Tag Archives | RAHEJA VIHAR

galleria bike

पवईत मोटारसायकल चोरांचा सूळसुळाट; गलेरिया, फुलेनगरमधून दुचाकींची चोरी

@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण पवईमध्ये गेल्या महिनाभरात मोटारसायकल चोरांचा वावर वाढला असून, महिनाभरात दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काल रात्री महात्मा फुलेनगर येथून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पवई परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फुलेनगर येथे राहणारे विकास खांडे […]

Continue Reading 0

चांदिवलीत लवकरच बनणार विस्तारित अग्निशमन केंद्र

@अविनाश हजारे, @सुषमा चव्हाण चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसराचा होणारा विस्तार आणि घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी लवकरच चांदिवली येथे मरोळ अग्निशमन केंद्राचे विस्तारीत अग्निशमन केंद्र उभे करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात आमदार नसीम खान यांच्यासह मुंबई अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी एस. के. बांगर, एच. आर. शेट्टी तसेच महानगरपालिका ‘एल’ ईमारत विभागाचे श्री. पगारे […]

Continue Reading 0
raheja vista maids

रहेजा विहारच्या घरकाम करणाऱ्या महिलांचे कामबंद आंदोलन तात्पुरते मागे

चांदिवली, रहेजा विहार येथील रहेजा विस्टा सोसायटीने घरकाम करणाऱ्या महिलांसाठी नवीन दरपत्रक काढत सरसकट सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याच्या घातलेल्या घाटाच्या विरोधात येथील घरकाम करणाऱ्या महिलांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. ज्याबाबत काल मनसे विभाग अध्यक्ष अशोक माटेकर यांनी दोन्ही पक्षांना समजावत आंदोलन पाठीमागे घेतले आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी योग्य मोबदला नाही दिला गेल्यास पुन्हा […]

Continue Reading 0
dengu-powai

पवईला डेंग्यूचा विळखा, पालिकेकडून नागरिकांमध्ये जनजागृती

@रविराज शिंदे हवामानातील बदलामुळे मुंबईत साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पवईत सुद्धा डेंगू, मलेरिया सारख्या आजारांनी तोंड वर काढले आहे. पवईतील हिरानंदानी हॉस्पिटल, निहाल हॉस्पिटल, पवई हॉस्पिटल,महात्मा फुले महानगर पालिका रुग्णालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर महानगर पालिका रुग्णालयामध्ये डेंग्यूने ग्रस्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. याआजारांबाबत महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाकडून विशेष जनजागृती अभियान राबवले […]

Continue Reading 0
visarjan

दिड दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप

ढोल – ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला…. या जयघोषात मंगळवारी दिड-दिवसाच्या गणरायाला पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर गणेश भक्तांनी विसर्जन करून निरोप दिला. मुंबईमध्ये गणपती बसवणार्‍यांमध्ये दिड दिवसाच्या गणपतींचे प्रमाण अधिक असते. यंदाही अनेकांनी नवसपूर्ती व परंपरा पाळत गणरायाची चतुर्थीला प्रतिष्ठापणा केली आहे. मंगळवारी पवई, […]

Continue Reading 0
red ribon campaign

‘निव फौंडेशन’ची अंमली पदार्थां विरोधात जनजागृती रॅली

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत, पवईकरांच्यात जनजागृती करण्यासाठी ‘निव फौंडेशन’च्या वतीने शनिवारी २५ जूनला संध्याकाळी ५ वाजता हिरानंदानीतील ‘गलेरिया मॉल ते हेरिटेज गार्डन’ येथे जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी पथनाट्याद्वारे लोकांच्यात जनजागृती केली जाणार असून, अंमली पदार्थ विरोधी पथक व अंमली पदार्थ नियंत्रक पथकाचे अधिकारी सुद्धा लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. अनेक परिसरात […]

Continue Reading 0
map

विकास आराखड्यात हरकती व सूचना सुचवण्यासाठी पवईकरांना सुवर्णसंधी

आयआयटी येथील शिवसेना शाखा क्रमांक ११५ मध्ये पाहा प्रारूप आराखडा. सुचवा आपल्या हरकती व सूचना. आधीच्या विकास आराखड्याला रद्द केले गेल्यानंतर पालिकेने काहीच महिन्यातच नवीन प्रारूप आराखडा तयार केला आहे. पालिकेचा हा नवीन प्रारूप आराखडा पवईकरांना पाहण्यासाठी शिवसेना शाखा ११५ मध्ये ठेवण्यात आला असून, त्यात हरकती आणि सूचना सुचवण्यासाठी शिवसेना शाखा ११५ तर्फे पवईकरांना आमंत्रित […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes