Tag Archives | PAWS

dear

डोंगरावरून पडून पवईत चितळाचा मृत्यू

पवई परिसरातील डोंगराळ भागात आज २२ एप्रिल २०२० एक चितळ मृतावस्थेत मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयआयटी पवईला लागून असणाऱ्या फुलेनगर जवळील डोंगर भागातील महाकाली मंदिरापाठीमागे हे चितळ मृतावस्थेत मिळून आले. चितळाची वैद्यकीय तपासणी केली असता उंचावरून पडून चितळाचा मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे. या संदर्भात मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी […]

Continue Reading 0
2

पॉज मुंबई तर्फे पवई तलावातून पकडलेल्या सॉफ्टशेल कासवांच्या पिल्लांना जीवनदान

प्लांट अँड अनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) मुंबई आणि अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) स्वयंसेवी संस्थाच्या सतर्क स्वयंसेवकांनी रविवारी दोन मुलांपासून पवई तलावातून पकडलेल्या दोन भारतीय सॉफशेल कासवांना वाचविण्यात यश मिळवले आहे. सविता करळकर या पवई तलावाजवळून बेस्ट बसमधून प्रवास करत असताना, त्यांनी दोन मुलांना पवई तलावातून पकडून कासवाची पिल्ले घेऊन जाताना पाहिले. त्या ताबडतोब बसमधून खाली […]

Continue Reading 0
PAWS

पॉज मुंबईतर्फे प्राणीमित्रांचा सन्मान

मुंबई स्थित स्वयंसेवी संस्था प्लांट अँड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) आणि अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) यांच्यातर्फे वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्यूरो (डब्ल्यूसीसीबी) पश्चिम विभागाचे उपसंचालक एम मारंको, डब्ल्यूसीसीबी कॉन्स्टेबल सप्पन मोहन आणि प्राणीमित्र रूपा अंबर्ले यांना त्यांच्या कार्याबद्दल कौतुक प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. औचित्य होते ते पशु कल्याण पंधरवडा २०२० कार्यक्रमाचे. पॉज मुंबई आणि एसीएफतर्फे […]

Continue Reading 0
Emeral Isle Cruelty1

एल अँड टी एमराल्ड आयल इमारतीत भटक्या कुत्र्यावर क्रूरता करणाऱ्या सुरक्षा रक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल

प्राणीमित्र कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर पवई पोलिसांकडून गुन्हा नोंद पवईतील एल अँड टी एमराल्ड आयल इमारतीत एका भटक्या कुत्र्याला मारहाण करत क्रूरता दर्शवणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या विरोधात अखेर २३ ऑगस्टला पवई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवई पोलिस याचा अधिक तपास करत असून, मुंबईतून पसार झालेल्या आरोपी सुरक्षा रक्षकाचा शोध घेत आहेत. प्राणीमित्र, प्राणी हक्क कार्यकर्ते, […]

Continue Reading 0
DSC09622

तलावाला वाचवण्यासाठी काय करताय? उच्च न्यायालयाने म्हाडा व पालिकेला मागितले उत्तर

नैसर्गिक संपत्ती असणाऱ्या पवई तलावात गेले अनेक महिने दुषित, घाण, गटाराचे पाणी सोडून प्रदूषण केले जात आहे. पवई तलावाची गेल्या काही वर्षात झालेली दुर्दशा विचारात घेता, पवई तलाव वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने म्हाडा व मुंबई महानगरपालिकेने तलावाला वाचवण्यासाठी काय पावले उचलली आहेत? अशी विचारणा केली […]

Continue Reading 0
d

पवई तलाव वाचवण्यापासून पालिका शोधतेय पळवाटा – स्थानिक नागरिक

पवई तलावाला गेल्या अनेक दिवसापासून गटाराचे सांडपाणी सोडून प्रदूषित केले जात आहे. यासंदर्भात स्थानिक जनता आणि पर्यावरणवादी संस्थेने पालिकेला तक्रारी दिल्या आहेत. मात्र हे सर्व पालिकेच्या संगनमताने होत असल्याने, पालिका अधिकारी संस्थेच्या प्रतिनिधिंना भेट देण्यास टाळाटाळ करत आहेत व बेजबाबदार वक्तव्य व उडवाउडवीची उत्तरे देवून पळवाटा शोधत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा […]

Continue Reading 0
DSCN0221

पवई तलावाला मगर पार्क घोषित करा – पॉज मुंबई

पवई तलावात सोडले जाणाऱ्या दुषित, घाण पाण्यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. जे पाहता प्लॅंट एंड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) मुंबईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री (वन आणि पर्यावरण) प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे पवई तलावाला ‘मगर पार्क’ घोषित करण्याची मागणी केली आहे. सोबतच तलाव भागात परवाना आणि विनापरवाना दोन्ही प्रकारे चालणारी मच्छिमारी रोखण्याची मागणी सुद्धा […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!