Tag Archives | powaiinfo

IMG_0007

पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत

३ एक्टिवा मोटरसायकल १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पवई, साकीविहार, मरोळ भागात मोटार सायकल चोरी करून त्याचे पार्ट काढून मार्केटमध्ये विकणाऱ्या एका सराईत चोराला पवई पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. कमलेश प्रजापती (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुंगागाव येथील रोडसाईड गॅरेजमध्ये तो […]

Continue Reading 3
galleria bike

पवईत मोटारसायकल चोरांचा सूळसुळाट; गलेरिया, फुलेनगरमधून दुचाकींची चोरी

@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण पवईमध्ये गेल्या महिनाभरात मोटारसायकल चोरांचा वावर वाढला असून, महिनाभरात दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काल रात्री महात्मा फुलेनगर येथून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पवई परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फुलेनगर येथे राहणारे विकास खांडे […]

Continue Reading 0

एमडी ड्रग्जसह पवईत दोघांना अटक

पवईमध्ये ग्राहकाला मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या २ तरुणांना शनिवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. मेहंदीहसन जहीरहसन मिर्झा (२३), नरेश सुरेश माला (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबईत मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रगचा सुळसुळाट वाढला असतानाच, मुंबईत एमडी पुरवणाऱ्या […]

Continue Reading 0
powai-lake-drowning

पवई तलावात पडून तरुणाचा मृत्यू

मन्नूभाई चाळ, पवई येथे राहणारा अठरा वर्षीय मोहमद फरहान हा पवई तलावात मासेमारीसाठी गेला असताना पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल (रविवारी) संध्याकाळी पवईत घडली. याबाबत पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत. ‘फरहान हा आपल्या काही मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी काल रामबाग येथील पवई तलाव भागात उतरला होता. मासेमारी करताना त्याचा […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

हिरानंदानीत कामगाराची आत्महत्या

हिरानंदानीमध्ये बांधकाम कामगार म्हणून काम करणाऱ्या एका कामगाराने येथील लेबर कँपमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. आत्महत्येमागचे नक्की कारण समजू शकले नसून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. सोहम परशुराम निषाद (२०) असे आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव असून, तो बिहारचा रहिवाशी आहे. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून त्याचे राजावाडी येथे शवविच्छेदन केले […]

Continue Reading 0
human chain for kulbhushan at Hiranandani, Powai

मानवी साखळीच्या माध्यमातून पवईकरांची कुलभूषण जाधवांच्या सुटकेची मागणी

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनाविलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर देशभरातून सेलिब्रिटींजसह सर्वसामान्य नागरिक विविध माध्यमातून आपला निषेध व्यक्त करत आहेत. गुरुवारी सकाळी पवईकरांनी हिरानंदानी येथील सिल्वर ओक या त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीबाहेर ‘मानवी साखळी’ करुन शासनाकडे जाधवांना परत आणण्याची मागणी केली. यात जाधव यांचा लॉन्ड्री बॉय विजय कनोजियाचा सुद्धा सहभाग होता. पवईकर व माजी […]

Continue Reading 0

कथित गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान लष्करी कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

भारतीय गुप्तचर यंत्रणा रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ)चे गुप्तचर असल्याचा दावा करत, कराची आणि बलुचिस्तानमध्ये घातपाताचा कट रचल्याच्या आरोपाखाली रावळपिंडीच्या लष्करी कोर्टाने सोमवारी पवईकर आणि निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी ३ मार्चला बलुचिस्तानमधून पाकिस्तानच्या सुरक्षा दलांने जाधव यांना अटक केली होती. कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा निश्चित केल्याचे पाकिस्तानी […]

Continue Reading 0
kailash-complex-road

अक्षरधाम रोडचा नारळ फुटला; कामाची सुरवात कधी? : पवईकर

हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडच्या कामाचा भूमिपूजनाचा नारळ आमदार आर. एन. सिंह (विपस) यांच्या हस्ते आणि अनेक पवईकर मान्यवरांच्या उपस्थितीत फोडला गेला होता. आता त्याला एक महिना उलटून गेल्यानंतर काम सुरु झाले नसल्याने “नारळ फुटला, आता कामाची सुरुवात कधी?” असा सवाल येथून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून आणि पवईकरांकडून विचारला जात आहे. जवळपास गेली १२ वर्ष दुरावस्थेत असणाऱ्या हिरानंदानी […]

Continue Reading 1
c

पवई तलाव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गुंडाळला; पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर पालिकेचा निर्णय

पवई तलावात विविध वाहिन्यांच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र हा प्रकल्प बसवण्याचा खर्च करण्याऐवजी, तलावात सांडपाणी सोडण्यात येवू नये अशी मागणी पॉज या पर्यावरणवादी संघटनेने लावून धरली होती. याबाबत आवर्तन पवईने पाठपुरावा केला होता. महानगर पालिकेने अखेर आपला हा निर्णय पाठीमागे घेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दुसरे उपाय योजणार […]

Continue Reading 0
hatya

सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

साकिनाक, पवई पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद नावावर असणाऱ्या नासिर अली मोहंमद शेख (३१) याची काही अज्ञात व्यक्तींनी गौतमनगर पाईप लाईन येथे डोक्यात बॉटल फोडून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना बुधवारी पवईत घडली आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवी कलम 302 नुसार गुन्हा नोंद करून त्याच्या हत्येच्या मागील लोकांचा शोध सुरु केला आहे. पवईतील […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes