृक्षारोपणाचे धडे

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या पवईच्या यंग इन्वायरमेंट ग्रुपच्यावतीने, लहानग्यांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे धडे देण्यासाठी “या झाडे लावूया” या उपक्रमाचे आयोजन हिरानंदानीच्या हेरीटेज गार्डनमध्ये ५ जूनला संध्याकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने बालक-पालक अशी जोडी या उपक्रमात सहभाग नोंदवणार आहे. माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes