तरुणीचे विवस्त्र व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला राजस्थानमधून अटक

फोटो – वन इंडिया (oneindia.com)

पवई पोलिसांच्या हद्दीतील मरोळ भागात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीशी प्रेमाचे नाटक करून, व्हिडीओ चॅट दरम्यान तिचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून, ते सोशल माध्यमात टाकण्याची धमकी देवून ते टाळण्यासाठी पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पवई पोलिसांनी बारनेर, राजस्थान येथून अटक केली आहे. जतिन कुमार रमेश कुमार सिकरानी (वय १९) असे अटक आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर डेव्हलपर असणारी तरुणी आपल्या दोन मैत्रिणींसोबत मरोळ येथे राहते. फावल्या वेळेत डान्सच्या विविध ऑनलाईन स्पर्धेत ती सहभागी होत असते. यासाठी तिने ऑनलाईन व्हिडीओ चॅट साईटवर खाते बनवले आहे. तीन महिन्यापूर्वी जतीनशी तिची याच साईटवर ओळख झाली.

नियमीत चॅटमुळे दोघांच्यात मैत्री आणि पुढे त्याचे प्रेमात रुपांतर झाले. यनंतर दोघांनी आपले मोबाईल नंबर एकमेकांना दिल्यानंतर व्हाटसअपवर दोघांच्यात नियमित चॅट होत असे.

सुट्टीच्या दिवशी घरी असताना व्हिडीओ चॅटद्वारे गप्पा सुरु असताना जतीनने मला गोड बोलत आपले कपडे काढण्याची मागणी केली. २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात आमच्यात अशाप्रकारे ४ वेळा व्हीडीओ चॅट झाला होता. असे पिडीतेने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

मी इतर कोणाशीही चॅट करत असेल तर त्याला राग येत असे. मात्र तो विविध मुलींशी चॅट करून त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवत असे. याच्यावरून आमच्यात भांडणे होत असल्याने, काही दिवसातच आमचे नाते संपुष्टात आणत त्याला सर्व एप्लिकेशनमध्ये मी ब्लॉक केले. असेही तिने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

“पिडीत तरुणीच्या एका मित्राने तिला एप्लिकेशनवर तिचा विवस्त्र फोटो अपलोड झाला असून, संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी किती डायमंड देणार? अशी विचारणा करण्यात आली असल्याची माहिती दिली,” असे पवई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

पिडीतेने त्या एप्लिकेशनवर जावून पाहिले असता, सदर व्हिडीओ जतिनशी व्हिडीओ चॅट दरम्यान रेकॉर्ड केला असल्याची खात्री पटली. तिने आपले एप्लिकेशन तपासून पाहिले असता तिला जतिनकडून सदर व्हिडीओ सोशल माध्यमात अपलोड करणे टाळण्यासाठी ४५,००० रुपयांची मागणी करणारा संदेश सुद्धा मिळून आला. याबाबत तिने १० सप्टेंबरला पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

“आम्ही टेक्निकल माहिती मिळवत बडनेर, राजस्थान येथून तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता, १८ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे”, असेही याबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले “आरोपी तरुणाचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले असून, राजस्थान येथे मोबाईल गॅलरी चालवतो. त्याच्या परिवारातील सदस्यांविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल आहे.”

पोलिसांनी आरोपींकडून तीन फोन जप्त केले असून, फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. फोनचा डेटा या प्रकरणात पुरावा म्हणून वापरला जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. हस्तगत फोन इतर स्त्रियांशी संपर्क साधण्यासाठी किंवा छळ करण्यासाठी वापरले गेले होते का? याचाही पवई पोलिस शोध घेत आहेत.

भारतीय दंड संहिता (आयपीसी) नुसार कलम ३८४, ५०१, ५०९ सह माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ आणि ६७ (ए)नुसार महिलांची बदनामी करणे, खंडणी मागणे, विनयभंग केल्याबद्दल सिकरानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!