Tag Archives | JVLR

b

पवई बंद ! भिमसैनिकांचा पवईत रास्ता रोको

भीमा कोरेगाव येथे विजय दिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या लोकांवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ मुंबईत आज ठिकठिकाणी भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पवईमध्ये सुद्धा भीमसैनिकांनी आदीशंकराचार्य मार्गावर उतरून रास्तारोको केले. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे २०० वा विजय दिवस साजरा करण्यासाठी पोहचलेल्या लोकांवर भ्याड हल्ला करण्यात आला होता. याचेच पडसाद हळूहळू शहरांमध्ये उमटू लागल्याने […]

Continue Reading 0
IMG_5175

कडक पोलीस बंदोबस्तात आदि शंकराचार्य मार्गावरील मारुती मंदिर भुईसपाट

१९२५ पासून थाटात उभे असणारे आदि शंकराचार्य मार्गावरील मारुती मंदिर आज सकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास हटवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत पालिकेने सकाळी हि निष्कासनाची कारवाई केली. भक्तांच्या भावनांचा उद्रेक होवून वातावरण बिघडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. ९२ वर्षापूर्वी पवई तलावाचे काम सुरु असताना मारुतीची मूर्ती श्रीधर परांजपे […]

Continue Reading 0

आयआयटी येथील जेव्हीएलआरवरील मारुती मंदिर अखेर हटणार, भक्तांचा आंदोलनाचा इशारा

गेली अनेक वर्षे मारुती मंदिर वाचवण्यासाठी भक्तांची चालू असलेली धडपड अखेर संपुष्टात आली आहे. लवकरच पवईमधील आयआयटीजवळ जेव्हीएलआरवर असणारे मारुती मंदिर हे हटवून बाजूलाच असणाऱ्या राम मंदिरात येथील मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. ५ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर मालक परांजपे यांनी याला संमती दर्शवली असून, विशेष […]

Continue Reading 0

भरधाव ट्रेलर मारूती मंदीरात घुसला, मोठे नुकसान

जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर भरधाव वेगात धावणारा एक ट्रेलर आयआयटी पवई येथील मारुती मंदिरामध्ये घुसल्याची घटना (आज) रविवारी रात्री ३.३० वाजता घडली. या घटनेत मंदिराचा मंडपासह परिसरात असणारे एक जुने झाड आणि मूळ गाभाऱ्याची उजव्या बाजूची भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे. ट्रेलर चालक जमादार मोहम्मद अली (४०) याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. घटना […]

Continue Reading 0

युथ पॉवरच्या छत्री वाटप आंदोलनाला ‘बेस्ट’ यश; बस थांब्यावर बसवले छप्पर

रविराज शिंदे पवईमधील आयआयटी येथील सर्वच बस थांब्यांवर छप्पर नसल्याने प्रवाशांना पावसाळ्या सोबतच उन्हातान्हात सुद्धा त्रास सहन करत बस येईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत होते. या बस थांब्यावर छप्पर उभारण्यात यावेत यासाठी, ‘युथ पॉवर’ संघटनेच्यावतीने बेस्ट प्रशासनाला कानपिचक्या काढत प्रवाशांना छत्री वाटप करून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची बेस्ट प्रशासनाने दखल घेत अखेर पवईतील […]

Continue Reading 0

पवईतील जेव्हीएलआरवरील मारुती मंदिराला तात्पुरता दिलासा

पवईतील  आयआयटी येथे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर असणाऱ्या मारुती मंदिर प्रशासनाने कारवाई थांबण्यासाठी कोर्टात धाव घेतल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने याला तात्पुरती स्थगिती देत, ३ ऑगस्ट पर्यंत नोटीसवर कोणताही निर्णय घेवू नये असे आदेश पालिकेला दिले आहेत. आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) गेल्या ९२ वर्षापासून मारुती मंदिर उभे आहे. पुढे जेव्हीएलआरच्या निर्मिती नंतर हे […]

Continue Reading 0
main

पवईत खाजगी बसचा अपघात, १ ठार १७ जखमी

रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण मालाड येथून मुंब्रा येथे लग्नाच्या रिसेप्शनला जाणाऱ्या एक खाजगी बसचा ट्रिनीटी चर्चजवळ भीषण अपघात झाल्याची घटना काल दुपारी पवईमध्ये घडली. या घटनेत बसमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत. ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पार्कसाईट पोलिसांनी यावेळी बोलताना दिली. यासंदर्भात पोलिसांनी घटनास्थळावरून पसार झालेल्या बसचालका विरोधात […]

Continue Reading 0

पवईत धावत्या बसने एकाला चिरडले

बस थांब्यावर बसची वाट बघत उभ्या असणाऱ्यापैकी एकाला चिरडून बस निघून गेल्याची घटना सोमवारी सकाळी पवईतील रामबाग येथे घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सदर बसचा तपास सुरु केला आहे. चांदिवली येथील संघर्षनगर परिसरात राहणारे शुभम शंकर वाघ (२९) हे सकाळी अंधेरी सिप्झ येथे आपल्या कामाच्या ठिकाणी निघाले होते. तिकडे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी सकाळी […]

Continue Reading 0

आयआयटी येथील मारुती मंदिरावर कारवाईची टांगती तलवार

आयआयटी येथील मारुती मंदिर वाचवण्यासाठी भक्तगणांनी आंदोलन, सह्याची मोहीम, अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असे सर्वोतोपरी खटाटोप करूनही मारुती मंदिराच्या निष्काशनाची टांगती तलवार अजूनही लटकत आहे. गेल्या आठवड्यात पालिकेतर्फे या मंदिराला हटण्यासाठीची दुसरी नोटीस मंदिर मालकांना देण्यात आली आहे. आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) गेल्या ९२ वर्षापासून उभ्या असणाऱ्या मारुती (हनुमान) मंदिराला पिटीशन फॉर लिव्ह टू […]

Continue Reading 2

मारुती मंदिर वाचवण्यासाठी सह्यांची मोहीम

आयआयटी येथील मारुती मंदिराला पालिका ‘एस’ विभागाने निष्कासनाची नोटीस बजावल्यानंतर आता हे मंदिर केवळ एका व्यक्तीच्या मालकीचे नसून आम्हा सर्वांचे आहे म्हणत भक्तमंडळी मैदानात उतरली आहेत. मारुती मंदिर बचाव मोहिमेअंतर्गत मंदिर वाचवण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव बनवण्यासाठी आज (११ एप्रिल २०१७) मारुती मंदिर परिसरात हनुमान जयंती आणि सह्यांची मोहीम असा दुहेरी उपक्रम राबवला जात आहे. मुंबईतील […]

Continue Reading 3

Powered by WordPress. Designed by WooThemes