तमिळ संघमच्यावतीने पवईत पोंगल आणि मकरसंक्रात साजरी

मकर संक्रात आणि पोंगल सणाचा उत्सव मुंबईच्या पूर्व उपनगरात उत्साहात साजरा करण्यात आला. भांडूप, मुलुंड, विक्रोळी, पवई आदी सह उपनगरात विविध ठिकाणी महिलांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. महिलांनी एकमेंकाना हळद कुंकू लावून ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे संदेश देत पारंपारिक पध्दतीने हा उत्सव साजरा केला. पवईतील तमिळ संघम पवईच्यावतीने आयआयटी मेनगेट येथील सिनेमा मैदानात १०८ महिलांच्या उपस्थित पोंगल आणि मकर संक्रात सण साजरा झाला.

यावेळी सर्व प्रथम पारंपरिक तमिळ पध्दतीने सुर्योदयाला नमन करत पूजा अर्चना करत पोंगल साजरा केला गेला. आयोजित या कार्यक्रमात पवईसहीत आसपासच्या विविध जातीधर्मातील महिलांनी या उत्सवात सहभाग घेत आपला सण साजरा केला. या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष मुरगन तेवर, सचिव अरुण बालन, खजिनदार आदिनारायण सहीत स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, भाजप साऊथ सेलचे मुथु कृष्णा, संघटनेचे पदाधिकारी सदस्य आणि पवईकर उपस्थित होते.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!