पवई तलावातील जलपर्णी काढण्यापासून पालिकेची चालढकल

पवई तलावाला हळूहळू नष्ट करणाऱ्या जलपर्णीना काढण्याबाबत विचारले असता पालिकेच्या अधिका्यांनी नुकतेच केले असल्याचे निर्दोषपणे सांगितले. एका अधिकाऱ्याने प्रतिनिधीना सांगितले की, आयआयटी बॉम्बेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर काही वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले “कोई हायसिंथ नजर ही नहीं आयी है.” त्याच्यावर प्रतिनिधींनी उत्तर दिले “अगर आप इस मामले में अपना हाथ गंदा करना चाहेंगे और गाड़ी से उतरेंगे तभीही तो हायसिंथ नजर आयेगा.”

गुरुवारी, १९ सप्टेंबरला पवईतील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थाच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधी मंडळाने घाटकोपर येथील महानगरपालिकेच्या हायड्रॉलिक विभागाला भेट दिली. यावेळी तेथील अधिकाऱ्यांसोबत पवई तलावाच्या काठावरील मियावाकी वृक्षारोपण प्रस्तावाच्या प्रगतीविषयी आणि जलद गतीने बिघडत चाललेल्या पवई तलावाला वाचवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आली.

मियावाकी वृक्षारोपणासाठी बजेट तयार झाले असून, निविदा मागवण्यात आल्या आहेत. पवईतील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थाच्या कार्यकर्त्यांसोबत व्यापक सर्वेक्षणानंतर पवई तलावाच्या किनाऱ्यावर मियावाकी वृक्षारोपणासाठी चार भागांची निवड करण्यात आली आहे. पालिकेने नागरिकांच्या या शिफारशींवर सहमती दर्शविली असून, आता हा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीकडे जाणार आहे. मात्र विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर – डिसेंबरच्या अखेरीपर्यंत हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे.

यावेळी प्रतिनिधीशी बोलताना हाइड्रोलिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले की, तलावामध्ये सांडपाणी वाहून नेणारे सर्व प्रवेशद्वारे बंद केली जाणार आहेत आणि गणेशनगर गणेशघाटजवळ सांडपाणी शुद्धीकरण केंद्र बांधले जाईल. परंतु तलाव नष्ट करणारे जलपर्णी (हायसिंथ) काढून टाकण्याबाबत विचारले असता, पालिकेच्या अधिका्यांनी हे काम नुकतेच केले असल्याचे निर्दोषपणे सांगितले. मात्र प्रतिनिधींनी कधी? असे ठामपणे विचारत पालिकेच्या कामाबद्दल ताशेरे ओढायला सुरुवात करताच अधिकारयानी बाजू सांभाळत आणि विषय दुसरीकडे वळवत आणखी एक प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे पटकन नमूद केले.

यावेळी अजून एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयआयटी बॉम्बेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर विभागातील काही वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले होते “कोई हायसिंथ नजर ही नहीं आयी है.” (जलपर्णी कुठेच आढळून येत नाहीत) त्याच्यावर प्रतिनिधींनी उत्तर दिले “अगर आप इस मामले में अपना हाथ गंदा करना चाहेंगे और गाड़ी से उतरेंगे तभीही तो हायसिंथ नजर आयेगा.” (जर तुम्ही या प्रकरणात आपले हात घाण करायचं ठरवलं आणि खरंच तुमच्या गाडीतून खाली उतरलात तरच तुम्हाला जलपर्णी दिसतील!)

झपाट्याने बदलणारी परिस्थिती लक्षात घेता तलावाची जास्तीतजास्त पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कायम राखण्याची जोरदार मागणी असूनही आतापर्यंत असा कोणताही प्रस्ताव मिळालेला नसल्याचेही अधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

आपल्या आसपासच्या आणि प्रभागांमध्ये आढळून येणाऱ्या समस्या आणि इच्छित बदलासाठी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी पालिका आणि इतर प्रशासनावर मागणी आणि दबाव बनवून ठेवणे अतिआवश्यक आहे. तरच आम्ही आमच्या सुविधांसाठी भरत असणाऱ्या करांच्या बदल्यात मुंबई शहरात आम्हाला आवश्यक सुविधा सरकारी यंत्रणांकडून मिळू शकणार आहेत. नाहीतर आम्हाला फक्त मृगजळापाठी धावत ठेवेल हे प्रशासन, असेही मत या भेटीनंतर प्रतिनिधींनी व्यक्त केले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!