Tag Archives | Powai

sandeep jadhav

मुंबईकरांना दीड करोडचा चुना लावणारा महाठग अडकला वाघाच्या पंजात

हिरानंदानी, पवई प्लाझा येथे गोल्डन फार्म नामक कार्यालय थाटून मुंबईकरांना स्वस्तात प्लॉट मिळवून देतो असे सांगून, दीड करोड घेवून पसार झालेल्या महाठग संदीप जाधव याला पवई पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाघ आणि टिमने ४ वर्षानंतर मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मुंबई, कल्याणसह पुण्यातही याच्यावर गुन्हा नोंद असल्याचे समोर आले आहे. या […]

Continue Reading 0
cars

बनावट पॅकर्स आणि मुव्हर्स प्रकरण: मुख्य आरोपींना अटक

बनावट पॅकर्स आणि मुव्हर्स कंपनी बनवून मुंबईकरांच्या मौल्यवान वस्तू आणि गाड्या लांबवणाऱ्या टोळीतील दोघा मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात पवई पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. पाठीमागील महिन्यात पवईतील कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीने पतीच्या एका मित्राला मिझोरम येथे पाठवलेल्या एसयुव्ही कारसह ३३.८ हजाराला गंडा घालणाऱ्या गुन्ह्याचा तपास पवई पोलीस करत होते. विकास करणसिंग भारद्वाज (२१) आणि अमितकुमार जयप्रकाश […]

Continue Reading 0
leopard marol

मरोळमध्ये रहिवाशी इमारतीत शिरला बिबट्या, तीन तासानंतर जेरबंद करण्यात यश

पवई पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या मरोळ भागात सोमवारी सकाळी भटकलेला एक बिबटया रहिवाशी इमारतीत शिरला. सकाळच्या वेळी रहिवाशी आपल्या नियमित धावपळीत व्यस्त असतानाच हा बिबट्या इमारतीच्या परिसरात शिरला. बिबट्या शिरल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. कोणालाही त्रास न देता तळमजल्यावर जिन्याखाली लपलेल्या या बिबट्याला सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी वनखात्याने जेरबंद केले. मरोळमधील विजयनगर परिसरातील […]

Continue Reading 0
SUV-stolen-from-hiranandani

हिरानंदानीमधून ३५ लाखाची महागडी एसयुव्ही घेवून पळून गेलेल्या आरोपीला अटक

पवई हिरानंदानी येथील ओडिसी इमारतीत राहणाऱ्या एका व्यावसायिकाची ३५ लाखाची महागडी कार चोरून पसार झालेल्या चोरट्याला त्याच्या साथीदारासह पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुरुवारी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकाने गाडी साफ करण्यासाठी पाठवले असल्याचा बहाणा करून चावी घेवून त्याने कार इमारतीच्या पार्किंगमधून पळवून नेली होती. शिवाजी भाऊ झोरे आणि प्रदीप भागोजी गावडे अशी अटक करण्यात […]

Continue Reading 0
iit powai

आयआयटीमध्ये प्रयोग करताना हायड्रोजन बलूनचा स्फोट, तिन जखमी

मुंबई, पवई येथील आयआयटीमधील एरोस्पेस डिपार्टमेंटमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास प्रयोग करताना झालेल्या स्फोटात ३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. प्रशांत सिंग, तुषार जाधव आणि रजत जैस्वाल अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. आयआयटी मुंबईमध्ये पार्ट-टाइम काम करणारे तुषार जाधव आणि इतर दोन प्रशिक्षणार्थी प्रयोग करत असताना ही घटना घडली. येथील एरोस्पेस विभागात हा प्रयोग केला जात […]

Continue Reading 0
arrested accuse in MP case

अनैतिक संबंधातून ५ वर्षाच्या मुलाची हत्या करून मध्यप्रदेशातून पळून आलेल्या आरोपीला पवई पोलिसांनी घातल्या बेड्या

अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून प्रेमिकेच्या पाच वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या करुन, मध्यप्रदेशातून पळून आलेल्या आरोपीस पवई पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या बळावर अटक केली आहे. संजीव पांडे (वय ३६ वर्ष, रा. जिल्हा रिवा, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी त्याला अटक करून मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पांडे याचे आपल्याच परिसरात राहणाऱ्या एका […]

Continue Reading 0

सार्वजनिक ठिकाणी तरुणीशी जबरदस्ती करणाऱ्या आरोपीला अटक

तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन करत जबरदस्तीने तिचे चुंबन घेणाऱ्या २५ वर्षीय रोमिओला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत अटक केली आहे. वसीम शेख असे या तरुणाचे नाव असून, पिडीत तरुणी आणि आरोपी दोघेही पवईतील एकाच परिसरात राहतात. रविवारी पिडीत घरी परतत असताना हा प्रकार घडला होता. त्यानंतर पीडितेने ही घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. पीडितेच्या कुटुंबियांनी […]

Continue Reading 0
road work sm shetty0

एसएम शेट्टी शाळेजवळ चालणाऱ्या रोड-गटरच्या कामामुळे नागरिक त्रस्त; योग्य उपाययोजना करण्याचे नगरसेवकांचे आश्वासन

एसएमशेट्टी शाळेजवळील भागात सांडपाणी वाहून नेण्यासाठी गेल्या महिनाभरापासून गटरनिर्मितीचे काम सुरु आहे. मात्र या कामासाठी खोदकामानंतर निघालेली माती आणि मलबा तसाच रोडवर पडून असल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. सोबतच येथील म्हाडा अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींत घरांमध्ये धूळ-माती उडून नागरिकांच्या घरात मैदान सदृश्य परस्थिती निर्माण झाल्याची तक्रार येथील स्थानिक करत आहेत. नगरसेवकांनी याबाबत त्वरित योग्य उपाययोजना […]

Continue Reading 0

कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीला पॅकर्स आणि मुव्हर्सच्या नावावर गंडा घालणाऱ्या दोघांना पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बनावट पॅकर्स आणि मुव्हर्स कंपनी बनवून मुंबईकरांच्या मौल्यवान वस्तू आणि गाड्या लांबवणाऱ्या टोळीतील दोघांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पाठीमागील महिन्यात पवईतील कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीने पतीच्या एका मित्राला मिझोरम येथे पाठवलेल्या एसयुव्ही कारसह ३३.८ हजाराला गंडा घालणाऱ्या गुन्ह्याचा तपास पवई पोलीस करत होते. मूळचे हरियाणातील असणारे रामकुमार शर्मा (२३) आणि विकास शर्मा (२३) अशी अटक […]

Continue Reading 0
accident milind nagar

बेस्ट बसने तरुणाला उडवले; जागीच मृत्यू

शनिवारी सकाळी पवई मिलिंदनगर भागात १०.४५ वाजता सिग्नलजवळ रोड पार करत असताना एका अज्ञात बेस्ट बस चालकाने तरुणाला उडवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राकेश नंदलाल पाटील (२४) असे तरुणाचे नाव आहे. पोलीस अज्ञात चालकाचा शोध घेत आहेत. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई मिलिंदनगर येथे आपल्या परिवारासह राहणारा राकेश हा विद्यार्थी होता. सकाळी १०.४५ […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes