Tag Archives | Powai Police

ganja arrest

मित्रांसोबत पार्टी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्याने केली फसवणूक; पुण्यातून अटक

पवईकराच्या लोणावळ्यातील एका व्हिलाच्या छायाचित्रांचा वापर करून बनावट जाहिरात आणि आयडी तयार करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला पवई पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. बांद्रा येथे निर्माण करण्यात आलेल्या सायबर युनिटच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आकाश जाधवानी असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. व्हिला बुकिंगसाठी मोठी सूट देत डझनभरापेक्षा जास्त पर्यटकांना […]

Continue Reading 0
Powai-house-breaking-theft-accused-arrested

सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई परिसरात घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी गुरुवारी पार्कसाईट येथून बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय उर्फ लंब्या अरुण बाईत (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पवई येथील एक घरफोडी आणि चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. २ मार्च रोजी पवईतील हिरानंदानी भागात असणाऱ्या लेबर कॅम्पमध्ये घुसून मौल्यवान वस्तू आणि रोकड […]

Continue Reading 0

बसमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नागेश शंकर गायकवाड (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. पवई परिसरात जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेविएलअर) मार्गावरून बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल, मौल्यवान […]

Continue Reading 2
murder

पवईत व्यावसायिकाचा गळा चिरून खून

पवई तलावाजवळ एका ४० वर्षीय फळ-भाजी विक्रेत्याचा गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. त्याच्या अंगावर वार आणि जखमांच्या खुणा आहेत. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चांदशहावाली दर्गाच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याचही माहिती प्राप्त झाली होती. […]

Continue Reading 0
mobile auto

महागडा मोबाईल घेवून पसार झालेल्या रिक्षाचालकाचा पवई पोलिसांनी १२ तासात लावला छडा

पवई परिसरात प्रवास करत असताना एका तरुणीचा रिक्षात विसरलेला फोन घेवून पसार झालेल्या रिक्षाचालकाला पवई पोलिसांनी १२ तासात शोधून काढले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी रिक्षात विसरलेला ९० हजार किंमतीचा महागडा मोबाईल तक्रारदार महिलेला परत मिळवून दिला आहे. मंगळवारी, हिरानंदानी परिसरात राहणाऱ्या रचिता डावर  हिरापन्ना मॉल ते हिरानंदानी गार्डन्स येथील आपल्या राहत्या घरी रिक्षाने प्रवास करत असताना […]

Continue Reading 1
powai 420 irani gang

महागडे फोन कस्टम भावात देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक

महागडे फोन कस्टम भावात देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून, काचेचे तुकडे देणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या दोन सदस्यांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पवईतील हिरानंदानी गार्डन भागात फसवणुकीच्या प्रयत्नात असताना हिरानंदानी कमांडोच्या मदतीने पवई पोलिसांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे विमानाने प्रवास करून ही टोळी मुंबईत येवून गुन्हे करून पुन्हा त्याच मार्गे परतत होती. मोहंमद शेहजाद इरफान सिद्दीकी […]

Continue Reading 0
online cheating

ईमेल खाते हॅक करून २ जणांना १.७ लाखाचा गंडा

७२ वर्षीय पवईकराचा इमेल हॅक करून ‘सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अडकला आहे’ असे त्याच्या यादीतील लोकांना सांगून १.७ लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. संकटात अडकलेल्या आपल्या मित्राला मदत करण्याच्या प्रयत्नात दोन लोकांची यात फसवणूक झाली आहे. मरोळ येथील एका खासगी कंपनीत नोकरी करणारे सुधाकर पटनायक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

Continue Reading 0
segway powai police

पवई पोलिसांच्या ताफ्यात सेग्वे दाखल

पवई पोलिसांच्या ताफ्यात आता अत्याधुनिक चार सेग्वे दाखल झाल्या आहेत. शुक्रवार, २२ जानेवारीला साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नागरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांच्या हस्ते या सेग्वेचे उदघाटन करत गस्तीवरील पोलिसांना हे सेग्वे देण्यात आले. मुंबई पोलिसांतर्फे वेगवेगळ्या परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गस्त घालण्यात येते. मोटारसायकल आणि जीपसह, पायी गस्त घालत पोलीस परिसरात कायदा-सुव्यवस्था सुरळीत […]

Continue Reading 0
Sr pi sonavane with PP press team

पवई पोलीस ठाणेच्या वपोनि पदी आबुराव सोनावणे

पवई पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) सुधाकर कांबळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर कोविड महामारीमुळे अनेक दिवस रिकाम्या असणाऱ्या या पदावर पवई पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विजय दळवी यांना अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आता या पदावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी अंमलीपदार्थ विरोधी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून […]

Continue Reading 0
makhanikar demand action against ram kadam

गुंडांना सोडण्याची मागणी करणाऱ्या आमदार राम कदमांवर गुन्हा दाखल करा – डॉ. राजन माकणीकर

आपले कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्या व्यक्तीला सोडून देण्याची फोनवरून मागणी करणारे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे. पवईतील हिरानंदानी भागात अपघात करून महिलेसोबत वाद घालणाऱ्या ३ तरुणांना पवई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे पोलीस […]

Continue Reading 0
Irani gang member powai

पवई परिसरात धुडगूस घालणाऱ्या इराणी टोळीच्या सदस्यांच्या हिरानंदानी कमांडोनी आवळल्या मुसक्या

सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, वाहनातील वस्तूंची चोरी, वाहन चोरी, पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची लुटालूट करणाऱ्या प्रख्यात इराणी टोळीच्या २ सदस्यांच्या हिरानंदानी कमांडोनी शनिवार, ०३ जानेवारीला मुसक्या आवळल्या आहेत. पकडलेल्या २ तरुणांना पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करत आहेत. मिसम गुलाम अब्बास शेख (२०) आणि अली अजीज सय्यद (१८) अशी […]

Continue Reading 0
Cement mixer overturned at powai

एल अँड टी कंपनीजवळ सिमेंट मिक्सर पलटला

शुक्रवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पवईतील एल अँड टी कंपनीजवळ एक सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास २ तासानंतर क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. यासंदर्भात पवई पोलिसांनी […]

Continue Reading 0
Man Crushed To Death While Chopping Branches In Powai

झाडाच्या फांद्या तोडत असताना फांदी पडून एकाचा मृत्यू

पवईमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे वाढलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी कंत्राटदाराने नेमलेल्या २५ वर्षीय कामगाराचा झाडाची फांदी तोडत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झाडावरील फांद्या तोडत असताना त्यातील एक फांदीखाली चिरडला गेल्याने ही घटना घडली. पवई पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदविला आहे. जसीन साकीर हाश्मी असे या व्यक्तीचे नाव आहे. आंबेडकर उद्यान […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!