Tag Archives | vehicle theft

Motorcycle stealer dismantled it in half an hour; within an hour, the police handcuffed him

मोटारसायकल चोरट्याने अर्ध्या तासात उलगडली गाडी; तासाभरात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई पोलीस ठाणे हद्दीपासून काहीच अंतरावर पार्क केलेली मोटारसायकल पळवून नेऊन अर्ध्या तासात त्याचे पार्ट काढून विकण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहीम अकबर शेख उर्फ झिपी (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मोहमद गणी शेख हे कुर्ला कोर्टाजवळ राहतात. १८ तारखेला त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्याने ते […]

Continue Reading 0
Drugs bust; NCB arrests man from Powai

पवई पोलिसांनी मोटार सायकल चोराला ठोकल्या बेड्या

पवई परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका तरुणाला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. संकेत रामचंद्र गोरे (वय २० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु असून, मुंबईत अजून कोठे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत. फिर्यादी नामे अतिन […]

Continue Reading 0
team with dcp

Powai Police Arrested Two for Car Theft; Six Vehicles Seized

Powai police have arrested two members of a gang involved in stealing Zoomcar company cars. The arrested- accused were identified as Jagdish Sohanram Bishnoi (23) and Mahendra Ratiram Godara (19). Powai police also have seized six stolen vehicles from Rajasthan. The arrest of the duo has exposed a gang involved in car thefts across the country, including Mumbai […]

Continue Reading 0
powai police with accuse

झुम कार कंपनीच्या कार चोरी करणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना अटक; सहा गाड्या हस्तगत

@प्रमोद चव्हाण झुम कार कंपनीची हुंडाई क्रेटा मोटार कार पवई येथून भाड्याने बुक करून, तिचे जिपीएस. सिस्टम काढून चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जगदिश सोहनराम बिष्णोई (२३) आणि महेंद्र रतीराम गोदारा (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवई पोलिसांनी चोरी केलेल्या ६ गाड्या राजस्थान येथून ताब्यात घेतल्या आहेत. […]

Continue Reading 0
Beware Powaiites - Car, motorcycle stolen from Powai

पवईकरांनो सावधान ! पवईमधून कार, मोटारसायकलची चोरी

पवई परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला असून, पवईतील तुंगागाव येथून एक मोटारसायकल तर रामबाग पवई येथून एक कार चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. कोरोना महामारीमुळे घरात बसून असलेल्या मुंबईकरांचा फायदा घेत चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला पाह्यला मिळत आहे. एकीकडे सायबर चोरट्यांनी तर […]

Continue Reading 0
galleria bike

पवईत मोटारसायकल चोरांचा सूळसुळाट; गलेरिया, फुलेनगरमधून दुचाकींची चोरी

@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण पवईमध्ये गेल्या महिनाभरात मोटारसायकल चोरांचा वावर वाढला असून, महिनाभरात दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काल रात्री महात्मा फुलेनगर येथून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पवई परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फुलेनगर येथे राहणारे विकास खांडे […]

Continue Reading 0
vehicle theft

स्वस्तात गाडी मिळवून देण्याच्या बहाण्याने ठगणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बँकेने जप्त केलेल्या गाडय़ा कमी किमतीत मिळवून देतो सांगून मुंबईकरांना लाखो रुपयांना ठगणाऱ्या भामटय़ाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुनील किशनचंद जगतीयानी उर्फ मनीष लालवाणी (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे. सुनीलने मुंबई, ठाणेसह पुणे, दिल्ली आणि हरियाणा भागात अनेकांची फसवणूक केली असून, त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. हप्ते न-भरल्याने बँकेने जप्त […]

Continue Reading 0
car theft powai police recovred car

वाहन चोरीच्या गुन्ह्यात फुलेनगरमधून एकाला अटक

@प्रमोद चव्हाण पवई आणि आसपासच्या परिसरातून चार चाकी वाहने चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किशोर वानखेडे (बदलेले नाव) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याचा टूअर्स अंड ट्राव्हल्सचा व्यवसाय असून, त्यासाठी तो या चोरीच्या गाड्या वापरत होता. आतापर्यंत पवई पोलिसांनी त्याच्याकडून इनोव्हा, सुमो आणि स्विफ्ट डीजायर अशा गाड्या हस्तगत केल्या आहेत. […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!