Tag Archives | Powai

people-fighting-clip-art-578476

आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची मारामारी, चौघांना अटक

मूड इंडिगोसाठी आयआयटी कॅम्पसमध्ये राजस्थानच्या कोटा भागातून आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यामध्ये प्रेमप्रकरणातून हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत पवई पोलिसांनी कारवाई करत मारामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. उत्कर्ष शर्मा (२०), दिवांज चौधरी (२०), जुनेद खान (१९), शुभम पांडेय (१८) अशी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर काळात पवईतील आयआयटी मुंबई […]

Continue Reading 0
maruti iit mood i 26122016

मारूतीच्या विटंबनेवर वाघ गरजला, मूड इंडिगो प्रशासनाने दिला लेखी माफीनामा

आयआयटी मुंबईच्या मूड इंडिगो फेस्टिवलमध्ये हिंदूचे दैवत मारुतीचे स्टुडेंट एक्टीविटी सेंटरमध्ये काढलेल्या विटंबनात्मक चित्रावर शिवसेनेच्या वाघांनी टाकलेल्या डरकाळीमुळे मूड इंडिगो प्रशासनाने केवळ ते चित्र पांढऱ्या पडद्यामागे न लपवता लेखी स्वरुपात माफीनामा सुद्धा लिहून दिला आहे. यामुळे शिवसेनेच्या वाघांचा दरारा आजही कायम असल्याचे स्पष्ट होते. डिसेंबर महिना म्हणजे कॉलेजियन्ससाठी फेस्टिवल मूड असतो. या सर्वात सर्व कॉलेज […]

Continue Reading 0
shop fire

आयआयटीत तीन दुकाने आगीत जळून खाक

@रविराज शिंदे, रमेश कांबळे पवई, आयआयटी मेनगेट येथील गोखलेनगर परिसरात रविवारी लागलेल्या आगीत येथील फुटपाथवर असणारी तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. शोर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयआयटी, गोखलेनगर परिसरात असणाऱ्या फुटपाथवर ज्यूस […]

Continue Reading 0
4

पवई तलावात बोट उलटून ८ जण बुडाले, ५ जणांना वाचवण्यात यश

पवई तलावात बोट उलटून ८ जण बुडाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यातील ५ जणांना वाचवण्यात स्थानिक आणि अग्निशमन दलाला यश आले आहे. तर ३ जणांचा शोध शनिवारी संध्याकाळ पर्यंत चालूच होता. बुडालेले सर्व हे मुंबईतील विविध भागातील रहिवाशी असून, पवई तलावातील हाउस बोटवर पार्टी करण्यासाठी आले होते. या घटनेवरून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे की […]

Continue Reading 0
unnamed

हिरानंदानीत डंपर पलटी

रविराज शिंदे पवई हिरानंदानी संकुलन येथील एमटीएनएल रोड येथे खुल्या असलेल्या चेंबर मध्ये अडकुन डंपर पलटी झाल्याची घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नसून, ह्या खुल्या चेंबरमुळे जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी खंत येथील स्थानिक वाहन चालकांनी व्यक्त केली. सदर घटने दरम्यान हिरानंदानी परिसरातील वाहतूक काहीकाळ […]

Continue Reading 0
छायाचित्र: आयआयटी प्रथम टिम

आयआयटी मुंबईला ‘प्रथम’ संदेश मिळाला

आयआयटी मुंबईने सोडलेल्या ‘प्रथम’ या उपग्रहाकडून तांत्रिक बिघाडामुळे गेल्या काही दिवसांपासून संदेश मिळत नव्हते. शनिवारी, १७ डिसेंबरला या उपग्रहाने दिवसभरात तीन वेळा संदेश दिल्याने आयआयटी कंपासमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. आता पर्यंत मिळालेल्या संदेशांपेक्षा शनिवारी मिळालेले संदेश हे अधिक शक्तिशाली असल्याचे उपग्रह टीमचा प्रमुख रत्नेश मिश्रा याचे मत आहे. आयआयटी मुंबईच्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या प्रथम उपग्रहाचे […]

Continue Reading 0
pl led

पवई तलाव परिसर उजळणार एलईडी दिव्यांनी; पर्यावरणवादी संस्थांची सौर एलईडी दिव्यांची मागणी

विदेशी पर्यटकांसह मुंबईकरांचे आकर्षण असलेला पवई तलाव परिसर येत्या काही दिवसात एलईडी दिव्याने उजळणार आहे. पवई तलाव सुशोभिकरणाच्या वेळी हे एलईडी दिवे बसवले जाणार आहेत. या कामासाठी ७.५ कोटी खर्च येणार असून, दोन कंत्राटदारांची निवड सुद्धा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपल्या कॅमेऱ्यात येथील दृश्यांना कैद करण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. मात्र, पर्यावरणवादी संस्था पॉज […]

Continue Reading 1
kailash-complex-road

अक्षरधाम रोडचा नारळ फुटला; कामाची सुरवात कधी? : पवईकर

हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडच्या कामाचा भूमिपूजनाचा नारळ आमदार आर. एन. सिंह (विपस) यांच्या हस्ते आणि अनेक पवईकर मान्यवरांच्या उपस्थितीत फोडला गेला होता. आता त्याला एक महिना उलटून गेल्यानंतर काम सुरु झाले नसल्याने “नारळ फुटला, आता कामाची सुरुवात कधी?” असा सवाल येथून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून आणि पवईकरांकडून विचारला जात आहे. जवळपास गेली १२ वर्ष दुरावस्थेत असणाऱ्या हिरानंदानी […]

Continue Reading 1
meet-bmc

पवई तलाव वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची पवईकरांशी चर्चा

पवई तलावात सोडल्या जाणाऱ्या घाण पाण्यामुळे पवई तलावाचे होणारे प्रदूषण तसेच त्याच्या सुशोभिकरणावेळी घ्यावयाच्या उपाययोजना आणि नियोजनबद्द कामावर चर्चा करण्यासाठी पालिकेच्या हायड्रोलिक विभागाच्यावतीने त्यांच्या भांडूप येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पॉज मुंबई संस्थेचे सुनिश सुब्रमण्यम, निशा कुंजू, यंग इन्वायरमेंट संस्थेच्या ईलसी गेब्रील, आशा संस्थेचे पदाधिकारी आणि पवईकर उपस्थित होते. हायड्रोलिक विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]

Continue Reading 0
u-t-at-powai

शिवसैनिकांनो झपाट्याने कामाला लागा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण भाजपाने मुंबई महापालिका जिंकण्याचा विडा उचलल्याने शिवसेना सर्वतोपरी दक्ष झाली आहे. भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून, दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अनेक शाखांना गुरुवारी भेट देऊन शिवसैनिकांना झपाट्याने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई भेटी दरम्यान त्यांनी पवईतील शाखा क्रमांक १२२ मध्ये येथील शिवसैनिकांची भेट घेतली. यावेळी […]

Continue Reading 0
sathe

साहित्य रसिकांसाठी साठ्ये महाविद्यालयात पुस्तकोत्सवाचे आयोजन

@संजय पाटील तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. जे पाहता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी  विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाने ‘पुस्तोकोत्सवाचे’ आयोजन केले आहे. या पुस्तोकोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते होणार आहे. चित्रशताब्दी, जत्रा, बायोस्कोप, माध्यमगड अशा संकल्पना घेऊन गेल्या काही वर्षात माध्यम महोत्सव यशस्वीरित्या पार पडला आहे. […]

Continue Reading 0
peh

पवई इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

पवई इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव यावर्षी ७ व ८ नोव्हेंबरला डॉकयार्ड मैदान, कांजुरमार्ग आणि शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी भारतीय सैन्यदलाचे निवृत्त अधिकारी कर्नल एस के सुरी हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्नल सुरी, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शरली उदयकुमार आणि पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भावना मॅडम यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन आणि […]

Continue Reading 0
road-work

पवईत पालिका एस विभागातर्फे रस्ते दुरुस्तीच्या कामांची सुरुवात

पावसाळ्यानंतर खराब झालेल्या, उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून लोकांना चांगल्या रस्त्यांची सोय करून देण्याच्या कामांची सुरुवात पालिका ‘एस’ विभागाकडून सुरु झाली असून, याचा शुभारंभ जलवायू आणि म्हाडा कॉम्प्लेक्सच्यामधून असणाऱ्या रोडच्या कामाच्या सुरुवातीने झाला आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाणार आहे. मुंबई आणि खराब रस्ते यांचे एक अतूट नाते आहे. पावसाळा आला की, मुंबईत ठिकठिकाणी पालिका […]

Continue Reading 0
peh

पवई इंग्लिश हायस्कुलला ‘सायन्स क्यूज’ स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

आयआयटी, पवई येथील पवई इंग्लिश हायस्कुलने पाठीमागील आठवड्यात वार्ड पातळीवरील झालेल्या ‘सायन्स क्यूज’ स्पर्धेत दुसरे स्थान पटकावत आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. छायाचित्रात मुख्याध्यापिका शेरली पिल्लाई सोबत स्पर्धक विद्यार्थी करण तांबोळी, साईमा कुरेशी आणि प्रमिला टिचर दिसत आहेत. आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा  

Continue Reading 0
c

पवई तलाव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गुंडाळला; पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर पालिकेचा निर्णय

पवई तलावात विविध वाहिन्यांच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र हा प्रकल्प बसवण्याचा खर्च करण्याऐवजी, तलावात सांडपाणी सोडण्यात येवू नये अशी मागणी पॉज या पर्यावरणवादी संघटनेने लावून धरली होती. याबाबत आवर्तन पवईने पाठपुरावा केला होता. महानगर पालिकेने अखेर आपला हा निर्णय पाठीमागे घेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दुसरे उपाय योजणार […]

Continue Reading 0
online-scam

अमेरिकन आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे सांगून फेसबुकवर महिलेला गंडा

तीन लोकांच्या टोळीतील एकाला पवई पोलिसांनी केली अटक एक ४८ वर्षीय महिलेशी फेसबुक या सोशलसाईटवर अमेरिकन आर्मीत अधिकारी आहे आणि अफगाणिस्तान येथे पोस्टिंग असल्याचे सांगून, मैत्री करून ३ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील एकाला दिल्ली येथून पवई पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. रिचर्ड डेविड शेम्री (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, अधिक तपासासाठी त्याला पोलीस […]

Continue Reading 0
hatya

सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

साकिनाक, पवई पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद नावावर असणाऱ्या नासिर अली मोहंमद शेख (३१) याची काही अज्ञात व्यक्तींनी गौतमनगर पाईप लाईन येथे डोक्यात बॉटल फोडून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना बुधवारी पवईत घडली आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवी कलम 302 नुसार गुन्हा नोंद करून त्याच्या हत्येच्या मागील लोकांचा शोध सुरु केला आहे. पवईतील […]

Continue Reading 0
akshardham-road

हिरानंदानी – विक्रोळी लिंक रोडचा ‘नारळ फुटला’

जवळपास १२ वर्ष दुरावस्थेत असणाऱ्या हिरानंदानी –विक्रोळी लिंक रोडला आता नवसंजीवनी मिळणार आहे. याच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम रविवारी आमदार आर. एन. सिंह (विपस) यांच्या हस्ते आणि अनेक पवईकर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडसाठी विधान परिषद सदस्य आमदार आर. एन. सिंह यांच्या प्रयत्नातून आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १० लाख रुपयांचा फंड मंजूर करण्यात आला […]

Continue Reading 0
हिरानंदानी येथील बिबट्याचे संग्रहित छायाचित्र

हिरानंदानीतील बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश

हिरानंदानी सुप्रीम बिजनेस पार्कच्या पाठीमागील भागात गेली ३ वर्षे वास्तव्य करून असणारा आणि सुप्रीम बिजनेस पार्कमध्ये कामासाठी येणाऱ्या अनेक लोकांना अधूनमधून दर्शन देणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वन अधिकाऱ्यांना यश आले आहे. पवईत ऑक्टोबर २०१३ ला पकडल्या गेलेल्या बिबट्यानंतर तीन वर्षात मुंबईत पकडला गेलेला हा पहिला बिबट्या आहे. गेल्या आठवड्यात बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी वन विभागाने […]

Continue Reading 0
rally

नोट बंदी’ समर्थनात पवईकरांची रॅली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जुन्या ५०० आणि १००० रुपयाच्या ‘नोट बंदी’च्या घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात पवईतील नागरिकांनी आज (शनिवारी) संध्याकाळी एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत मोठ्या प्रमाणात समाजातील विविध स्तरातील लोक सहभागी झाले होते. “मोदीजी काले धन के सर्जिकल स्ट्राईक मे हम आपके साथ हैं”, “काळे धन के खिलाफ आप का संघर्ष वंदनीय हैं”, […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!