पवई चांदिवली भागालाही बसला तोक्ते चक्रीवादळाचा फटका

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर तोक्ते चक्रीवादळात झालं असून अतिशय रौद्र रुप धारण करत हे वादळ मुंबईमधून पुढे गुजरातच्या दिशेने सरकले असून, सोमवारी मुंबईपासून प्रवास करताना त्याचे परिणाम निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पवई, चांदिवली भागात सुद्धा पहायला मिळाले.

तोक्ते चक्रीवादळ रविवारपर्यंत गोवा, रत्नागिरी आणि उर्वरित कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घालत सोमवारी मुंबईत पोहचले. त्याचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून १५० किमी समुद्री भागात असल्याचं सांगण्यात आले होते. मुंबईला धोका नसल्याचे सांगण्यात आले असले तरी मुंबई महानगरपालिकेने हवामान विभागाने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर पूर्ण खबरदारी घेतली होती.

शनिवार रात्रीपासूनच मुंबईत या चक्रीवादळाचे परिणाम दिसून हलक्याश्या सरी बरसून गेल्या. रविवारी मुंबईच्या विविध भागात हलक्या सरी जाणवल्या. मात्र सोमवारी याचा मोठा परिणाम मुंबईत दिसून आला. पवईमध्ये सुद्धा सोमवारी बराच परिणाम जाणवला. कुठे झाडे उन्मळून पडली, कुठे पत्रे उडून गेले, कुठे पुलना भेगा पडल्या तर कुठे पाणी साचले. या सगळ्या नैसर्गिक हाणीत बऱ्याच ठिकाणी गाड्यांचे नुकसान झाल्याचेही समोर येत आहे.

चांदिवली फार्म रोड
नहार अमृत शक्ती

चांदिवली फार्म रोड, आयसीआयसीआय बँकेच्या समोर आणि नहार अमृत शक्ती रोडवर तुफानी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. – प्रफुल्ल दळवी

इमारत क्रमांक २६ समोर पडलेले झाड

चांदिवली विभागातील संघर्षनगर येथे जोरदार वाऱ्याचा व पावसाचा फटका बसल्याने विविध ठिकाणी पाणी साचलेले होते. इमारत क्रमांक २६ समोर झाड पडले. एम्बुलंस वर पत्र्याचे कंपाउंड पडून नुकसान झाले, सत्संग भवन पडले आणि डोंगरावरून अनेक दगड कोसळली. – संजय डावरे

एनटीपीसी इमारत भागात असणारे एक झाड उन्मळून कारवर पडल्याने २ गाड्यांचे नुकसान झाले – शिवमठ

सतत पडत असणाऱ्या पावसामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर असणाऱ्या मिलिंदनगर भागात पाणी साठले. पावसाळापूर्व झालेली ही परिस्थिती प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींसाठी धोक्याची सूचना असून, त्यांनी पावसाळ्यापूर्वी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. – निशांत गायकवाड

भवानी इंडस्ट्रीज, आयआयटी मार्केट पवई येथे टेम्पोवर पडलेले झाड
भवानी इंडस्ट्रीज, आयआयटी मार्केट पवई येथे टेम्पोवर पडलेले झाड
हिरानंदानी गार्डन्स , डी मार्ट सर्कल येथे उन्मळून पडलेले झाड
हिरानंदानी गार्डन्स येथे उन्मळून पडलेले झाड
गरीबनगर भागात घरावर पडलेले झाड

आयआयटी मार्केट पवई, भवानी इंडस्ट्रीज, गरीबनगर, हिरानंदानी या भागात झाडे उन्मळून पडली. प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत झाडे हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले. – निखिल शिरसट, रमेश कांबळे

फिल्टरपाडा भागात एका रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचे नुकसान झाले आहे. – सुनील लेंगारे

जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे पार्कसाईट पोलीस ठाण्याची भिंत आणि बाहेरील एक झाड पोलिसांच्या गाडीवर पडल्याची घटना घडली. – आनंद इंगळे

पवई ते आरे कॉलोनी जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु असून, तात्पुरता ये-जा करण्यासाठी तयार केलेल्या पुलास भेगा पडल्या आहेत. ज्यामुळे पवई पोलिस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन यांनी हा पूल तात्पुरता बंद केला आहे. – प्रथम सोनकांबळे

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!