Tag Archives | IIT

lake home

लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी

चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]

Continue Reading 0
dyanmandir school

पवईत शाळेतील छताचा भाग कोसळल्याने विद्यार्थी जखमी

पवईतील आयआयटी भागात असणाऱ्या ज्ञान विद्यामंदिर शाळेच्या छताचा काही भाग कोसळून शाळेत असणारे ४ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सोमवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी पवईत घडली. शाळेने त्वरित विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार करून पालकांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे पालकांच्यात नाराजी असून, वेळच्या वेळी विद्यार्थ्यांकडून फी उकळणारे शाळा प्रशासन इमारतीच्या डागडुजीत कानाडोळा करत असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. या […]

Continue Reading 0
marthon car break

मॅरेथॉन पडली महागात, चोरट्यांनी गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू लांबवल्या

पवई आयआयटीमध्ये रविवारी पहाटे मॅरेथॉनसाठी आलेल्या लोकांच्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्या चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंच्या जवळपास ५ वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी पवईत घडली आहे. चोरट्यांनी गाड्याच्या काचा फोडल्यानंतर महागडे मोबाईल, पाकीट तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड लंपास केले आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांना माहिती देण्यात आली असून, ते अधिक […]

Continue Reading 0
Eco Friendly Ganeshas

युवा पर्यावरण प्रेमींनी बनवला इको गणेशा, यंग एन्वायरमेंटलिस्ट्स ट्रस्टचा उपक्रम

गणेशोत्सवाची सगळीकडे धूमधाम सुरु आहे. या उत्सवादरम्यान पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून मिठी नदी आणि पवई लेकच्या मातीपासून शेकडो पर्यावरण प्रेमी तरुणांनी लोकांनी पर्यावरणपूरक गणेशाची निर्मिती केली. यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टने यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा […]

Continue Reading 0
IMG_3360

दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पाचे मंगळवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. सोमवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दिड दिवस पाहूणचार घेतल्यानंतर मंगळवारी […]

Continue Reading 0
DSC09622

पवई तलावावर जलपर्णींचे साम्राज्य; सहा महिन्यांपासून स्वच्छता नाही

कंत्राटदाराची नेमणूक करणे बाकी असल्यामुळे मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ असणाऱ्या पवई तलावाला सहा महिन्यांपासून साफ केले गेले नाही. जर लवकरात लवकर जलपर्णीना काढून टाकले नाही तर लवकरच तलावाचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापला जाईल अशी चिंता पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबईचे वैभव असणारा पवई तलाव दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची पाणी साठवण्याची क्षमता हळू हळू […]

Continue Reading 0
traffic police action

पवईत शालेय वेळेत शाळेजवळ वाहने पार्क करताय? सावधान ! भरावा लागू शकतो ५००० रुपयांचा दंड

साकीनाका वाहतूक विभागाकडून गुरुवारी शाळेजवळ आणि मुख्य रस्त्यांवर पार्क गाड्यांवर करण्यात आली कारवाई. दुपारी १२ ते १ वेळेत शाळेजवळ आणि त्याच्या मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग’. पवई भागात सध्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात शालेय वेळेत पालक, शालेय विद्यार्थ्यांना घेवून येणारी खाजगी वाहने रस्त्यांवर पार्क केल्याने वाहतूक कोंडी जास्तच वाढत असते. या समस्येवर […]

Continue Reading 1
pehs say no to drugs2

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती

तरुण पिढीला सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण, तरुणी त्याच्या आहारी गेली आहेत. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा नवीन नाहीत. अशावेळी आपल्या विद्यार्थ्यांना काय योग्य आणि काय अयोग्य; एक वाकडे पाऊल आयुष्य कसे उध्वस्त करू शकते याची जाणीव करून देण्यासाठी पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये २६ जून, “जागतिक अंमली पदार्थ […]

Continue Reading 0
public toilet

पवई, जेव्हीएलआरवरील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था; नागरिकांची प्रचंड गैरसोय

@प्रमोद चव्हाण, रविराज शिंदे आंदोलने, पोलीस कोठडी आणि सततच्या पवईकरांच्या पाठपुराव्याच्या खटाटोपीनंतर अखेर जुलै २०१५ मध्ये मंजुरी मिळून जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरील मुख्य गणेश विसर्जन घाट, आयआयटी मार्केट जंक्शन आणि गांधीनगर येथे महानगर पालिकेकडून सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली. मात्र काही दिवसातच पालिकेच्या देखरेखेखाली असणाऱ्या आयआयटी मार्केट जंक्शन आणि गांधीनगर येथील शौचालयांची दुरावस्था झाली असून, पाठीमागील दोन […]

Continue Reading 0
gopal sharma circle1

बेजबाबदारपणे उभ्या शालेय बस, खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्यांमुळे हिरानंदानी जाम

एस एम शेट्टी शाळा, पोद्दार स्कूल आणि हिरानंदानी प्री-पायमारी स्कूल यांच्या वाहनांमुळे हिरानंदानी आणि जलवायू विहार भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यात काहीच फरक पडला नसून, शाळेच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. याबाबत आता वाहतूक विभाग सुद्धा हतबल झालेला दिसत असून, नक्की करायचे काय? हा […]

Continue Reading 0
tree plant IIT

पालिका उद्यान विभागाच्या मदतीने पवईत वडाच्या झाडाला जीवदान

देशभर जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असतानाच पवईतील फुटपाथवरील एका बेवारस वडाच्या झाडाला महानगरपालिका ‘एस’ वॉर्ड उद्यान विभागातील उद्यान विद्या सहाय्यक अधिकारी अक्षया म्हात्रे आणि पवईतील नागरीकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. या वाचवलेल्या वडाच्या झाडाला आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात पुनर्रोपण करण्यात आले आहे. ‘पवई, आयआयटी येथील हरेकृष्ण रोडवर फुटपाथवर एक वडाचे झाड असून, […]

Continue Reading 0
1

पवईत संत रविदास जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

@अवि हजारे संत शिरोमणी रविदास संघटनेतर्फे २५ फेब्रुवारी रोजी पवईच्या शिवकृपा इमारतीजवळील चौकात संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात महापुरुषांचे विचार आणि त्यांनी सांगितलेला मार्गावर विचारमंथन करण्यात आले. या प्रसंगी विचारमंचावर स्थानिक भाजप नगरसेविका वैशाली पाटील, अखिल भारतीय परिवार महाराष्ट्र महासचिव विरेंद्र धिवार, […]

Continue Reading 0
suspect

रमाबाईनगरमधून चोरट्याने मोबाईल पळवले; संशयित सिसिटीव्हीत कैद

पवई, आयआयटी येथील रमाबाईनगर येथील घरात घुसून दोन मोबाईल लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे पवईत घडली आहे. मोबाईल चोरी करून पसार होणारा हा संशयित चोरटा येथील सिसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरु आहे. अशा प्रकारे घरात घुसून चोरी करणारी टोळीच परिसरात कार्यरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गणेश गायकवाड हे आयआयटी येथील रमाबाईनगर येथे […]

Continue Reading 0

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या मास्टरमाईंडला बँगलोरमधून अटक

मेडिकल कॉलेजेसना ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा घालणाऱ्या रॅकेटच्या म्होरक्यासह साथीदाराला पवई पोलिसांनी बँगलोर येथून अटक केली आहे. श्याम हरिप्रसाद यादव उर्फ आर के सिंह (३६) राहणार ओशिवरा आणि त्याचा साथीदार आनंद चांगदेव आघाव (३२) राहणार पंचकुटीर,पवई अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अभिषेक सिंग याचा पोलीस शोध घेत असून, ऑगस्ट महिन्यात […]

Continue Reading 0
powai-thief-broken-car-windows-and-stolen-cash-and-valuables

पवईत चोरट्यांचा सुळसुळाट; गाड्यांच्या काचा फोडून ५ लाखांची चोरी

आयआयटी पवई येथील मॅरेथॉनवेळी १२ गाड्या फोडून चोरीच्या घडलेल्या गुन्ह्याचे काहीच धागेदोरे हाती लागले नसतानाच, पवईत पुन्हा गाडीच्या काचा फोडून ५ लाखांपेक्षा जास्तीच्या रक्कमेच्या चोरीचा गुन्हा घडला आहे. हिरानंदानीतील वेरोना फ़ाऊंटन येथे दोन तर नोरिटा बस स्टॉप येथे हे गुन्हे घडले आहेत. परिसरात मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पवई पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला आहे. पाठीमागील महिन्यात […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!