Tag Archives | mumbai

तुम्ही बाहेर तर कोरोना घरात; पवईकरांनो घरातच थांबा

जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने मुंबईतही प्रवेश केला आहे. या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी आता शासनासह पालिकेने सुद्धा कंबर कसली आहे. यानुसारच ३ एप्रिल पर्यंत पवईतील ३ विविध परिसरांना सिल करण्यात आले आहे. जर पवईकर नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येणे बंद नाही केले तर पवईतील अजूनही काही परिसर सिल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यकता […]

Continue Reading 0
Two containment zones created in Powai

पवईतील दोन ठिकाणे प्रतिबंधित, पालिकेने केले रस्ते सिल

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना केलेल्या असतानाच मुंबईतील कोरोना पॉजिटिव्ह किंवा संशयित मिळून आलेल्या १४६ इमारती/भागांना पालिकेतर्फे प्रतिबंधित करण्यात आले आहे. या उपाययोजने अंतर्गत पालिका ‘एस’ विभागांतर्गत येणारी पवईतील दोन ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. या भागांना पालिकेने सुरक्षित करत मुंबई पोलिसांची सुरक्षा सुद्धा ठेवण्यात आली आहे. सूचना देणारे बॅनर्स या भागात […]

Continue Reading 0
with ratan tata port

पुश पिनने साकारले उद्धव ठाकरे आणि रतन टाटांचे अनोखे पोट्रेट

जेजे स्कूल ऑफ आर्टचा विध्यार्थी असलेल्या पवईकर चेतन राऊत ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संकट समयी नेहमीच देशाच्या सोबत असणाऱ्या टाटांसमूहाच्या रतन टाटा यांचे एक अनोखे पोट्रेट साकारले आहे. त्यांनी कोरोनाच्या लढाईच्या काळात दिलेल्या योगदान आणि कार्याला मानवंदना चेतनने आपल्या या कलेतून दिली आहे. यापूर्वीही त्याने आपल्या कलेच्या माध्यमातून विश्वविक्रमी पोर्ट्रेट साकारली आहेत. देशात कोरोनाचा […]

Continue Reading 0
asha for education 1

आशा फॉर एज्युकेशनतर्फे पवईत गरजूंना धान्य वाटप

@प्रतिक कांबळे: देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी सरकार व अनेक सामाजिक संस्थांकडून गरजूंना अन्न आणि धान्याचे वाटप केले जात आहे. याच सेवेत आपला खारीचा वाटा उचलत पवईस्थित आशा फॉर एज्युकेशन मुंबईतर्फे पवईतील २०० गरजूंना लॉकडाऊनच्या या काळात प्रत्येक आठवड्याला मोफत तांदूळ, ५ किलो पीठ, २ किलो डाळ, २ किलो साखर, १ लीटर […]

Continue Reading 0

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या मदतीला पवईतील तरुणी सरसावल्या

@सुषमा चव्हाण: पूर्वी फक्त चूल आणि मूल यात अडकून पडलेली तरुणी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. कोरोना व्हायरसने आता देशभर हाहाःकार माजवलेला असतानाच लॉकडाऊन स्थितीत अनेक तरुण गरीब गरजूंच्या मदतीला आणि अविरत सेवा पुरवणाऱ्या मुंबई पोलिसांच्या मदतीला पुढे आलेले असतानाच आता पवईतील तरुणी सुद्धा यात मोठा सहभाग नोंदवत असल्याचे समोर आले आहे. कोरोना […]

Continue Reading 0
Quarantine stamp

क्वारंटाईन केले असताना पळून गेलेल्या तिघांवर कारवाई

झारखंडचे निवासी असणारे आणि दुबईवरून भारतात परतल्यानंतर मुंबईत होम क्वारंटाईनमध्ये असताना पळून गेलेल्या त्रिकुटाला पकडून कारवाई करत पवई पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या अत्यंत सुरक्षित अशा विलगीकरण केंद्रात पाठवले आहे. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी दुबईमध्ये इलेक्ट्रिशीयन म्हणून काम करणारे दोघे तर भेटण्यासाठी गेलेला एक असे तीन भारतीय नागरिक मुंबईत विमानाने आले होते. एअरपोर्टवर […]

Continue Reading 0
magar (crocodile) bhandup paws mumbai

सात फुट लांब मगरीला पॉज मुंबईचे जीवनदान

संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असून, आवश्यकता नसताना कोणालाही घरातून बाहेर निघण्याची अनुमती नसताना शिकारीच्या शोधात बाहेर पडलेल्या ७ फुट लांब ७२ किलो वजनाच्या मगरीला पॉज मुंबई च्या प्राणीमित्रांनी तिला पकडून जीवनदान दिले आहे. नंतर तिला नैसर्गिक वास्तव्यात सोडून देण्यात आले आहे. भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलवाहिनीखाली ही मगर आढळून आली होती. पूर्ण मुंबई शहर लॉकडाऊनमध्ये असताना […]

Continue Reading 0
mich majha rakshak

मीच माझा रक्षक: पवईतील तरुणाची अनोख्या पद्दतीने कोरोनाबद्दल जनजागृती

@प्रतिक कांबळे – दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव बघता महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात जनजागृतीसाठी पवईतील समाजसेवक विलास कुशेर यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी पवई परिसरातील प्रमुख दोन रस्त्यांवर ‘गो कोरोना’ आणि ‘मीच माझा रक्षक’ असा संदेश लिहीत लोकांमध्ये याबाबत जनजागृती केली आहे. ‘महाराष्ट्र शासनाने लॉकआउटचा निर्णय घेत नागरिकांना घरी बसण्याच्या सूचना केल्या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes