पवई तलावात सापडला ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह

शुक्रवार, १८ जून रोजी पवई तलावात एका पंच्चावन वर्षीय पुरुषाचा मृतदेह पवई पोलिसांना मिळून आला आहे. शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेले असता बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी आलेल्या लोकांना एक मध्यम वयाच्या पुरुषाचे शरीर पाण्यावर निश्चल पडलेले आढळून आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

“शरीरातून दुर्गंधी येत होती. किमान २४ तासापूर्वी त्याचा बुडून त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “मृत इसम हा अंदाजे ५५ वर्ष वयाचा आहे. त्याची ओळख अध्याप पटलेली नाही. त्याने अंगात सफेद रंगाचा चौकड्याचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅण्ट घातलेली आहे. आम्ही त्याची ओळख पटवण्यासह नातेवाईकांचा शोध घेत आहोत.

, , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!